MR/Prabhupada 0050 - त्यांना माहित नाही पुढचा जन्म काय आहे
Lecture on BG 16.5 -- Calcutta, February 23, 1972
पकृती , कृष्णाच्या आदेशाखाली आपल्याला संधी देत आहे , आपल्याला संधी मिळत आहे जन्म मरणाच्या चक्रातून मुक्त होण्याची .
- जन्म-मृत्यु-जरा-व्याधी दुःख दोषानूदर्शनां (भ गी १३।९ ) ।
जीवनातल्या या चार घटनांच्या यातनांना समजण्यासाठी एखादा बुद्धिमान असला पाहिजे : जन्म - मृत्यू - जरा - व्याधि . हिच पूर्ण वेदिक प्रणाली आहे - या जाळ्यातून बाहेर कसे पडावे . पण त्यांना संधी दिली आहे कि , " तुम्ही हे करा , तुम्ही ते करा , तुम्ही ते करा ," असे नियमन केलेले जीवन , म्हणजे शेवटी तो मुक्त होऊ शकतो .
म्हणून भगवान म्हणतात , दैवी सम्पद विमोक्षाय (भ गी १६।५ ). जर तुम्ही दैवी संपत विकासित कराल , हे गुण ,जसे वर्णन केले आहे , अहिंसा , सत्त्व-सम्शुधि: अहिंसा , इतक्या सर्व गोष्टी - मग तुम्ही बाहेर पडाल, विमोक्षया . दुर्दैवाने , आधुनिक सभ्यता , ते जाणत नाहीत की विमोक्षय काय आहे . ते इतके अंध आहेत .त्यांना माहित नाही की असं काही आहे ज्याला विमोक्षय म्हणतात . त्यांना माहित नाही . त्यांना माहित नाही पुढचा जन्म काय आहे . तेथे कोणतीही शैक्षणिक व्यवस्था नाही. मी जगभरात प्रवास करीत आहे. एकही अशी संस्था अस्तित्वात नाही जी आत्म्याच्या देहांतरणा विषयी शिक्षण देईल . एखाद्याला चांगले जीवन कसे मिळू शकेल . पण ते विश्वास नाही करत . त्यांना काहीच ज्ञान नाही आहे . ती आहे आसुरी- संपत .
त्याचे वर्णन इथे आले आहे : प्रवृत्तिं च निवृत्तिं च जना न विदुर अासुरा: प्रवृत्तिं . प्रवृत्तिं म्हणजे आकर्षण , किंवा आसक्ती , कोणत्या प्रकारच्या उपक्रमात आपण संलग्न व्हावे आणि कोणत्या प्रकारच्या उपक्रमात आपण आसक्त होऊ नये , हे असुर जाणत नाहीत . प्रवृत्तिं च निवृत्तिं च . प्रवृत्तिं च निवृत्तिं च जना न विदुरासुर: न शौचं नापि चाचारो न सत्यं तेषु विद्यते (भ गी १६।७ ) हे असुर आहेत . त्यांना माहित नाही की त्यांचे जीवन कसे आणि कोणत्या मार्गाला अनुसरून असले पाहिजे. त्याला म्हणतात प्रवृत्ती . आणि कोणत्या प्रकारचे जीवन त्यांनी त्यागले पाहिजे , निवृत्ति . प्रवृत्तिस् तु जीवात्मन . हे दुसरं आहे . भुनं । निवृत्तिस् तु महाफलां .
संपूर्ण शास्त्र , आंपूर्ण वेदिक मार्ग प्रवृत्ती निवृत्ति साठी आहे . ते हळू हळू प्रशिक्षण देतात. जसे लोके व्यवायामिष-मद्य-सेवा नित्या सुजन्तो:(श्री भ ११।५।११ ) । जीवित प्राण्याचा स्वभावतःच कल असतो व्यवाय , संभोग जीवनाकडे . आणि मद्य सेवा:, नशा, अामिष सेवा: आणि मांस खाणे स्वाभाविक कल असतो पण असुर , ते हे थांबवण्याचा प्रयत्न करत नाहीत.त्यांना यात वृद्धी हवी असते . ते आहे आसुरी जीवन . मला एखादा आजार आहे . जर मला तो बरा करायचा आहे , डॉक्टर मला काही उपाय सांगतात ." तुम्ही हे घेऊ नका " जसे मधुमेहाचा रोगी . त्याला निषिद्ध केले आहे , " साखर घेऊ नका , स्टार्च घेऊ नका" निवृत्ति , तसेच शास्त्र आपल्याला निर्देश देतात. कि तुम्ही याचा स्वीकार करावा , याचा स्वीकार करू नये , शास्त्र . जसे आपण आपल्या समाजात , आपण अत्यंत गरजेच्या निवृत्ती आणि पप्रवृत्तींना पकडले आहे . प्रवृत्ति , आपण आपल्या विद्यार्थ्यांना निर्देश दिले आहेत , " अनैतिक संभोग नाही , मांस जेवण नाही , आमिष सेवा नाही " अामिष सेवा नित्या सुजन्तो. पण शास्त्र म्हणतात कि जर तुम्ही त्याग कराल निवृत्तिस तु महाफलं , तर तुमचे जीवन सफल आहे . पण आपण तयार नाही आहोत . जर तुम्ही प्रवृत्तीचा स्वीकार करायला आणि निवृत्तीचा त्याग करायला तयार नाही आहात , तर एखाद्याने समजले पाहिजे कि तो असूर आहे कृष्ण इथे म्हणतो , प्रवृत्तिं च निवृत्तिं च जना न विदुर अासुरा: (भ गी १६।७ ) ।
ते नाहीत ... "ओह, ते काय आहे?" ते म्हणतात, अगदी मोठे , मोठे स्वामिही म्हणतील, "अरे, त्यात काय चुकीचे आहे? तुम्ही काही खाऊ शकता . त्याने काही फरक नाही पडत . तुम्ही काही करू शकता . तुम्ही फक्त मला शुल्क द्या, आणि मी तुम्हाला काही विशेष मंत्र देतो. " या गोष्टी चालू आहेत.