MR/Prabhupada 0010 - कृष्णा च्या अनुकरण करण्याचा प्रयत्न करू नका



Lecture on SB 7.9.9 -- Mayapur, February 16, 1976

श्रीकृष्ण... ह्या सोळा सहस्र बायका, त्या बायका कश्या झाल्या ? तुम्हाला कथा माहीत आहे, एवढ्या सुंदर, सोळा सहस्त्र सुंदर, मला असे म्हणायचे आहे, राजांच्या कन्या एका राक्षसाद्वारे पळवून नेल्या होत्या. त्या राक्षसाचे नाव काय? भौमासुर, नाही? होय. तेव्हा त्यानी श्रीकृष्णांची प्रार्थना केली की "आम्ही ग्रस्त आहोत, ह्या हरामखोराने आम्हाला पळवून नेले आहे, कृपया आम्हाला वाचवा." त्यामुळे श्रीकृष्ण त्यांची मुक्तता करण्यासाठी आले, आणि भौमासुर मारला गेला आणि सगळ्या मुलींना मुक्त केले. पण मुक्तता केल्या नंतर सुद्धा त्या तिथेच उभ्या होत्या. त्यामुळे श्रीकृष्णानी त्याना विनंती केली की "आता तुम्ही आपल्या वडिलांच्या घरी जाऊ शकता." त्या म्हणाल्या की, "आम्हाला पळवून नेलेले आहे, त्या मुळे आमचे लग्न होणार नाही." भारतात अजुन सुद्धा ही रीत चालू आहे. जर एक मुलगी, तरुण मुलगी, घराच्या बाहेर एक किंवा दोन दिवस जाते, कोणीही तिच्याशी लग्न करणार नाही. कोणीही तिच्याशी लग्न करणार नाही. ती बिघडली आहे असे समजले जाते. ही अजुन ही भारतीय पद्धत आहे. तर त्या पळवून नेल्या होत्या कितीतरी दिवसांपासून किंवा कितीतरी वर्षांपासून, तर त्यानी श्रीकृष्णांकडे प्रार्थना केली की " आम्हाला एकतर आमचे वडील स्वीकारणार नाहीत, ना हा ना तो कोणीही आमच्याशी लग्न करण्यास तयार होणार नाही." तेव्हा श्रीकृष्ण समजून चुकले की "त्यांची परिस्तिथि डळमळीत आहे. जरी त्यांची सुटका झाली असली ,तरी ती कुठेही जाऊ शकत नाही." नंतर श्रीकृष्ण... तो इतका दयाळू आहे, भक्त-वत्सला. त्याने चौकशी केली, "तुम्हाला काय पाहिजे?" की... त्या म्हणाल्या की "तुम्ही आम्हाला स्वीकारा. नाही तर आम्हाला जगण्यासाठी काही हेतू नाही." श्रीकृष्ण लगेच: " होय, चला मग." हा श्रीकृष्ण आहे. आणि असे नाही की त्याच्या सोळा सहस्त्र बायका एकाच केंद्रात ठेवल्या होत्या. त्याने त्वरित सोळा सहस्त्र राजवाडे बांधले. कारण त्याने बायको म्हणून स्वीकारले, तिला आपल्या बायको प्रमाणेच वागवले पाहिजे. त्याची राणी म्हणून, नाही की " त्यांना आता काहीच उद्देश नाही राहिला, त्या माझ्या आश्रायाखाली आल्या. मी त्यांना तसे ही ठेवू शकतो." नाही. सर्वाधिक आदरपूर्वक राणी, श्रीकृष्णाची राणी म्हणून. आणि परत त्याने विचार केला की " सोळा सहस्त्र बायका ..... जर मी एकटाच राहिलो, एक प्रतिमा , माझ्या बायका मला भेटू शकणार नाही. प्रत्येकाला त्याच्या नवर्‍याला भेटावयास सोळा सहस्त्र दिवस थांबावे लागेल. नाही. " त्याने स्वतःला सोळा सहस्त्र श्रीकृष्णामध्ये विस्तारित केले. हा आहे श्रीकृष्ण. हे हरामखोर , श्रीकृष्णाना बाईलवेडा असल्याचा आरोप करतात. ते तुमच्या सारखे नाही आहे, तुम्ही अगदी एक पत्नी सांभाळू शकत नाही, पण त्याने सोळा सहस्र ठिकाणी सोळा सहस्रा बायका सांभाळल्या. आणि सोळा सहस्र विस्तारीत रूपामध्ये. प्रत्येकजण खूश होते. हा आहे श्रीकृष्ण. आपल्याला समजून घ्यावयाचे आहे श्रीकृष्ण काय आहेत. श्रीकृष्णांचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करू नका. सर्वप्रथम श्रीकृष्णाना समजून घ्यायचा प्रयत्न करा.