MR/Prabhupada 0074 - तुम्ही प्राण्यांना का भक्ष्य बनवत आहात?
Lecture on BG 4.21 -- Bombay, April 10, 1974
भग्वद्गीते मध्ये सर्व वर्णन केले आहे भगवद्गीता असे सांगत नाही कि " तुम्ही हवा खाऊन जागा " नाही . भगवद गीता सांगते , अन्नाद भवंती भूतानी (भ गी ३।१४ ) अन्न . अन्न म्हणजे धान्य . आपल्याला धान्याची गरज आहे . अन्नाद भवंती भूतानी . भगवद्गीता कधीही सांगत नाही " तुम्हाला जेवणाची गरज नाही. तुम्ही फक्त हवा खा आणि योग अभ्यास करा . " नाही . पण आपण खुप जास्त किंवा खुप कमी सुद्धा खाता कामा नये . तसे सुचवले आहे . युक्ताहार-विहारस्य (भ गी ६।१७ ) . आपण जास्त किंवा कमी खाता कामा नये . आणि निराशी: (भ गी ४।२१ ) .
निराशी: म्हणजे अवास्तव आशांपासून मुक्त असणे .
आता आपण अधिकाधिक इंद्रिय तृप्तीची इच्छा बाळगत आहोत . त्याची गरज नाही आहे . जर तुम्हाला जीवनात पूर्णता हवी असेल तर त्याला तपस्या म्हणतात . प्रत्येकाला इच्छा असते पण त्याने अनावश्यक इअछा बाळगू नये . प्रत्येकाला जेवणाचा हक्क आहे , प्राण्यांनासुद्धा . प्रत्येकाला हक्क आहे पण आपण अधिक आनंद घ्याव्या मागे आहोत , म्हणून आम्ही प्राण्यांना नीट जगण्याची संधी देत नाही आहोत ; उलट आपण त्यांना खाण्याचा प्रयत्न करत आहोत . ह्याची गरज नाही आहे . त्याला म्हणतात निराशी: का तुम्ही प्राण्यांना खावं ? ते असभ्य जीवन आहे . जेव्हा अन्न नसेल , किंवा ते आदिवासी आहेत तर ते मांस खाऊ शकतात , कारण त्यांना धान्य कसे उगवायचा ते माहित नसते . पण जेव्हा मनुष्य समाज सुसंकृत बनतो , तो खूप चांगले पदार्थ बनवू शकतो , तो गायींना खाण्याऐवजी , गायींना पाळू शकतो . तो पुरेसे दूध मिळवू शकतो . आपण दूध आणि धान्यापासून किती सारे पदार्थ बनवू शकतो . तर आपण गरज नसताना अधिक भोगाची इच्छा बाळगू नये . मग त्याला म्हणतात
- कुर्वन नाप्नोति किलबिशं (भ गी ४।२१ ) किल्बिशं म्हणजे पापयुक्त जीवनाचे परिणामी फळ . किल्बिशं .
तर जर आपण आपल्या गरजेपेक्षा अधिक इच्छा केली नाही तर , आपण पापयुक्त कर्मांमध्ये गुंतणार नाही , कुर्वन अपी , जरी तो कर्म करण्यात गुंतला असेल तरीही. तुम्ही कर्म करताना , जनातेपणाने किंवा अजाणपणे तुम्हाला काही कर्म करावे लागतात जे पवित्र नाहीत , पापयुक्त आहेत , पण जर तुम्ही फक्त योग्य पद्धतीने जगण्याची इच्छा धरली , तर कुर्वन नाप्नोति किलबिशं (भ गी ४।२१ ). आपले जीवन पापाच्या प्रीतिक्रियेपासून मुक्त असायला हवे . नाहीतर आपल्याला परिणाम भोगावे लागतील . पण ते विश्वास ठेवत नाहीत , जरी त्यांनी अनेक घृणास्पद जीवन पहिले आहेत . ते कुठून येत आहेत , ८४,00,000 योनींमधून ? खूप सारे असे जीव आहेत जे घृणास्पद स्थितीत जगात आहेत . साहजिकच , प्राणी किंवा जीवित जीव समजू शकत नाहीत , पण आपण मनुष्य आहोत , आपल्याला कळले पाहिजे कि हे जीवन घृणास्पद का आहे . ते मायेचे मोहजाळ आहे . जरी एखादा , जसे .. डुक्कर अतिशय घाण स्तिथीत जगतो , विष्टा खातो , आणि तरीही , त्याला वाटते की तो आनंदी आहे , आणि म्हणून जाड बनत जातो . जेव्हा एखादा विचार करतो , "मी आनंदी आहे ," तो जाड बनत जातो . तर तुम्हाला आढळेल हे डुक्कर , ते खूप जाड असतात , पण ते काय खात आहेत ? ते विष्टा खात आहेत आणि घाणेरड्या जागेत जगत आहेत . पण त्यांना वाटते की " आम्ही खूप सुखी आहोत " तर हे मायेचे मोहजाळ आहे . कोणीही जो खूप घृणास्पद परिस्थिती जीवन जगत आहे , मायेमुळे , भ्रमामुळे , त्याला वाटत आहार कि तो योग्य आहे , तो योग्य जीवन जगत आहे .
