MR/Prabhupada 0089 - कृष्णा यांच्या तेज सर्व स्त्रोत आहे



Lecture on BG 4.24 -- August 4, 1976, New Mayapur (French farm)

फ्रेंच भक्त: याचा अर्थ काय होतो जेव्हा श्रीकृष्ण म्हणतात "मी त्यांच्या मधे नाही आहे."?

प्रभुपाद: हूह ? "मी त्यांच्या मधे नाही" कारण आपण तेथे पाहू शकत नाही . श्रीकृष्ण तिथे आहेत, पण तुम्ही त्यांना पाहु शकत नाही. तुम्ही प्रगत नाही आहात. नुकतेच आणखी एक उदाहरण आहे. येथे, सूर्यप्रकाश येथे आहे. प्रत्येकास अनुभव आहे. पण याचा अर्थ असा नाही सूर्य येथे आहे. हे स्पष्ट आहे? सूर्य येथे आहे याचा अर्थ ... सुर्यप्रकाश येथे आहे याचा अर्थ सूर्य येथे आहे . पण तरीही, कारण आपण सूर्यप्रकाशात आहात, तुम्ही म्हणू नाही शकत "आता मी सूर्याला हस्तगत केले आहे." सूर्यप्रकाश सूर्यात विद्यमान असतो, पण सूर्य सूर्यप्रकाशात उपस्थित नसतो. सूर्याशिवाय सूर्यप्रकाश नाही. याचा अर्थ असा नाही की सुर्यप्रकाश सूर्य आहे . त्याचवेळी, आपण म्हणू शकतो सुर्यप्रकाश म्हणजे सूर्य. ह्याला म्हणतात अचिन्त्य​-भेदाभेद​, एकाचवेळी एक आणि भिन्न. सूर्यप्रकाशामध्ये आपल्याला सूर्याची उपस्थिती वाटते, पण जर तुम्ही सूर्याच्या ग्रहात प्रवेश करू शकलात, तुम्ही सूर्यदेवाला सुद्धा भेटू शकता. प्रत्यक्षात, सूर्यप्रकाश म्हणजे सूर्य ग्रहात राहणार्‍या व्यक्तीच्या शरीरातील किरणे. ते ब्रह्म्-संहिता मध्ये स्पष्ट केले आहे, यस्य प्रभा प्रभवतो जगदण्ड​-कोटि (ब्र.सं. ५.४०) श्रीकृष्णांमुळे.... आपण श्रीकृष्णांचे तेज येताना बघितले असेल. ते सर्वांचे स्रोत आहे. त्या तेजाचा विस्तार म्हणजे ब्रह्मज्योती, आणि त्या ब्रह्मज्योती मध्ये, असंख्य अध्यात्मिक ग्रह, भौतिक ग्रह, उत्पन्न होतात. आणि प्रत्येक आणि सगळ्या ग्रहांमध्ये वेगळ्या प्रकारचे सादरीकरण आहे. प्रत्यक्षात, मूळ आहे श्रीकृष्णांच्या शरीरातील किरणे, आणि शरीराची मूळ किरण श्रीकृष्ण आहेत.