MR/Prabhupada 0041 - सध्याचे जीवन, तो अशुभ पूर्ण आहे



Lecture on BG 9.1 -- Melbourne, June 29, 1974

परिपूर्ण ज्ञान. जर तुम्ही भगवद गीता वाचली, तुम्हाला संपूर्ण ज्ञान मिळेल. तर भगवंत काय म्हणतात? इदं तु ते गुह्यतमं प्रवक्ष्याम्यनसूयवे (भ.गी.९.१) भगवंत, श्रीकृष्ण, अर्जुनाला शिकवत आहेत. तर नवव्या धड्यात ते म्हणतात, "माझ्या प्रिय अर्जुना, आता मी तुला सर्वात गोपनीय ज्ञान सांगत आहे, गुह्यतमं. तमं म्हणजे उत्कृष्ट दर्जाचा. , सकारात्मक, तुलनात्मक आणि उत्कृष्ट दर्जाचा. संस्कृत मध्ये, तर-तम. तर म्हणजे तुलनात्मक, आणि तम म्हणजे उत्कृष्ट दर्जाचा. तर इथे भगवंत म्हणतात, दैवी गुणांनी परिपूर्ण व्यक्तिमत्व म्हणते, इदं तु ते गुह्यतमं प्रवक्ष्याम्य. "आता मी तुला सर्वात गोपनीय ज्ञान सांगत आहे." ज्ञानं विज्ञानसहितं. हे ज्ञान संपूर्ण ज्ञान आहे, कल्पना नव्हे. ज्ञानं विज्ञानसहितं. विज्ञान म्हणजे " शास्त्र ", "सोदाहरण प्रात्यक्षिक." तर ज्ञानं विज्ञानसहितं यज्ज्ञात्वा. जर तुम्ही हे ज्ञान आत्मसात केलेत, यज्ज्ञात्वा मोक्ष्यसेऽशुभात्. अशुभात्. मोक्ष्यसे म्हणजे तुम्हाला मुक्ती मिळेल, आणि अशुभात् म्हणजे "अमंगल." अमंगल. तर आमचे उपस्थित जीवन , सध्याच्या क्षणी, सध्य जीवन म्हणजे जोपर्यंत आपण हे भौतिक शरीर ग्रहण केले आहे, ते पूर्णपणे अमंगल आहे. मोक्ष्यसेऽशुभात् . अशुभात् म्हणजे अमंगल.