पण मनुष्य जो उच्च स्तरावर आहे , त्याला दिसते की तो खूप घृणास्पद जीवन जगत आहे . तर हा भ्रम तिथे असतो , पण ज्ञानाने , चांगल्या संगतीने , शास्त्रांकडून उपदेश घेऊन , गुरूंकडून , संत पुरुषाकडून , त्याने हे समजून घेतले पाहिजे की जीवनाचे मूल्य काय आहे आणि तसे जगले पाहिजे . तर हे कृष्णाने सांगितले आहे ,कि , निराशी: , एखाद्याने अनावश्यक इच्छे पासून मुक्त राहिले पाहिजे , त्याच्या जीवनातल्या गरजांपेक्षा अधिक इच्छानपासून मुक्त . याला म्हणतात निराशी : . निराशी : . दुसरा अर्थ आहे भौतिक अनंदाची आवड नसलेला . आणि हे शक्य आहे जेव्हा त्याला पूर्ण ज्ञान असेल कि " मी हे शरीर नाही . मी जीवात्मा आहे . माझी आवश्यकता आहे आध्यात्मिक ज्ञानात अग्रेसर कसे व्हावे ." मग तो निराशी : बनू शकतो . हि तपस्या , साधना , प्रायश्चित करण्याची साधने आहेत . लोकांना आता विसर पडला आहे . त्यांना माहित नाही तपस्या काय आहे . पण मनुष्य जीवन त्याच उद्देशासाठी बनले आहे .
- तपो दिव्यम पुत्रका येन शुध्येत सत्वमं येन ब्रह्म सौख्य अनंतं (श्री भा ५।५।१ )
हे शास्त्राचे निर्देश आहेत . मनुष्य जीवन हे तापस्येसाठी आहे . आणि तपस्या ... म्हणून वेदिक मार्गातल्या जीवनात , सुरुवातीचे जीवन तपस्येचे असते , ब्रह्मचारी , ब्रह्मचर्य . विद्यार्थाला ब्रह्मचर्य सरावासाठी गुरुकुलात पाठवले जायचे . हि तपस्या आहार , ऐशोरामाचे जीवन नाही . जमिनीवर झोपाने , गुरुंसाठी दारो दार जाऊन दान मागणे . पण ते थकत नाहीत . कारण ते लहान असताना , जर त्यांना या तपस्या शिकवल्या त्यांना त्याची सवय होते . ते प्रत्येक स्त्रीला "आई " म्हणतात . " आई मला थोडी भिक्षा दे . " आणि ते गुरूंच्या घरी परत येतात . सर्व काही गुरूंचे आहे . हे ब्राह्मचारीचे जीवन आहे . हि आहे तपस्या . तपो दिव्यम (श्री भा ५।५।१ ) . हि वेदिक संस्कृती आहे , त्या मुलांना लहानपणापासून तपस्या , ब्रह्मचर्य याची साधना शिकवली पाहिजे . ब्रह्मचर्य . ब्रह्मचारी तरुण मुलीकडे पाहू शकत नाही . गुरूंची पत्नीसुद्धा तरुण असेल तर , तो गुरूंच्या पत्नीजवळ जाऊ शकत नाही . हि बंधने आहेत . आता असे ब्रह्मचर्य तप कुठे आहे ? ब्रह्मचारी अस्तित्वात नाहीत . हे आहे कली युग . तपस्या अस्तित्वात नाही .