MR/Prabhupada 0057 - हृदयाची शुद्धी



Lecture on SB 6.1.34-39 -- Surat, December 19, 1970

रेवतीनंदन : आपण नेहमी हरे कृष्ण जपाला प्रोत्साहन देतो , बरोबर आहे ?

प्रभूपाद : हो . ती एकच पद्धत आहे या युगात . हरे कृष्ण मंत्राचा जप केल्याने एखाद्याचे ... ज्ञानाचे भांडार स्वच्छ होईल . आणि त्यानंतर तो ग्रहण करू शकतो , तो अध्यात्मिक ज्ञान ग्रहण करू शकतो . हृदय स्वच्छ केल्याशिवाय आध्यात्मिक ज्ञान समजणे आणि ग्रहण करणे खूप कठीण आहे . हे सर्व सुधारण्याचे उपाय - ब्रह्मचारी , गृहस्थ , वानप्रस्थ - या सर्व फक्त शुद्धी करण्याच्या प्रक्रिया आहेत . आणि भक्ती ही सुद्धा शुद्धीची एक विधि आहे - विधी भक्ति . पण विग्रह पूजेमध्ये स्वताला गुंतवून तो सुद्धा शुद्ध होऊन जातो . तत् परत्वे....सर्वोपाधि... मी कृष्णाचा शाश्वत सेवक आहे हे समजण्यास जेव्हा तो प्रबुद्ध होतो किंवा प्रगत होत जातो तेव्हा तो शुद्ध होतो . तो शुद्ध बनतो . सर्वोपाधि चा अर्थ आहे की तो करत नाही ...सर्वोपाधि तो त्याची उपाधी दूर करतो , त्याची पदवी . कि " मी अमेरिकन आहे " , " मी भारतीय आहे " , "मी हे आहे " , " मी ते आहे " . तर अशा प्रकारे, जेव्हा आपण जीवनाच्या या शारीरिक संकल्पनेचा पूर्णपणे नाश करू , तेव्हा निर्मलाम. तो निर्मळ बनतो , अशुद्धीरहित . आणि जो पर्यंत हि संकल्पना चालू आहे कि " मी हे आहे " , " मी ते आहे " तोपर्यंत तो ..

स भक्त: प्रकृत: स्मृत: (श्री भा ११।२।४७ ) ( बाजूला : ) नीट बस , असे नको बसू .

स भक्त: प्रकृत: स्मृत: । अर्चायाम् एव हरये (श्री भा ११।२।४७ ) .. हि पद्धत सुद्धा , जिथे ते विग्रह स्वरूपाच्या पूजेत गुंतले आहेत ,

अर्चायां हरये यत-पूजां श्रद्धायेहते (श्री भा ११।२।४७ ),, अत्यंत भाक्तीने करत आहेत , पण न तद भक्तेषु चान्येषु (श्री भा ११।२।४७ ), इतरांविषयी त्याला सहानभूती नाही किंवा त्याला माहित नाही कि भक्ताचे स्थान काय आहे , तेव्हा स भक्त: प्रकृत: स्मृत: "त्याला म्हणतात भौतिक भक्त , भौतिक भक्त ."

तर आपल्याला स्वतःला भौतिक भक्तिच्या स्तरावरून वर आणले पाहिजे . दुसऱ्या स्तरावर जिथे आपण समजू शकतो भक्त काय आहे , आणि अभक्त काय आहे , भगवंत काय आहे , नास्तिक काय आहे . हे भेदभाव तिथे आहेत . आणि परमहंस स्तरावर तिथे असे भेभाव नाहीत . तो दिसते कि प्रत्येकजन भगवंताच्या सेवेमध्ये गुंतलेला आहे . तो कोणाचा द्वेष नाही करत , तो काही पाहत नाही , कोणालाही . पण हा दुसरे टप्पा आहे. आपण अनुकरण करण्याचा प्रयत्न करू नये. परंतु आपण समजू शकतो की परमहंस ही परिपूर्णतेची उच्चतम अवस्था आहे. एक प्रचारक म्हणून आपल्याला दाखविणे आवश्यक आहे ...


ज्याप्रमाणे मी या मुलास सांगितले, "तू असा खाली बस." पण परमहंस काही म्हणणार नाहीत . परमहंस पाहतो , उलट त्याला वाटते " हा बरोबर आहे " तो पाहतो . पण आपण परमहंसांचे अनुकरण करू नये . कारण आपण उपदेशक आहोत , आपण शिक्षक आहोत , आपण परमहंसांचे अनुकरण करू नये . आपण योग्य स्रोत, योग्य अभ्यासक्रम सांगणे आवश्यक आहे

रेवातीनंदन : तुम्ही परमहंस स्तराच्याहि वर असाल प्रभुपाद .

प्रभुपद : मी तुमच्याही पेक्षा खाली आहे . तुमच्याही पेक्षा खाली आहे .

रेवतीनंदन : तुम्ही किती चांगले आहात . तुम्ही परमहंस आहात , तरीही तुम्ही आम्हाला उपदेश देत आहात .

प्रभुपाद : नाही , मी तुम्चापेक्षाही खाली आहे . मी सर्व प्राणीात्रातील निम्न स्तरावर आहे . मी फक्त माझ्या अध्यात्मिक गुरूंनी दिलेली आज्ञा पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे . बस . आणि सर्वांचा तोच व्यवसाय असला पाहिजे . सर्वोत्तम प्रयत्न करा. उच्च आदेश कार्यान्वित करण्यासाठी उत्कृष्ट प्रयत्न करा हा उन्नत होण्याचा सोपा मार्ग आहे . एखादा खालच्या स्टारवर असू शकतो , पण जर तो त्याला दिलेले कार्य पार पडण्याचा प्रयत्न करत आहे तर तो परिपूर्ण आहे . तो खालच्या स्टारवर असू शकेल , पण तो स्वतःला दिलेले कर्तव्य पार पडण्याचा प्रयत्न करत आहे म्हणून तो उत्कृष्ट आहे . तीच विचारार्ह गोष्ट आहे .