MR/Prabhupada 0049 - आपण प्रकृतिच्या नियमांनुसार बद्ध आहोत



Arrival Talk -- Aligarh, October 9, 1976

तर हे संकीर्तन खूपच गौरवशाली आहे. हा श्री चैतन्य महाप्रभूंचा आशीर्वाद आहे .परं विजयते श्री-कृष्ण-संकीर्तनम (शिक्षाश्टकम १) . हा त्यांचा आशीर्वाद आहे : केवळ संकीर्तनाद्वारे या युगात वैदिक साहित्यात याची पुष्टी केली आहे , वेदान्त सूत्रात. शब्दाद् अनावृत्ति । अनावृत्ति, मोक्ष . आपली वर्तमान स्थिती बंधन आहे . आपण प्रकृतीच्या नियमांनुसार बद्ध आहोत. आपण मूर्खपणे स्वतंत्रतेची घोषणा करू शकतो - हा आपला मूर्खपणा आहे . परंतु वास्तवात आपण प्रकृतीच्या नियमांनी बांधलेले आहोत.

प्रकृते: क्रियमाणनि
गुणै: कर्माणि सर्वश:
अहंकार विमूढात्मा कर्ताहम् (भ गी ३।२७)


आपण प्रकृतिच्या नियमांनुसार बद्ध आहोत , पण ते जे मूर्ख आहेत , विमुढात्मा , खोट्या प्रतिष्ठेच्या अंतर्गत, असा मनुष्य विचार करतो कि मी स्वतंत्र आहे . नाही . अस नाही आहे . तर हा गैरसमज आहे . हा गैसमज दूर केला पाहिजे . हाच जीवनाचा उद्देश आहे . म्हणून श्री चैतन्य महाप्रभु म्हणतात कि , जर तुम्ही हरे कृष्ण महा मंत्रांचा जप कराल , तर लाभाचा पहिला हप्ता आहे

चेतो-दर्पण-मार्जनं (चै च अन्त्य २०।१२ )


कारण गैरसमज हृदयात आहे . जर हृदय स्वच्छ आहे , चेतना स्पष्ट आहे , तर तिथे गैसमज होणार नाही यासाठी ही चेतना शुद्ध होणे आवश्यक आहे. आणि हाच पहिला हप्ता आहे हरे कृष्ण जपाच्या परिणामाचा. कीर्तनाद् एव कृष्णस्य मुक्त-संग परं व्रजेत (श्री भ १२।३।५१ ) केवळ कृष्णाचा जप केल्याने , कृष्णस्य , कृष्णाचे पवित्र नाम , हरे कृष्ण हरे कृष्ण, हरे राम , एकच गोष्ट आहे . राम आणि कृष्ण यांच्यात काही अंतर नाही . रामादि मूर्तिषु कला नियमेन तिष्ठन् (ब्र. स. ५।३९) तर तुम्हाला गरज आहे .


वर्तमान स्थिती , गैरसमज आहे . की "मी या भौतिक स्वभावचे उत्पादन आहे," "मी हे शरीर आहे." " मी भारतीय आहे ", "मी अमेरिकन आहे ", " मी ब्राह्मण आहे ", "मी क्षत्रिय आहे ", इत्यादी इत्यादी ... तर बऱ्याच उपाध्या आहेत . पण आपण यातले कोणीच नाही . ही शुद्धी आहे . चेतो दर्पणा . जेव्हा तुम्ही स्पष्टपणे समजता कि " मी एक भारतीय नाही आहे , मी एक अमेरिकन नाही आहे , मी ब्राह्मण नाही आहे , मी क्षत्रिय नाही आहे " म्हणजे " मी हे शरीर नाही आहे " - तेव्हा चेतना अहं ब्रह्मास्मि होईल . ब्रह्मभूत: प्रसन्नात्मा न शोचति न कांक्षति (भ गी १८।५४) हे गरजेचे आहे . हीच जीवनाची सफलता आहे .