MR/Prabhupada 0045 - ज्ञानाच्या विषयाला म्हणतात, ज्ञेयं

[[Category:MR-Quotes - Lectures, Bhagavad-gita As It Is]]



Lecture on BG 13.1-2 -- Paris, August 10, 1973

प्रकृतिं पुरुषं चैव
क्षेत्रं श्रेत्रज्ञमेव च
एतद्वेदितुमिच्छामि
ज्ञानं ज्ञेयं च केशव (भ गी १३।१ )


हा मनुष्याचा विशेष अधिकार आहे . कि तो प्रकृती ला समजू शकतो, या वैश्विक प्रकटीकरणाला , निसर्गाच्या उपभोक्त्याला , आणि तो पूर्णपणे परिचित होऊ शकतो कि ज्ञानाचा विषय काय आहे , ज्ञेयं . तीन गोष्टी आहेत , ज्ञेयं, ज्ञाता आणि ज्ञान . ज्ञानाचा विषय , जो जाणतो तो ज्ञाता , आणि ज्ञानाच्या विषयाला म्हणतात , ज्ञेयं. आणि प्रक्रिया जिच्याद्वारे एखादयाला हे समजू शकतो ,त्याला म्हणतात ज्ञान . जेव्हा आपण ज्ञानाबद्दल बोलतो , तेव्हा तीन गोष्टी असल्या पाहिजेत : ज्ञानाचा विषय , व्यक्ति जो जाणून घेण्याचा प्रयत्न करीत आहे तो , आणि प्रक्रिया जिच्याद्वारे ज्ञानाचा विषय साध्य होतो . तर त्यातले काही जण .. जसे भौतिकवादी वैज्ञानिक , ते केवळ प्रकृती काय आहे हे जाणून घेण्याचा प्रत्न करत आहेत . पण त्यांना पुरुषाची माहिती नाही . प्रकृती म्हणजे आनंद , आणि पुरुष म्हणजे भोक्ता ( आनंद घेणारा ). वास्तवात भोक्ता आहे कृष्ण . तो मूळ पुरुष आहे . अर्जुनाने हे स्वीकार केलं : पुरुषं शाश्वतं . " तू मूळ भोक्ताआहेस , पुरुषं ." कृष्ण भोक्ता आहे आणि आपण सर्व , जीव , आणि प्रकृती , निसर्ग , सर्व काही , कृष्णाच्या आनंदासाठी आहोत .. हे कृष्णाचे आहे .


दुसरा पुरुष , आपण जीव .आपण परुष नाही . आपण सुद्धा प्रकृती आहोत . आपण भोगासाठी आहोत .पण या भौतिक परीस्थितीत , आपण पुरुष बनण्याचा प्रयत्न करत आहोत , भोक्ता . याचा अर्थ , जेव्हा प्रकृती , किवा जीव , पुरुष बनू इच्छितात , ती भौतिक परिस्थिती आहे . जर स्त्री , पुरुष बनण्याचा प्रयत्न करत असेल , तर ते अप्राकृतिक आहे . तसेच जेव्हा जीव , जो स्वभावाने भोगासाठी आहे , एक उदाहरण , जे आपण अनेक वेळा दिले आहे , कि ही बोटे काही चांगले खाण्याचे पदार्थ उचलतात , पण वास्तवात बोट हे भोक्ता नाही . बोटे वास्तव भोक्त्याला मदत करू शकतात , जे आहे पोट . ते काही चांगले पदार्थ उचलू शकतात आणि मुखात टाकू शकतात , आणि ते पदार्थ जेव्हा पोटात जातात , जो खरा भोक्ता आहे , तेव्हा सर्व प्रकृत्या , शरीराचे सर्व भाग , शरीराचे सर्व अंग , ते समाधान प्राप्त करतात . तर भोक्ता आहे पोट , शरीराचा कोणताही भाग नाही .


हितोपानिशदा मध्ये एक कथा आहे , हितोपदेश , ज्यातून ईसॉपची दंतकथा अनुवाद केली आहे . तिथे , तिथे एक कथा आहे : उदरेंद्रियाणाम . उदर . उदर म्हणजे पोट , आणि इंद्रिया हणजे हि इंद्रिये . त्यात कथा आहे उदरेंद्रियाणाम . इंद्रिये , सर्व इंद्रिये एकत्र बैठक घेतात . ते म्हणतात कि : " आपण काम करत असतो , इंद्रिये .. " (बाजूला : ) ते उघडं का आहे ? " आपण काम करत आहोत ." पाय म्हणाले : " हो , मी , दिवसभर मी चालत आहे ." हात म्हणले " हो , मी दिवस भर काम करत आहे , जिथे जिथे शरीर सांगेल : "तू इथे ये आणी हे पदार्थ उचल " वस्तू आणणे , जेवण , मी जेवण सुद्धा बनवतो ." मग डोळे , ते म्हणाले : " हो मी बघत आहे ." प्रत्येक अंग प्रत्यंग , ते संप करतात कि , " आम्ही अजून या पोटासाठी काम करणार नाही जे फक्त खात आहे " आम्ही सर्व काम करत आहोत , आणि हा माणूस , हे पोट केवळ खात आहे " आणि मग संप .. जसे भांद्वालदार आणि कामगार . कामगार संपावर जातात , आता अजून काम नाही होणार .


तर सर्व अंग , शरीराचे भाग , संप पुकारतात , आणि दोन , तीन दिवसा नंतर , जेव्हा ते पुन्हा भेटतात , ते आपापसात चर्चा करतात कि : " आपण अशक्त का बनत चाललोय " आपण आता काही काम नाही करू शकत. पाय सुद्धा म्हणाले : " हो , मला अशक्तपणा जाणवतोय ." हाताला सुद्धा अशक्तपणा जाणवत आहे , सर्वाना . तर काय कारण आहे ? कारण ..मग पोट म्हणाले : " कारण मी भोजन नाही करत आहे " तर जर तुम्हाला बलवान रहायच असेल तर , तुम्ही मला भोजन दिलच पाहिजे . नाहीतर ..तर मी भोक्ता आहे . तुम्ही भोक्ता नाहीत . तुम्ही माझ्या भोगासाठी पुरवठा करण्यासाठी आहात .ते तुमचे स्थान आहे . तर ते समजले " हो , आम्ही थेट आनंद भोगू नाही शकत .ते शक्य नाही " पोटाच्या माध्यमातूनच आनंद भोग होऊ शकतो . तुम्ही एक रसगुल्ला घ्या , तुम्ही बोटे , तुम्ही भोग नाही घेउ शकत . तुम्ही ते मुखाला द्या आणि जेव्हा ते पोटात जाते , तेव्हा त्वरित उर्जा प्राप्त होते . केवळ बोटे आनंद भोगत नाहीत , डोळे , इतर सर्व भाग , ते समाधान अनुभवतात आणि सामर्थ्य सुद्धा . त्याचप्रमाणे वास्तविक भोक्ता आहे कृष्ण. कृष्ण म्हणतो :

भोक्तारं यज्ञतपसां सर्वलोकमहेश्वरम्
सुहृदं सर्वभूतानां ज्ञात्वा मां शान्तिमृच्छति (भ. गी. ५।२९) (भ गी ५।२९ )