MR/Prabhupada 0090 - पद्धतशीर व्यवस्थापन - नाहीतर इस्कॉन कसे चालेल



Morning Walk -- December 5, 1973, Los Angeles


प्रभुपाद: प्रत्येकजण कृष्णाच्या कुटंबातील आहे, पण आपण हे पाहिलं पाहिजे की तो कृष्णासाठी काय करत आहे. जसे प्रत्येकजण हा राज्याचा नागरिक आहे. माणसांना का उच्च पद आणि मोठे शीर्षक दिले आहे?

प्रभुपाद: का? कारण तो तसा आहे.

सुदामा: बरोबर.

प्रभुपाद: म्हणून प्रत्यकाने सेवा केली पाहिजे. असं वाटण्यासाठी की," मी कृष्णाच्या परिवारातील आहे."आणि कृष्णासाठी काही करत नाही, हे नाही...

सुदामा: ते चांगलं नाही.

प्रभुपाद: ते चांगलं नाही. ते म्हणजे तो... तो लवकरच कृष्णाला विसरेल. तो पुन्हा विसरू शकेल.

सुदामा:खरंतर दुसरा घटक जास्त शक्तिशाली आहे,ह्या माणसांनी येथे कारण, जरी ते कृष्णाच्या कुटुंबाचा भाग असले. पण कारण ते विसरले आहेत,मग आपण त्याच्या विस्मृतीमुळे प्रभावित होतो.

प्रभुपाद: हो विसरणे म्हणजे माया.

सुदामा: हो.

प्रभुपाद: माया म्हणजे दुसरं काही नसून. विस्मरण आहे. एवढच. तिला अस्तित्व नाही.विसरभोळेपणा,ती टिकू शकत नाही. पण जोपर्यंत ती आहे , ती फार त्रासदायक आहे.

सुदामा: मला एका भक्ताने प्रश्न विचारला होता.कधीकधी त्यांना प्रसन्न वाटत नाही. जर त्यांना प्रसन्न वाटत नसेल मानसिकदृष्टया, तरी त्यांनी कृष्णभवनामृत संघात येणं चालू ठेवलं पाहिजे. मी त्यांना सांगितलं, जरी कोणी नाखूष असेल...

प्रभुपाद: पण आपल्या उदाहरणावरून दाखवून द्यायचं. जर तुम्ही वेगळ्या उदाहरणाने दाखवले,तर ते तुमचे अनुसरण कसे करतील? नियमापेक्षा उदाहरण चांगले.तुम्ही बाहेर का रहात आहात?

सुदामा: तसेच,मी...

प्रभुपाद:(विराम)... गेल्यावेळी मी खूप आजारी होतो,मला हे जागा सोडावी लागली. त्याचा अर्थ असा नाही कि मी संघ सोडू शकेन. मी भारतात गेलो आणि इलाज केला,किंवा लंडनला आलो.ते ठीक आहे. जरी तब्बेत कदाचित कधीतरी... पण त्याचा अर्थ असा नाही कि आपण संघ सोडायचा. जर माझी तब्बेत इथे बरी राहात नसेल,मी जातो...माझ्याकडे शंभर केंद्र आहेत. आणि आपण ह्या विश्वाच्या बाहेर आपलं आरोग्य सुधारण्यासाठी जाऊ शकत नाही. तुम्हाला ह्या विश्वात राहूनच आरोग्य सुधारावे लागेल. मग तुम्ही संघातून बाहेर का सोडता. (विराम)... श्री. नरोत्तम दास ठाकूर. आपण भक्तांच्या संगात राहिले पाहिजे. मी माझे कुटुंब का सोडले? कारण ते भक्त नव्हते. म्हणून मी आलो... नाहीतर,म्हातारपणात,मी आरामदायी आयुष्य जगलो असतो. नाही. आपण अभक्तां बरोबर राहू नये,जरी ते कुटुंबातील असले किंवा इतर. महाराज बिभीषणानं सारखे. कारण त्याचा भाऊ भक्त नव्हता,त्यांनी त्याला सोडले, ते रामचंद्रांकडे आले. बिभीषण. तुला ते माहित आहे का?

सुदामा:हो. ह्रिदयानंद: प्रभुपाद,असं म्हणतात की संन्याशाने एकांतवासात राहिले पाहिजे,ते म्हणजे,फक्त भक्तांबरोबर.

प्रभुपाद: कोण...! संन्याशाने एकांतवासात राहील पाहिजे असं कुठे म्हंटलं आहे?

ह्रिदयानंद:म्हणजे. कधीकधी तुमच्या पुस्तकात.

प्रभुपाद:ते

ह्रिदयानंद: कधीकधी तुमच्या पुस्तकात. ते म्हणजे भक्तांबरोबर?

प्रभुपाद: सामन्यात:, संन्याशी एकांतवासात जगू शकतात. पण उपदेश करणे हे संन्याशांचे कर्तव्य आहे.

सुदामा : मी ते कधीही थांबवू इच्छित नाही.

प्रभुपाद: खरंच?

सुदामा: मी प्रचारकार्य कधीही थांबवू इच्छित नाही.

प्रभुपाद: उपदेश, तुम्ही नेहमी शास्त्रालाधरून उपदेश केला पाहिजे. तुम्ही आपल्या गुरूच्या आज्ञेनुसारच उपदेश केला पाहिजे. तुम्ही तुमच्या मनानुसार उपदेश करू शकत नाही. ते गरजेचं आहे. कोणीतरी गुरु असणे आवश्यक आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली. यस्य प्रसादात भागवत... असं का म्हटलंय? सगळीकडे, कार्यालयात, तिथे कोणीतरी मालक असतो. तुम्हाला त्याला खुश ठेवावं लागत. ते सेवा आहे. समाज कार्यालयात,एका विभागात त्या विभागाचा मुख्य. आणि तुम्ही तुमच्या मानाने काम केले,"हो मी माझ्या मानाने काम कारेन," आणि तुमच्या कामाने मालक खुश नसेल, असं तुम्हाला वाटत का की ह्या प्रकारची सेवा चांगली आहे. त्याचप्रमाणे, आपल्याला मिळालाय, सगळीकडे आपल्याला कोणीतरी मालक असतो. म्हणून आपण असे काम केले पाहिजे.की जे व्यवस्थित असेल. जर प्रत्येकाने त्याचा स्वतःच्या आयुष्याचा मार्ग शोधला किंवा निर्माण केला,तर मग नक्कीच अंधाधुंदी माजेल.

सुदामा: हो, ते खरंय.

प्रभुपाद: हो. आता आपली जागतिक संस्था आहे. तेथे अध्यात्मिक बाजू आहे, आणि भौतिक बाजू पण आहे. ती भौतिक बाजू नाही.ती अध्यात्मिक बाजू आहे, म्हणजे व्यवस्थित व्यवस्थापन. नाहीतर हे कसे केले जाईल? ज्याप्रमाणे गौरसुंदरने विकले,आणि आता त्या पैशाचा ठावठिकाणा लागत नाही. हे काय आहे? त्याने त्याविषयी कोणाला विचारले नाही. त्याने घर विकले, आणि पैसे कुठे गेले,त्याचा पत्ता नाही.