MR/Prabhupada 0075 - तुम्ही गुरूंकडे गेलेच पाहिजे



Lecture on SB 1.8.25 -- Mayapur, October 5, 1974


जेव्हा एखादा उच्च स्तरावरील प्रश्नांची चौकशी करण्यासाठी जिज्ञासू असतो ब्रह्म जिज्ञासा , मग त्याला एका गुरूंची आवश्यकता असते . तस्माद गुरुं प्रपद्येत : "तुम्ही आता उच्च स्तरावरील ज्ञायाविषयी जिज्ञासु आहात तर तुम्ही गुरूंकडे गेले पाहिजे " तस्माद गुरुं प्रपद्येत . कोण ? जिज्ञासू श्रेय उत्तमम . उत्तमम . उत्तमम म्हणजे अंधाराच्या पलीकडचे . हे सर्व जग अंधारमय आहे . तर ज्याला अंधाराच्या पलीकडे जयचे आहे . तमासी मा ज्योतिर्गम . वेदिक निर्देश सांगतात : " स्वतःला अंधारात ठेवू नका , प्रकाशाकडे जा " हा प्रकाश ब्राह्मण आहे , ब्रह्म जिज्ञासा . तर जो जिज्ञासू आहे ... उत्तम ...उद्गता तम् यस्मात . उद्गता तम् . तम् म्हणजे अज्ञान . तर आध्यात्मिक जगात अज्ञान नाही . ज्ञान . मायावादी तत्त्व सांगते , ते फक्त म्हणतात , ज्ञान , ज्ञानवान . पण ज्ञान एकाच पद्धतीचे नाही .

ज्ञानाचे विविध प्रकार आहेत . जसे वृंदावनात , तिथे ज्ञान आहे पण भिन्न प्रकारामध्ये . काहींना कृष्णावर त्याचा सेवक बनून प्रेम करायचे आहे ।. काहींना कृष्णाला मित्र बनवून प्रेम करायचे आहे . काहींना कृष्णाच्या ऐश्वर्य पाहून त्याची योग्यता पाहायची आहे . काहींना कृष्णाचे आई आणि वडील बनून त्याच्यावर प्रेम करायचे आहे . काहींना कृष्णावर वैवाहिक साथीदार एक प्रेमी म्हणून प्रेम करायचे आहे . काही हरकत नाही . तर काहींना कृष्णाच्या शत्रूच्या रुपात त्याच्यावर प्रेम करायचे आहे . जसे कंस . ती सुद्धा वृंदावनातली एक लीला होती . तो नेहमी कृष्णविषयीच विचार करायचा विविध पद्धतीने , कृष्णाला कसे मारायचे . पुतना , ती सुद्धा कृष्णावर प्रेम दाखवण्यासाठी आली , त्याला आपले दूध पाजण्यासाठी . पण खरी इच्छा होती की कृष्णाचा वध करायचा आहे . पण ते सुद्धा एक अप्रत्यक्ष प्रेम म्हणून स्वीकारले जाते , अप्रत्यक्ष प्रेम . अन्वयात .

तर कृष्ण जगद गुरु . तो मूळ शिक्षक आहे . हा शिक्षक स्वतः भगवद्गीतेत शिकवत आहे आणि आपण मूर्ख ते धडे शिकत नाही आहोत . पहा .म्हणून आपण मूढ आहोत . जो जगद गुरु कडून शिकवण घेण्यास अपात्र आहे तो मूढ आहे . म्हणून आपली परीक्षेचं प्रमाण आहे की : जर एखाद्याला कृष्ण माहित नाही, जर एखाद्याला भगवद गीता कशी अनुसरावी हे माहित नसेल , तर आपण त्वरित त्याला मूर्ख म्हणून संबोधू शकतो . फरक पडत नाही , तो पंतप्रधान असो किंवा उच्च न्यालायचा न्यायाधीश असो , किंवा ...नाही " नाही ते पंतप्रधान आहेत , ते उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहेत . तरी ते मूर्ख आहेत ?" हो . "कसे ?

माययापहृत ज्ञान: (भ . गी . ७.१५ )" (भ गी ७।१५ )

त्याला कृष्णविषयी काहीच ज्ञान नाही , त्याला मायेने बांधले आहे "

माययापहृत ज्ञाना आसुरं भावं आश्रित: (भ . गी . ७.१५ )" (भ गी ७।१५ )

म्हणून तो मूढ आहे . तर सरळ शिकवण द्या . साहजिकच तुम्ही हे सर्व नाजूक भाषेत सांगू शकता म्हणजे एखादा उद्विग्न होणार नाही , पण एखादा जो कृष्णाला जगद गुरु म्हणून ओळखत नाही आणि त्याची शिकवण स्वीकार करत नाही तो मूर्ख आहे . जसे जगन्नाथ पुरी मधले हे मूर्ख . ते म्हणतात " तुम्ही दुसरा जन्म घ्या . मग तुम्ही ..." ते मूढ , त्यांना मूर्ख म्हणून गृहीत धरा . का ? तो जगद गुरु आहेत , ते सुद्धा म्हणत आहेत " मी जगद गुरु आहे " पण ते जगद गुरु नाहीत . त्याने जगत काय आहे हे सुद्धा पहिले नाही आहे . तो बेडूक आहे . आणि तो जगद गुरु असल्याचा दावा करत आहे . तर तो मूढ आहे . कृष्ण म्हणतो . तो मूढ आहे कारण त्याने कृष्णाने दिलेली शिकवण स्वीकारली नाही आहे .