MR/Prabhupada 0048 - आर्यन संस्कृती



Lecture on BG 2.2-6 -- Ahmedabad, December 11, 1972

अनार्य जुष्टम् (भ गी २।२ ) , " जीवनाच्या प्रगतिशील मूल्यांची जाणीव असलेल्या माणसाला न शोभणारे ."

आर्यन . आर्यन चा अर्थ आहे जो प्रगतीशील आहे . तर युद्ध भूमी मध्ये अर्जुनाच्या या निराशेला , आर्यन नसलेले वागण संबोधलं आहे . आर्यन , भगवद-गीतेत वर्णन केल्याप्रमाणे आर्यन सभ्यातेनुसार परमेश्वराने चार विभाग रचले आहेत.


जसे आपण आधीच स्पष्ट केले आहे , धर्मम् तु साक्षाद भगवत-प्रणीतम् (श्री भ ६।३।१९ ) कोणतीही पद्धतशीर धार्मिक प्रक्रिया असेल तर : " ती भगवंता द्वारे दिली आहे " मनुष्य कोणतीही धार्मिक व्यवस्था नाही बनवू शकत . तर हि आर्यन पद्धत , प्रगीशील प्रणाली ,

चातुरर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्मविभागश: (भ गी ४।१३ ) ।

कृष्ण सांगतात , " सामाजिक व्यवस्थेच्या चांगल्या व्यवस्थापनासाठी ते माझ्याद्वारे रचले गेले आहे ." ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र . तर अर्जुना क्षत्रिय परिवारातला होता . म्हणून त्याची युद्धभूमीत लढण्याची द्विधावस्था आर्यांना शोभणारी नाही . राज परीवाचे अहिंसक बनणे , हे योग्य नाही . क्षत्रिय , जेव्हा ते युद्ध भूमीत लढत असतात , हत्या हे त्यांच्यासाठी पाप नाही . त्याचप्रमाणे , ब्राह्मण , जेव्हा तो बळी अर्पण करतो , काही वेळा प्राण्यांचे बळी अर्पण केले जातात. त्याचा अर्थ हा नाही की तो पाप करत आहे .


पशू बळी फक्त खाण्याच्या उद्देशासाठी नव्हता . ते वेदिक मंत्राच्या परीक्षणासाठी होतं . ब्राह्मण , जे यज्ञ करत असत ते योग्य पद्धतीने वेदिक मंत्राचे जप करत आहेत के नाही त्याचे परीक्षण प्राण्याचा बळी देऊन आणि पुन्हा त्याला नवीन तरुण जीवन देऊन केले जात . ते पशू बलिदान होते . कधी कधी घोडे , कधी गायींना अर्पण केले जात . पण या युगात , कली युग , हे वर्जित आहे . कारण असा कोणी याज्ञिक-ब्राह्मण आता नाही आहे . सर्व प्रकारचे बळी हे या युगात वर्जित आहेत .

अष्वमेधं गवालम्भं सन्न्यासं पल-पैतृकम् देवरेण सुतोत्पत्तिं कलौ पन्च विवर्जयेत (चै च अादि १७।१६४ )

अष्वमेध यज्ञ, गायीचे बलिदान, संन्यास ,आणि धीराद्वारे बाळ होणे . पतीचा धाकटा भाऊ , या गोष्टी या युगात निषिद्ध आहेत .