MR/Prabhupada 0068 - प्रत्येकाला कर्म करावे लागते



Lecture on SB 6.1.45 -- Laguna Beach, July 26, 1975


निताई: "या आयुष्यात, कोणताही व्यक्ति जितक्या प्रमाणात विविध प्रकारचे कामकाज करतो , धार्मिक किंवा अधार्मिक , पुढील जन्मात सुद्धा , तोच वक्ति , त्याच प्रमाणात , त्याच प्रकारे , त्याच्या कर्माच्या परिणामी कृतीचा आनंद किंवा पीडा भोगतो . "

प्रभुपाद: येन यावान् यथाधर्मो धर्मो वेह समीहित: स एव तत्फलं भुन्क्ते तथा तावद अमुत्र वै (श्री भा ६।१।४५ ) तर मागच्या श्लोकात आपण चर्चा केली , देहवान न ह्यकर्म-कृत (श्री भा ६।१।४४ ) ज्याला हे भौतिक शरीर मिळाले आहे, त्याला कर्म करावे लागते. प्रत्येकला कर्म करावे लागते , आध्यात्मिक शरीरात देखील तुम्हाला कर्म करावे लागते . भौतिक शरीरात देखील तुमाला कर्म करावे लागते. कारण कामाचे तत्त्व आहे आत्मा - आत्मा जीवन शक्ती आहे - म्हणून तो व्यस्त आहे. जिवंत शरीर म्हणजे तिथे हालचाल आहे. काम आहे, तो निष्क्रियपणे बसू शकत नाही.

भगवद्गीते मध्ये असे म्हटले आहे, "अगदी एक क्षणही कोणी निष्क्रिय राहू शकत नाही." ते जिवंत असण्याचे लक्षण आहे. तर हे काम होत आहे विशिष्ट शरीराप्रमाणे . कुत्रा देखील चालत आहे, आणि एक माणूस देखील चालत आहे . पण माणूस असा विचार करतो की तो खूपच सुसंस्कृत आहे कारण तो मोटारगाडीवर चालत आहे. ते दोघेही धावत आहेत, पण माणसाला एका विशिष्ट प्रकारचे शरीर मिळाले आहे ज्याद्वारे तो एक वाहन किंवा सायकल तयार करू शकतो आणि तो चालवू शकतो. तो विचार करत आहे की "मी कुत्र्यापेक्षा जास्त वेगाने धावत आहे म्हणून मी सुसंस्कृत आहे." ही आधुनिक मानसिकता आहे . त्याला माहित नाही की काय फरक आहे धावण्यामध्ये पन्नास मैल वेगाने किंवा पाच मैल वेगाने किंवा पाच हजार मैल स्पीड वेगाने किंवा पाच लाख मैल वेगाने . अंतरिक्ष अमर्यादित आहे. तुम्ही कोणत्याही गतीचा शोध लावा , ती नेहमी अपुरी असेल . नेहमी अपुरी .

तर हे जीवन नाही, कि "मी कुत्र्यापेक्षा अधिक वेगाने धावू शकतो , म्हणून मी सुसंस्कृत आहे." पंथास् तु कोटि-शत-वत्सर-संप्रगम्यो वायोर् अथापि मनसो मुनि पुंगवानां सोप्य अस्ति यत्-प्रपद-सीम्नि अविचिन्त्य-तत्वे गोविन्दम् अादि पुरुषं तम् अहं भजामि (ब्र स ५।३४) आपली गती ... गती कशासाठी ? कारण आपल्याला विशिष्ट ठिकाणी जायचे आहे, हा त्याचा वेग आहे. तर खरे लक्ष्य आहे गोविंद, विष्णु . अौर न ते विदु: स्वारर्थ-गतिं हि विष्णु (श्री भा ७।५।३१ ) ते वेगवेगळ्या वेगाने धावत आहेत, परंतु त्यांना माहित नाही ,त्यांचे लक्ष्य काय आहे .

आमच्या देशातील एक महान कवी, रवींद्रनाथ टागोर, त्यांनी एक लेख लिहिला होता - मी तो वाचला होता - जेव्हा ते लंडन मध्ये होते . तर तुमच्या देशात , पाश्चिमात्य देशात , मोटर गाड्या आणि ..त्या खूप वेगाने धावतात . तर रबींद्रनाथ टागोर , ते कवी होते , ते विचार करत होते कि , " या इंग्रज लोकांचा देश इतका लहान आहे , आणि ते इतक्या वेगाने धावत आहेत ते समुद्रात पडतील ". त्यांनी अशी टिप्पणी केली . का ते इतक्या वेगाने धावत आहेत ? तर त्याचप्रमाणे आपण इतक्या वेगाने धावत आहोत नर्कात जाण्यासाठी . हि आहे आपली स्थिती , कारण आपल्याला माहित नाही आपल्याला कोठे जायचे आहे .

जर मला माहित नाही की माझे गंतव्य काय आहे आणि मी गडू पूर्ण वेगाने चालवत आहे , मग परिणाम काय असेल ? परिणाम भयानक असेल . आपल्याला माहित असले पाहिजे आपण का पळत आहोत . जसे नदी पळत आहे मोठ्या लाटेत , वाहत आहे , पण शेवटचे ठिकाण आहे समुद्र . जेव्हा नदी समुद्रात येते , तेव्हा शेवटचे ठिकाण नाहीसे होते . तर त्याचप्रमाणे , आपल्याला आपले गंतव्य स्थान माहित आपले पाहिजे . शेवटचे ठिकाण आहे विष्णू , भगवंत . आपण भगवंताचे अंश आहोत . आपण ... काही कारणामुळे , आपण या भौतिक जगात अडकलो आहोत . म्हणून आपल्या जीवांचे गंतव्य आहे परत घरी जाणे , परत भगवंताच्या धामात. ते आपले अंतिम स्थान आहे . अजून कुठले ठिकाण नाही .

तर आपली कृष्ण भावनामृत चळवळ शिकवत आहे कि " तुम्ही तुमच्या जीवनाचे ध्येय निश्चित करा ". आणि जीवनाचे ध्येय काय आहे ? पुन्हा घरी जाणे , पुन्हा भगवंताच्या धामात जाणे . तुम्ही इथे जात आहात , विरुद्ध दिशेला जात आहात , नरकाच्या दिशेला . ते तुमचे अंतिम स्थान नाही . तुम्ही या दिशेला जा , परत भगवंताच्या धामी . हाच आपला प्रचार आहे .