MR/Prabhupada 0071 - भगवंताची निष्काळजीपणे वाया गेलेली मुले



Room Conversation With French Commander -- August 3, 1976, New Mayapur (French farm)


आपण सर्व भगवंताची निष्काळजीपणे वाया गेलेली मुले आहोत . आपण भगवंताची मुले आहोत , त्यात काही शंका नाही , पण वर्तमान क्षणी आपण निष्काळजीपणे वाया गेलेलो आहोत . आपण आपलं अमूल्य जीवन वाया घालवत आहोत , आपण इतके निष्काळजी आहोत . तर कृष्ण भावनामृत चळवळ त्यांची बेपर्वाई तपासण्यासाठी आहे . आणि त्यांना परत त्यांच्या कर्तव्याकडे आणण्यासाठी , परत घरी , भगवंताच्या धामात . हे आहे कृष्ण भावनामृत .

पण लोक इतके निष्काळजी आहेत , जसे तुम्ही देवाविषयी काही बोलता , ते लगेच हसू लागतात , " ओह, हा काय मूर्खपणा आहे , देव " हि आहे सर्वात मोठी निष्काळजी . भारत देवाविषयी गंभीर होता , भारत अजूनही गंभीर आहे . आता , सध्याचे नेते , त्यांना वाटत भारतीय बिघडले आहेत , ते फक्त देवाचा विचार करत आहेत - ते अमेरिकन आणि युरोपिअन लोकांप्रमाणे आर्थिक विकासाविषयी विचार नाही करत . तर अशी परिस्थिती आहे , आणि ते खूप कठीण आहे . पण आपण मानवतेसाठी काहीतरी करू शकतो , कृष्ण भावनामृत चळवळीचा उपदेश करून . आणि ते जे भाग्यवान आहेत , ते येतील , आणि मनापासून याचा स्वीकार करतील .


ही उधळी अविवेकी मुले , आपल्याकडे कितीतरी उदाहरणे आहेत . उदाहरणार्थ , जसे एखादा पेट्रोलिम चा साठा आणि त्यांना कळले की पेट्रोलिम मूळे ते घोड्याशिवाय गाडी चालवू शकतात . तर , लाखो गाड्यांचे उत्पादन करून सर्व तेल वाया घालवा . हा आहे निष्काळजीपणा . आणि ते जेव्हा संपेल , तेव्हा मग ते रडत बसतील . आणि ते सर्व संपेल . हे असेच चालू आहे . निष्काळजीपणा .

जसे की निष्काळजी मुलगा , वडिल काही मालमत्ता सोडून गेले आहेत , वापर , फक्त वापरा . तुमच्याकडे आल्याबरोबर . लवकरात लवकर संपवा ,बस . हा आहे अविवेकीपणा . शरीरामध्ये थोडी शक्ती आहे , जसे त्याला संभोग जीवनाची चव मिळते , " ओह , खर्च करा , ती खर्च करा" , सर्व शक्ती खर्च होते . मेंदू रिकामी होतो . बाराव्या वयापासून सुरुवात , तेराव्या वर्षापर्यंत सर्व संपले . मग तो षंढ बनतो . आमच्या लहानपणी - आमच्या लहानपणी म्हणजे जवळ जवळ ऐंशी वर्षांपूर्वी , किंवा समजा शंभर वर्षांपूर्वी - तेव्हा मोटर गाडी नव्हती . आणि आता , तुम्ही जिथे जिथे जाल , कोणत्याही देशात , तुम्हाला हजारो लाखो गाड्या दिसतात. हा आहे अविवेकीपणा . शंभर वर्षांपूर्वी त्यांचे गाडी शिवाय चालत होते . आणि आता ते गाडी शिवाय जगू शकत नाही .


अशा प्रकारे , ते गरज नसताना जीवनातल्या शारीरिक किंवा भौतिक गरजा वाढवत आहेत . हा आहे अविवेकीपणा . आणि नेते , जो त्यांना हा अविवेकीपणा करण्यासाठी उत्साहित करेल , ते उत्तम नेतृत्व आहे . आणि कोण म्हणू शकतो , " हा मूर्खपणा थांबवा , कृष्ण भावनामृतात या " , कोणालाही पर्वा नाही . अंधा यथान्धैर् उपनीयमानास् ते अपीश-तंत्रयाम् उरु-दाम्नि बद्धा: (श्री भा ७।५।३१) याला म्हणतात आंधळा नेता आंधळ्या अनुयायांचे नेतृत्व करत आहे . त्यांना माहित नाही की ते दोघेही निसर्गाच्या कडक नियमांनी बांधलेले आहेत . (विश्रांती ) ... निसर्गाचा नियम कसा चालू आहे . ते पूर्णपणे अज्ञानात आहेत . त्यांना काहीच माहिती नाही . हि आहे आधुनिक संस्कृती . निसर्गाचा नियम त्याच्या पद्धतीने चालतो . तुम्ही त्याची काळजी घ्या किंवा नका घेऊ , तो तुमचा प्रश्न आहे . पण निसर्गाचा नियम काम करत राहील .

प्रकृते: क्रियमाणानि गुणै: कर्माणि सर्वश: (भ गी ३।२७ ) ।

पण हे धूर्त , त्यांना माहित नाही निसर्गाचा नियम कशा प्रकारे काम करेल . ते कृत्रिमरित्या मूर्खाप्रमाणे निसर्गाच्या नियमांवर मात करण्याचा प्रयत्न करत आहेत. हे विज्ञान आहे , धूर्तांचे विज्ञान , जे अशक्य आहे , पण ते प्रयत्न करत आहेत . याला म्हणतात धुर्तपणा . मूर्खपणा . वैज्ञानिक असे म्हणत नाहीत का ? " आम्ही मात करण्याचा प्रयत्न करत आहोत ". धूर्तांनो , तुम्ही ते कधीच करू शकत नाही . पण हा धुर्तपणा चालू आहे . आणि ते त्याची स्तुती करत आहेत , " ओह , खूप छान , खूप छान , खूप छान ". " ओह , तुम्ही चंद्र ग्रहावर जात आहात ". पण सर्व प्रयत्नांनंतर , द्राक्षे आंबट आहेत : " ते काही उपयोगाचे नाही ". बस . तुम्हाला गोष्ट माहित आहे का ? कोल्ह्याची ? तो द्राक्षे मिळवण्याचा प्रयत्न करतो , उड्या मारतो , मारतो , मारतो , जेव्हा तो अपयशी होतो , तो म्हणतो , " ओह ,हे काही उप्याचे नाही . द्राक्षे आंबट आहेत , काही फायदा नाही " ( हशा ) तर ते असेच करत आहेत . कोल्हे उड्या मारत आहेत , बस . आणि आपण पाहतोय हे लबाड कसे व्यर्थ उड्या मारत आहेत ( हशा ).

तर आपण लोकांना सल्ला देत आहोत , या मूर्ख कोल्ह्यांचे अनुकरण न करण्याचा . शहाणे बना आणि कृष्ण भावनेत या . त्याने तुमचे जीवन सफल होईल .