MR/Prabhupada 0040 - येथे एक सर्वोच्च व्यक्ती आहे



Lecture on BG 16.8 -- Tokyo, January 28, 1975

लाखो आणि करोडो आणि अब्जो जिवात्मे आहेत, आणि प्रत्येकाच्या हृदयात, तो स्थित आहे. सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्तः स्मृतिर्ज्ञानमपोहनं च (भ.गी.१५.१५) तो त्याप्रमाणे प्रबंध करतो. त्यामुळे जर आम्ही अशी विचारधारणा करतो की तो आपल्यासारखा नियामक आहे, तो आमचा गैरसमज आहे. तो नियामक आहे. तेथे नियामक आहे. अमर्यादित ज्ञान आणि अमर्यादित साहाय्यकांसह, अमर्यादित समर्थ्यासह, तो प्रबंध करतो. हे व्यक्तिनिरपेक्ष, ते हा विचार करू शकत नाही की एक व्यक्ती एव्हडी अमर्यादित सामर्थ्यशाली असु शकते. म्हणून ते व्यक्तिनिरपेक्ष बनतात. ते हा विचार करू शकत नाही. व्यक्तिनिरपेक्ष, हा विचार करू शकत नाही... ते विचार करतात, "जेव्हा एक व्यक्ती आहे, ती एक माझ्या सारखी व्यक्ती आहे. मी हे करू शकत नाही. म्हणून तो करू शकत नाही. " त्यामुळे ते आहेत मूढ. अवजानन्ति मां मूढा (भ.गी.९.११) ते स्वतःची श्रीकृष्णा बरोबर तुलना करतात. तो एक व्यक्ती आहे, तसेच, श्रीकृष्ण एक व्यक्ती आहेत. त्याला माहित नाही. वेद सूचीत करतात की " जरी तो व्यक्ती आहे, तो सगळ्या अमर्यादित व्यक्तिंची देखरेख करतो." ते त्यांना माहीत नाही. एको बहूनां विदधाति कामान्. की एक असामान्य व्यक्ती, तो अनेक लाखो, अनेक करोडो, अनेक अब्जो लोकांची देखरेख करतो. आम्ही प्रत्येक जण, सगळे जण, आम्ही व्यक्ती आहोत, मी एक व्यक्ती आहे. तुम्ही एक व्यक्ती आहात. मुंगी व्यक्ती आहे. मांजर व्यक्ती आहे. कुत्रा व्यक्ती आहे, आणि किटक व्यक्ती आहे. झाडे व्यक्ती आहेत. प्रत्येकजण व्यक्ती आहे. प्रत्येकजण व्यक्ती आहे. आणि एक वेगळी व्यक्ती आहे. ती आहे भगवान, श्रीकृष्ण. ती एक व्यक्ती ह्या सगळ्या प्रकारच्या लाखो आणि अब्जो व्यक्तिंची देखरेख करते. हा वेदिक आदेश... एको यो बहुनां विदधाति कामान्नित्यो नित्यानां चेतनश्चेतनानाम् (कठ उपनिशद् २.२.१३) ही माहिती आहे. तर श्रीकृष्ण सुद्धा भगवद गीतेमध्ये सांगतात, अहं सर्वस्य प्रभवो मत्तः सर्वं प्रवर्तते । इति मत्वा भजन्ते मां... (भ.गी.१०.८) म्हणून एक भक्त, जेव्हा त्याला पूर्णपणे समजते की , "इथे आहे एक परमपुरूष, जो पुढारी आहे, जो नियामक आहे, जो प्रत्येक गोष्टींचा पालनपोषण कर्ता आहे," नंतर तो त्याला शरण जातो आणि त्याचा भक्त होतो.