MR/Prabhupada 0005 - 3 मिनिटांत प्रभुपाद चे जीवन
Interview -- September 24, 1968, Seattle
मुलाखतकर्ता : आपण मला आपल्या स्वत:च्या पार्श्वभूमिबद्धल सांगाल का? जे की, आपण शिक्षण कुठून घेतले ? आपण श्रीकृष्णाचे अनुयायी कसे झालात ?
प्रभुपाद : माझा जन्म आणि शिक्षण कलकत्यामधे झाले. कलकत्ता माझे मुख्य स्थान आहे. माझा जन्म १८९६ साली झाला, आणि मी माझ्या वडिलांचा फार लाडका होतो, अशा रीतीने माझ्या शिक्षणाला थोडी उशिरा सुरवात झाली, आणि अद्यापही, मी उच्च माध्यमिक मध्ये शिकलो, माध्यमिक शाळेत आठ वर्षे. प्राथमिक शाळेत चार वर्षे, उच्च माध्यमिक शाळा, आठ वर्ष, महाविद्यालयात , चार वर्षे. मग मी गांधींच्या चळवळीत सामील झालो, राष्ट्रीय चळवळ. पण चांगल्या दैवयोगाने मला माझे गुरू महाराज भेटले, माझे आध्यात्मिक गुरू, १९९२ मध्ये. आणि तेव्हापासून, या क्षेत्रात आकर्षित होतो, आणि हळूहळू मी माझे घरगुती जीवन सोडून दिले. माझे १९१८ मध्ये लग्न झाले जेव्हा मी तरीही तिसऱ्या वर्षी विद्यार्थीदशेत असताना. आणि म्हणून मला माझी मुले झाली. मी व्यवसाय करत होतो. मग मी १९५४ मध्ये माझ्या कौटुंबिक जीवनातून निवृत्त झालो. चार वर्षे मी एकटा होता, कुठल्याही कुटुंबा शिवाय. नंतर १९५९ मध्ये मी कौटुंबिक जीवनातून कायमचा सन्यास घेतला. मग मी स्वतःला पुस्तके लिहिण्यात एकनिष्ठ केले. माझे पहिले प्रकाशन १९६२ मध्ये प्रकाशित झाले. आणि जेव्हा तीन पुस्तके होती. नंतर मी १९६५ मध्ये तुमच्या देशात प्रारंभ केला आणि मी सप्टेंबर इ.स. १९६५ मध्ये येथे पोहोचलो. तेव्हांपासून, मी अमेरिकेत कृष्णभावनाभावित प्रवचन देण्याचा प्रयत्न करत आहे, कॅनडा, युरोपियन देशांमध्ये. आणि हळूहळू केंद्रे विकसित होत आहेत. शिष्य सुद्धा वाढत आहेत. मला बघू द्या काय करता येईल ते.
मुलाखतकर्ता : तुम्ही स्वतः एक शिष्य कसे बनलात ? आपण काय होता, किंवा आपण एक शिष्य बनण्यापूर्वी काय अनुसरत होतात ?
प्रभुपाद: तीच गोष्ट जसे मी सांगितल्या प्रमाणे, श्रध्दा माझ्या मित्रांपैकी एक, त्याने मला माझ्या आध्यात्मिक गुरूंकडे जबरदस्तीने खेचून नेले. आणि जेव्हा मी माझ्या आध्यात्मिक गुरूंबरोबर संभाषण केले, मी प्रेरित झालो. आणि तेव्हापासून, बिजापासून रोप तयार होण्यास आरंभ झाला.