MR/Prabhupada 0059 - आपले वास्तविक कर्तव्य विसरू नका
Lecture on BG 2.14 -- Mexico, February 14, 1975
मग प्रश्न असा आहे की "जर मी सनातन आहे, तर जीवनाची इतकी दुःखी स्थिती का आहे? आणि का मला मरण येते ? तर हा प्रत्यक्षात बुद्धिमान प्रश्न आहे, की "जर मी अनंत आहे, मग मी या भौतिक शरीरात का राहतो जे मृत्यु, जन्म, वृद्धावस्था व रोगाला बळी पडते ? " म्हणून, कृष्ण सुचवतो की या भौतिक शरीरामुळे जीवन दु: खी आहे . जे कर्मी आहेत , म्हणजे जे केवळ इंद्रिय संतुष्टी मध्ये गुंतले आहेत . त्यांना कर्मी म्हणतात . कर्मी भविष्याची काळजी घेत नाही नाहीत ; त्यांना फक्त जीवनाच्या तात्काळ सुविधा हव्या आहेत. जसे पालकांच्या दुर्लक्षपणामुळे एखादा मुलगा दिवस भर खेळत राहतो . आणि भविष्यातील जीवनाची काळजी घेत नाही, कोणतेही शिक्षण घेत नाही .
पण मानवी जीवनामध्ये, जर आपण खरोखर बुद्धिमान आहोत, आपण असे शरीर मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे जिथे मृत्यू, जन्म, वृद्धत्व आणि आजार नसतील . तर कृष्ण भावना चळवळ हि लोकांना या ध्येयासाठी शिक्षित करण्यासाठी आहे . आता , एखादा असे म्हणू शकेल , जर मी केवळ कृष्ण भावनेत वाहून गेलो तर , मग माझ्या भौतिक गरजा कशा पूर्ण होतील ? " तर उत्तर भगवत-गीतेमध्ये आहे, जो केवळ कृष्ण भावाने मध्ये स्वतःला वाहून घेतो , त्याच्या जीवनातील गरजांची काळजी कृष्ण घेईल . कृष्ण प्रत्येकाच्या देखरेखीची काळजी घेत आहे. एको यो बहुनां विदधाति कामान्: एक सर्वोच्च व्यक्ती सर्व जीवित घटकांची आवश्यकता सांभाळत आहे. " तर जो भक्त घरी परत जाण्याचा प्रयत्न करीत आहे, पुन्हा ईश्वराकडे जात असेल , तिथे काही टंचाई नाही. विशवास बाळगा. कृष्ण भगवत गीते मध्ये म्हणतो,
- तेषां सतत युक्तानां योगक्षेमं वहाम्यहम् (भ गी ९।२२ ): "भक्त जो सतत माझ्या सेवेत गुंतलेला आहे , त्याच्या जीवनाची आवश्यकता कशी पूर्ण होईल त्याची मी काळजी घेतो "
एक व्यावहारिक उदाहरण म्हणजे या कृष्ण चैतन्य चळवळीमध्ये आपली शंभर केंद्रे आहेत, आणि प्रत्येक मंदिरात कमीत कमी २५ , २५० पर्यंत भाविक राहतात. तर आमच्याकडे उत्पन्नाचे स्थिर साधन नाही, आणि आम्ही सर्व शाखांमध्ये दरमहा ऐंशी हजार डॉलर खर्च करत असतो पण कृष्णांच्या कृपेने आम्हाला कशाची टंचाई नाही; सर्वकाही पुरविले जाते. लोक कधी कधी आश्चर्यचकित होतात "हे लोक काम करत नाहीत, कोणताही व्यवसाय करत नाहीत , फक्त हरे कृष्ण जपतात , ते कसे जगतात? " तर हा प्रश्नच नाही , मांजर आणि कुत्रे देवाच्या दये वर जगू शकतात तर, भगवंताच्या दयेने भाविक तर फार आरामात जगू शकतात. असा कोणताही प्रश्न नाही, पण जर कोणी असा विचार केला की, "मी कृष्ण भावनेमध्ये आलो आहे, पण मी बऱ्याच गोष्टींसाठी पीडित आहे ", त्यांच्यासाठी किंवा आपल्या सर्वांसाठी उपदेश आहे :
- मात्रास्पर्शास्तु कौन्तेय शीतोष्णसुखदु:खदा: (भ गी २।१४ )
"या वेदना आणि आनंद , हिवाळा आणि उन्हाळ्यासारख्याच आहेत." हिवाळ्यात पाणी वेदनादायक आहे आणि उन्हाळ्यात पाणी सुखकारक आहे. तर पाण्याची स्थिती काय आहे? हे सुखकारक आहे कि वेदनादायक आहे ? ते वेदनादायी नाही आणि सुखदायक सुद्धा नाही, पण विशिष्ट ऋतूमध्ये , त्वचेला स्पर्श केल्याने ते वेदनादायक किंवा सुखद वाटते . अशा वेदना आणि आनंद येथे समजावून दिलेल्या आहेत: "ते येत आहेत आणि जात आहेत.ते स्थिर नाहीत .
- " अागमापायिन: अनित्या: (भ गी २।१४ ) चा अर्थ आहे " ते येत आहेत आणि जात आहेत.म्हणून ते स्थिर नाहीत . " म्हणूनच कृष्ण सल्ला देतो , ताम्स तितिक्षस्व भारत: (भ गी २।१४ ) : "फक्त सहन कर." परंतु तुम्ही तुमचा खरा व्यवसाय विसरू नका, कृष्ण भावना या भौतिक वेदना आणि आनंदाची काळजी करू नका.