MR/Prabhupada 0067 - गोस्वामी केवळ दोन तास झोपत असे



Lecture on SB 1.16.26-30 -- Hawaii, January 23, 1974


तर जी काही कृष्ण भावनामृत चळवळ पुढे जात आहे , ती श्री चैतन्य महाप्रभूच्या उदार करुणेमुळे पुढे जात आहे . या कलियुगात पिडीत झालेल्या गरीब लोकांसाठी . अन्यथा , कृष्ण भावनामृत बनणे हे इतके सोपे काम नाही , सोपे नाही . तर ते ज्यांना श्री चैतन्य महाप्रभूंच्या कृपेने कृष्ण भावनायुक्त बनण्याची संधी मिळत आहे , त्यांनी ती संधी गमावू नये . ती आत्महत्या असेल . खाली पडू नका . ते सोपे आहे . फक्त हरे कृष्ण मंत्राचा जप केल्याने , निरंतर , चौवीस तास नाही , जरी चैतन्य महाप्रभू सुचवतात ,

कीर्तनीय: सदा हरि: (चै च अादि १७।३१ ), निरंतर जप करा . तो सिद्धांत आहे .

पण आपण ते करू शकत नाही कारण आपण कलीच्या प्रभावाखाली इतके डूबलो आहोत . तर निदान सोळा माळा . हे चुकवू नका . हे चुकवू नका . काय कठीण आहे , सोळा माळा ? जास्तीत जास्त दोन तास लागतील . तुमच्याकडे चौवीस तास आहेत . तुम्हाला झोपायचे आहे ; ठीक आहे , दहा तास झोप . ते योग्य नाही . सहा तासांपेक्षा जास्त झोपू नका . पण त्यांना झोपायचं आहे . त्यांना चौवीस तास झोपायचा आहे . कलियुगात त्यांची ती इच्छा आहे . पण नाही . मग तुम्ही वेळ वाया घालवाल . खाणे , झोपणे , संभोग , बचाव कमी करा . जेव्हा ते शून्य होईल , ती आहे पूर्णता . कारण या शरीराच्या आवश्यकता आहेत . खाणे , झोपणे , संभोग , बचाव या शरीराच्या गरजा आहेत . पण मी हे शरीर नाही .

देहीनो स्मीन यथा देहे कौमारान ..(भ गी २।१३ )

तर ही समाज यायला वेळ लागेल. पण जेव्हा आपण कृष्ण भावनामृतात खरी प्रगती करत असू , आपल्याला आपले कर्तव्य माहित असले पाहिजे . सहा तासापेक्षा जास्त झोपता काम नये . फारतर आठ तास . जे नियंत्रण नाही ठेवू शकत त्यांच्यासाठी . पण दहा तास , बारा तास , पंधरा तास नाही . मग काय उपायोग आहे ? कोणीतरी एका उच्च भक्ताला भेटायला गेलेला , आज नऊ वाजता ती भक्त झोपलेला . आणि ती उच्च भक्त ? अह ? ते असे नाही का ? तर काय ...? कुठल्या प्रकारचा भक्त आहे तो ? भक्ताने सकाळी पहाटे चार वाजता उठले पाहिजे . पाच वाजेपर्यंत , त्याने आपले स्नान आणि इतर कामं संपवली पाहिजेत . मग तो जपाला सुरुवात करतो आणि अजून इतर ... चोवीस तास व्यापार असला पाहिजे . तर झोपणे योग्य नाही . गोस्वामी फक्त दोन तास झोपायचे .

मी सुद्धा रात्री पुस्तक लिहीत असतो , मी सुद्धा तीन तासपेक्षा अधिक झोपत नाही . पण मी कधी कधी थोडी अजून झोप घेतो . पण असे नाही ... मी गोस्वामीची नक्कल करत नाही .ते शक्य नाही . पण जितके शक्य होईल , प्रत्येकाने टाळले पाहिजे . आणि झोपणे टाळायचे म्हणजे , आपण जर कमी जेवू तर आपण टाळू शकतो . खाणे , झोपणे . जेवल्यांनातर झोप येते . तर आपण जर जास्त जेवलो , तर जास्त झोप येईल . जर आपण कमी जेवू तर कमी झोप येईल . खाणे , झोपणे , संभोग . आणि संभोग टाळला पाहिजे. तो मोठा अडथळा आहे . संभोग जीवन जितके शक्य तितके कमी केले पाहिजे . म्हणून आपल्याकडे हा नियम आहे , " अवैध संभोग नाही ". संभोग जीवन , आम्ही म्हणत नाही " की तुम्ही करू नका . " कोणी करू शकत नाही . म्हणून संभोग जीवन म्हणजे वैवाहिक जीवन , थोडी सूट . परवाना , " ठीक आहे , तुम्ही हा परवाना घ्या ." पण अवैध संभोग नाही . नाहीतर तुम्हाला केव्हाही शक्य होणार नाही .

तर खाणे, झोपणे, संभोग आणि बचाव . आणि बचाव , आपण इतक्या प्रकारे बचाव करत आहोत , पण तरीही , तिथे युद्ध होतात , आणि नैसर्गिक वस्तूंवर भीषण हल्ला ... तुमचा देश इतक्या छान पद्धतीने बचाव करत आहे स्वतःचा , पण आता पेट्रोल सुद्धा हिरावून घेतले आहे . तुम्ही बचाव नाही करू शकत . तसेच सर्व काही एका क्षणात हिरावले जाऊ शकते . तर बचावासाठी कृष्णावर अवलंबून राहा . अवस्य राक्सीबे कृष्ण . याला म्हणतात समर्पण . समर्पण , म्हणजे ... कृष्ण सांगतो कि " तुम्ही मला शरण या "

सर्व धर्मान परित्यज्य (भ गी १८।६६ ). यावर विश्वास ठेवा , कि

" कृष्ण सांगत आहे शरण यायला ". मला शरण येऊदे . तो संकटात माझे रक्षण करेल ". त्याला म्हणतात समर्पण .