MR/Prabhupada 0056 - शास्त्रामध्ये बारा अधिकाऱ्यांचा उल्लेख आहे



Lecture on SB 7.6.1 -- Madras, January 2, 1976

श्री प्रह्लाद उवाच
कौमार अाचरेत प्राज्ञो
धर्मान् भागवतान् इह
दुर्लभं मानुषं जन्म
तद अपि अध्रुवम् अर्थदम् :(श्री भा ७।६।१ )

हे आहेत प्रह्लाद महाराज . ते कृष्ण भावनेच्या अधिकाऱ्यांपैकी एक आहेत . शास्त्रामध्ये बारा अधिकाऱ्यांचा उल्लेख आहे :

स्वयम्भूर नारद: शम्भु: कुमार: कपिलो मनु: प्रह्लादो जनको भीशमो बलिर वैय्यासकिर वयम् (श्री भा ६।३।२० )

धर्माच्या अधिकार्यांबद्दल यमराजांचे हे विधान आहे


धर्म म्हणजे भागवत- धर्म . मला वाटते की मी काल रात्री स्पष्ट केले आहे, धर्म म्हणजे भागवत . धर्मं तु साक्षाद् भगवत्-प्रणीतं (श्री भा ६।३।१९ ) । जसे की, आमचे मुख्य न्यायाधीश कायद्यांवर निर्णय देतात, तर कोणताही सामान्य माणूस किंवा कोणताही व्यापारी कायदा निर्माण नाही करू शकत , नाही . कायदा राज्य सरकारद्वारेच तयार केला जाऊ शकतो. कोणीही नाही बनवू शकत . ते नाही .. उच्च न्यायालयात जर कुणी अशी विनंती केली की, "सर, माझ्याकडे माझा स्वतःचा कायदा आहे," तर मग न्यायाधीश महाशय मान्य करणार नाहीत . तर त्याचप्रमाणे , तुम्ही धर्म नाही बनवू शकत . जरी तुम्ही खूप मोठी व्यक्ती असाल ... अगदी सरन्यायाधीश, ते सुद्धा कायदा करू शकत नाही. कायदा राज्याने दिला आहे.

त्याचप्रमाणे धर्म म्हणजे भागवत - धर्म . आणि इतर तथाकथित धर्म , ते धर्म नाहीत. ते स्वीकारले जाणार नाही. अगदी तशाच प्रकारे, आपल्या घरी निर्माण केलेला कायदा स्वीकारला जात नाही. म्हणून धर्मं तु साक्षाद भगवत् प्रनीतं (श्री भा ६।३।१९ ) । आणि भगवत-प्राणीतं धर्म काय आहे ? ते भगवद-गीतेत लिहिले आहे . आपण जाणतो , सर्वजण . तो आला . कृष्ण आला . त्याचे उद्दिष्ट होते धर्म-संस्थापनार्थाय , धार्मिक तत्त्वे स्थापन करण्यासाठी किंवा पुनर्स्थापना करण्याकरिता धर्मस्य ग्लानिर्भवति भारत . यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत (भ गी ४।७ ) तर कधी कधी तिथे ग्लानी आहे, धर्मांच्या तत्त्वांचा निर्वाह करण्याच्या विषयातील विसंगती. तेव्हा कृष्ण आले . परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् (भ गी ४।८ ) । युगे युगे सम्भवामि ।


तर हा धर्म, तथाकथित धर्मांची पुनर्रचना करण्यासाठी कृष्ण आला नाही: हिंदू धर्म , मुस्लिम धर्म , ख्रिश्चन धर्म , बुद्ध धर्म . नाही . श्रीमद भागवतानुसार असे सांगितले आहे , धर्म: प्रोज्जहित कैतवो(श्री भा १।१।२ )। धर्म , जो फसवण्याचे काम करतो , त्या प्रकारच्या धर्म आहे प्रोज्जहित . प्रकृष्ट रुपेन उज्जहित, म्हणजे याला बाहेर फेकले जाते किंवा काढले जाते . तर खरा धर्म आहे भागवत-धर्म आहे, वास्तविक धर्म . म्हणून प्रह्लाद महाराज म्हणतात कौमार अाचरेत प्राज्ञो धर्मान् भागवतान् इह (श्री भा ७।६।१ ) । वास्तविक धर्म म्हणजे देव, भगवंताशी आपले नाते, आणि त्या संबंधाप्रमाणे कार्य करणे जेणेकरुन आपण जीवनाचा अंतिम ध्येय प्राप्त करू शकू. तो आहे धर्म .