MR/Prabhupada 0060 - जीवन भौतिक पदार्थातून येऊ शकत नाही



Room Conversation with Svarupa Damodara -- February 28, 1975, Atlanta

आपण म्हणतो के जीवन , जीव जेव्हा वीर्यात असतो , आणि ते स्त्रीच्या गर्भात टाकले जाते, नंतर शरीर विकसित होते. सुरुवातीला जीवन आहे हे व्यावहारिक आहे. आणि हे जीवन परम जीवनाचा एक अंश आहे . म्हणून सुरुवात परमेश्वर आहे .

जन्माद्यस्य यत: (श्री भा १।१।१ ) । अथातो ब्रह्म जिज्ञासा । तर आपल्याला या सिद्धान्ताची या दिशाभूल झालेल्या जगात स्थापना करावी लागेल ... आणि त्याशिवाय, ते भैतिक पदार्थातून जीवन का निर्माण करू शकत नाहीत ? त्यांच्या विधानाचे मूल्य काय आहे? कि ते करू शकले नाहीत . भौतिक पदार्थातून जीवन येते याचा पुरावा कुठे आहे ? तुम्ही ते करून दाखवा .

स्वरूप दामोदर: पुराव्याचा तपास चालू आहे .

प्रभुपाद : एह ? तो मूर्खपणा आहे . तो मूर्खपणा आहे. हा पुरावा , कि जीवनातून जीवन येते याचा पुरावा आहे , अनेक पुरावे आहेत . मनुष्य, प्राणी , वनस्पती - सर्वकाही जीवनातून येत आहे . आजपर्यंत कोणीही एखाद्या मनुष्याला एखाद्या दगडातुन जन्म घेताना पहिलेले नाही . कोणीही पहिले नाही . काही वेळा त्याला म्हणतात : वृश्चिक-तण्दूल-न्याय . तुम्हाला ते माहित आहे ? : वृश्चिक-तण्दूल-न्याय . वृश्चिक म्हणजे विंचू . आणि तण्दूल म्हणजे तांदूळ . कधीकधी आम्ही पाहतो तांदूळाच्या ढीगातून , विंचू येत आहे. परंतु असे नाही की भाताने विंचूला जन्म दिला आहे. तुम्ही तुमच्या देशात पाहिलेले नाही? आम्ही ते पाहिले आहे. भातातून, तांदुळाच्या ढीगातून , एक विंचू, लहान विंचू, येत आहे. खरं म्हणजे विंचूचा पालक, ते आपली अंडी तांदळाच्या आत घालतात , आणि तयार झाल्यावर त्यातून विंचू बाहेर पडतो . असे नाही की तांदूळातुन विंचू बाहेर येत आहे. म्हणून त्याला म्हणतात वृश्चिक-तण्दूल-न्याय. वृश्चिक म्हणजे विंचू आणि तण्दूल म्हणजे तांदूळ .

तर " जीवन भौतिक पदार्थातून येते " - याला म्हणतात वृश्चिक-तण्दूल-न्याय. जीवन भौतिक पदार्थातून नाही येऊ शकत , त्याशिवाय ज्याप्रमाणे जीवन असताना , जीवाचे शरीर वाढते , शरीर बदलते किंवा वाढते , जसे तुम्ही म्हणाल . पण जर बाळ मेलं असेल किंवा मृत बाहेर आलं तर शरीर वाढू शकत नाही. म्हणजे भौतिक पदार्थ जीवनातून वाढत आहे .