MR/Prabhupada 0088 - आमच्याकडे जे विद्यार्थी सामील झाले आहेत , त्यांना श्रवणाचा विधी दिला आहे
Lecture on BG 7.1 -- San Diego, July 1, 1972
ब्रह्म म्हणतात. ब्रह्मांचा अनुभव ... ते या विश्वातील सर्वोच्च प्राणी आहे. त्यांनी म्हटले की, "जेव्हा एखादी व्यक्ती अनुमान करण्याची मूर्खपणाची सवयी सोडेल ...
ज्ञाने प्रयासम् उदपास्य (श्री भा १०।८४।३)."
त्याला नम्र होणे आवश्यक आहे. एखाद्याने असे दाखवू नये कि त्याला काही माहीत आहे , तो काही भविष्य सांगू शकतो , तो काहीतरी शोध लावू शकतो. तथाकथित शास्त्रज्ञांप्रमाणेच , ते फक्त तर्क लावत आहेत आणि परिश्रम वाया घालवत आहेत. आपण काहीही करू शकत नाही. सर्वकाही आधीच ठरलेले आहे. आपण ते बदलू शकत नाही. आपण फक्त पाहू शकतो , कायदा कसे कार्य करतो .तेवढेच तुम्ही करू शकता . परंतु आपण कायदा बदलू शकत नाही किंवा आपण कायद्यासाठी चांगली सुविधा बनवू शकत नाही . नाही ते आपण करू शकत नाही.
- दैवि ह्येषा गुणमयी मम माया दुरत्यया (भ गी ७।१४) .
दुरत्यया . म्हणजे, ते फार अवघड आहे. म्हणून चैतन्य महाप्रभु, जेव्हा त्यांना ब्रह्माच्या या विधानाबद्दल कळले , कि एखाद्याने तर्काची पद्धत सोडली पाहिजे , की तो काहीतरी तयार करू शकतो ... या मूर्खपणाच्या सवयी सोडल्या पाहिजेत. तो खूप विनम्र झाला पाहिजे. गवतापेक्षा नम्र . जसे आपण गवत तुडवत जातो पण ते निषेध करत नाही. "ठीक आहे, प्रभू , तुम्ही जा." या प्रकारची नम्रता. तृणद् अपि सुनिचेन तरोर् अपि सहिष्नुना (सिक्षाश्टकं ३) । तरु चा अर्थ आहे वृक्ष . वृक्ष इतके सहनशील आहेत . तर चैतन्य महाप्रभु म्हणतात , ज्ञाने प्रयासम् उदपास्य नमन्त एव. . . "किंवा मग मी तर्काच्या प्रक्रियेस सोडून देतो आणि मी नम्र होतो तुम्ही सांगाल तसे . मग माझे पुढील कर्तव्य काय आहे?" पुढील कर्तव्य आहे: नमन्त एव, नम्र राहणे ,
- सन्-मुखरितां भवदीय-वार्तां (श्री भा १०।८४।३),
आपण एखाद्या भक्ताकडे जावे, आणि आपल्याला त्याच्याकडून ऐकायला हवे. स्थाने स्थिता: तुम्ही तुमच्या जागेवर रहा .तम्ही अमेरिकन रहा तुम्ही भारतीय रहा , तुम्ही ख्रिश्चन रहा , तुम्ही हिंदू रहा . तुम्ही काळे रहा . तूम्ही पांढरे रहा. तुम्ही स्त्री, पुरुष, जे काही तुम्ही आहात तू रहा . फक्त आपण ज्ञानी आत्म्याद्वारे केलेल्या प्रवचनांकरता आपले कान अर्पण करा . हे अनुकरणीय आहे . आणि जेव्हा तुम्ही ऐकता, तेव्हा तुम्ही चिंतन देखील करता . जसे तूम्ही ऐकत आहात . जर तुम्ही चिंतन केले कि "स्वामीजी काय म्हणाले?"
- स्थाने स्थिता: श्रुति-गतां तनु-वान् मनोभी:(श्री भा १०।८४।३)
श्रुति-गतां. श्रुति म्हणजे फक्त कानाने ग्रहण करणे . जर तुम्ही चिंतन केले आणि शरीर, मन याद्वारे समजण्याचा प्रयत्न केला तर हळूहळू तुम्ही ... कारण तुमचा उद्देश आहे स्व ची ओळख करणे. तर स्व म्हणजे मूळ स्वत्व . सर्वोच्च देव, परमातमा . तो परम मूळ आहे. आम्ही त्याचे भाग आहोत. तर या प्रक्रियेद्वारे , चैतन्य महाप्रभु म्हणतात, देव, अजित, ज्यावर कधीच विजय मिळवता येत नाही ... जर तुम्ही ... आव्हान करून, जर तुम्हाला देवाला जाणून घ्यायचा असेल तर तुम्हाला तो कधीही समजणार नाही देव कधीही आव्हान स्वीकारत नाही कारण देव महान आहे, त्याने तुमचे आव्हान का स्वीकारावे ? जर आपण असे म्हणालो की, "अरे देवा, इथे ये. मी तुला भेटू इच्छितो " तर देव असा नाही आहे, तो तुमच्या आज्ञेचे पालन नाही करणार . तुम्ही त्याच्या आज्ञेचे पालन केले पाहिजे . मग ईश्वर बोध होईल . ईश्वर म्हणतो: "तू शरण ये ,
सर्व धर्मान्परित्यज्य मामेकं शरणं व्रज (भ गी १८।।६६) . या पद्धतीने आपण देव जाणून घ्याल. असे म्हणून नाही कि "मला देव जाणून घ्यायचा आहे. माझ्याकडे चांगली बुद्धिमत्ता आहे, तर्क आहे." नाही. तर हे ऐकणे ... आपण श्रवणाबद्दल बोलत आहोत. हि श्रवणाची प्रक्रिया खूप महत्त्वाची आहे. आमच्या सर्व संस्था, हि कृष्ण भावनामृत चळवळ , पसरली आहे कारण जे विद्यार्थी आम्हाला सामील झाले आहेत . त्यांना श्रावणाची दीक्षा दिली आहे ,ऐकून . श्रवणाणे स्वतःमध्ये पूर्णपणे बदल झाला आहे आणि ते संपूर्ण मनाने सहभागी झाले , आणि ... ते चालूच आहे . तर श्रवण खूप महत्त्वाचे आहे. आम्ही इतके केंद्र उघडत आहोत , लोकांना परम तत्त्वाचा संदेश ऐकण्याची संधी देण्यासाठी . तर तुम्ही ती संधी साधा , मला म्हणायचे आहे या श्रवणाचा फायदा उचला .