MR/Prabhupada 0006 - प्रत्येकजण देव आहे - मूर्ख नंदनवन



Lecture on SB 1.15.49 -- Los Angeles, December 26, 1973

सगळेजण फुशारक्या मारतात, ते " मला माहीत आहे, मला सर्व काही माहीत आहे." त्यामुळे तेथे गुरू कडे जाण्याची काही आवश्यकता नाही आहे. हा गुरुकडे पाहण्याचा दृष्टीकोन आहे, आध्यात्मिक गुरू. शरण जा, की "मला अनेक अर्थशून्य गोष्टी माहिती आहेत ज्या निरुपयोगी आहेत. आता मला कृपया शिकवा." ह्याला शरणागती म्हणतात. जसे की अर्जुन म्हणाला, शिष्यस्तेSहं शाधि मां त्वां प्रपन्नम् (भ.गी.२.७). जेव्हा तिथे श्रीकृष्ण आणि अर्जुन ह्यांच्यामध्ये युक्तिवाद होता, आणि जेव्हा प्रकरणाचे निराकरण झाले नाही, तेव्हां अर्जुन श्रीकृष्णाना शरण गेला. "माझ्या प्रिय कृष्णा, आता आपण एक मित्र म्हणून बोलत आहोत, आणखी मैत्रिपूर्ण संभाषण नको. मी आपणास माझा आध्यात्मिक गुरू म्हणून स्वीकार करत आहे. कृपया माझे कर्तव्य काय आहे हे मला शिकव." ती आहे भगवद-गीता. तर प्रत्येकाला शिकले पाहिजे. तद्-विज्णानार्थं स गुरुम एव अभिगच्छेत् [मु.उ.१.२.१२]. हा वैदिक हुकुम आहे, की काय आहे हे जीवनाचे मूल्य ? हे कसं बदलत असते? आपण एका शरीरातून दुसर्‍या शरीरात कसे स्थानांतर करतो? मी कोण आहे? मी एक शरीर आहे किंवा पलीकडे, काहीतरी? या गोष्टींची चौकशी करण्याची आवश्यकता असते. हे मानवी जीवन आहे. अथातो ब्रह्म जिज्णासा. ही चौकशी केली पाहिजे. तर या कलियुगा मध्ये, कुठल्याही ज्ञानाशिवाय, कुठल्याही चौकशी शिवाय. कुठल्याही गुरू शिवाय, कुठलेही पुस्तक वाचल्या शिवाय, सगळेच भगवंत आहेत, असे सगळे आहे. हे सर्व चालले आहे, मूर्खांचे नंदनवन. तर हे चालणार नाही. येथे, विदुरा बद्धल... तो सुद्धा... (श्री.भा.१.१५.४९) विदुरोऽपि परित्यज्य प्रभासे देहमात्मः कृष्णावेशेन तच्चित्तः पितृभिः स्वक्षयं ययौ तो.... मी विदुरा बद्धल बोलत होतो. विदुर यमराज​ होता. तर एक पवित्र व्यक्ती यमराजा समोर शिक्षा देण्यासाठी आणण्यात आली होती. जेव्हा त्या पवित्र व्यक्तीची यमराजा कडून चौकशी झाली. की "मी ... मी माझ्या आयुष्यात कोणतेही पाप केल्याचे मला आठवत नाही. मला इथे निवाडा करण्यासाठी का बोलावण्यात आले आहे?" की यमराज म्हणाले की "तुला आठवत नाही आहे. तुझ्या बालपणामध्ये तू एका मुंगीच्या गुदाशयामध्ये एक सुई टोचली होती, आणि ती मेली. त्यामुळे तुला शिक्षा ही करावीच लागेल." हे बघा. बालपणामध्ये, अजाणतेने, कारण त्याने काही पाप केले आहे, त्याला शिक्षा झालीच पाहिजे. आणि आम्ही स्वेच्छेने , धर्म तत्त्वा विरुद्ध की " कोणालाही ठार मारू नये," आम्ही कितीतरी हजारो कत्तलखाने उघडून ठेवली आहेत., मूर्खपणाचा सिद्धांत देऊन की प्राण्यांना आत्मा नाही. जरा गंमत तरी बघा. आणि असे हे चालले आहे. आणि आम्हाला शांतता पाहिजे.