MR/Prabhupada 0102 - मनाचा वेग



Lecture on SB 5.5.1-8 -- Stockholm, September 8, 1973

आता तुमच्याकडे विमान आहे. फारच छान. पण तरीही तुम्ही भौतिक ग्रहांवर पोहचू शकणार नाही . म्हणून जर तुम्हाला अध्यात्मिक ग्रहावर जायचे असेल तर, तुम्ही असे विमान बनवा की ज्याला मनाचा वेग असेल . किंवा वाऱ्याचा वेग असेल. जे भौतिकशास्त्रज्ञ आहेत ,त्यांना वाऱ्याचा वेग काय आहे हे माहीत आहे,प्रकाशाचा वेग काय आहे, ह्या सगळ्यावर ,मनाचा वेग आहे. जे भौतिकशास्त्रज्ञ आहेत, त्यांना वाऱ्याचा आणि प्रकाशाचा वेग काय आहे हे माहीत आहे. मन हे त्या पेक्षाही वेगाने धावते. तुम्हाला हा अनुभव आहेच. आता तुम्ही इथे बसलेले आहेत. लगेच, एका सेकंदात,तुम्ही अमेरिका,यू एस ए,भारतात जाऊ शकता, लगेच. तुम्ही तुमच्या घरी गेलात. तुम्ही काही गोष्टी बघितल्या - अर्थात, मानाने; मनाचा वेग. म्हणून ब्रह्म-संम्हिता सांगते की जरी तुम्ही अस एक विमान तयार केलत की ज्याचा वेग मना एव्हढा आहे. ज्याचा वेग वाऱ्या एव्हढा आहे. -पंथास तू कोटी-शत-वत्सर संप्रगम्यो. आणि तुम्ही लाखो वर्षे त्या वेगाने जाऊ शकता, तरिही तुम्हाला गोलोक वृन्दावन सापडणार नाही. तरिही तुम्हाला सापडणार नाही. पंथास तू कोटी-शत -वत्सर -संप्रगम्यो. (ब्र. स. ५. ३४) असं नाही की आधीचे आचार्य आणि इतर,यांना माहित नव्हते, विमान म्हणजे काय,वेग म्हणजे काय,ते कसे धावते. मूर्खपणे असा विचार करू नका, की त्यांनी हे निर्माण केलाय. हे काहीच नाही,तिसरा- चतुर्थ श्रेणीचा पण नाही, दहाव्ही -श्रेणी. तिकडे खूप सुंदर विमाने होती. आता इथे सूचना आहे की तुम्ही असे विमान निर्माण करा की जे मनाच्या वेगाने धावेल. आता इथे प्रस्ताव आहे. करून बघा. तुम्ही असे विमान निर्माण करा की जे वाऱ्याच्या वेगाने धावेल. ते असा विचार करतात कि ,जर अस आपण एक विमान निर्माण केलं, जे प्रकाशाच्या वेगाने धावेल. तरी, त्यांना उच्चतर ग्रहावर जायला चाळीस हजार वर्षे लागतील. ते असा विचार करतात, की हे शक्य होईल. पण आता पर्यंत असं दिसतंय,जे मुलभूत तत्वानमध्ये व्यग्र आहेत, अशा मंद बुद्धीने, ते कसे अशा गोष्टी निर्माण करु शकतील? हे शक्य नाही. त्या साठी निराळी बुद्धी हवी. योगी जाऊ शकतात. योगी जाऊ शकतात. दुर्वासा मुनीन सारखे . ते वैकुंठ-लोकाला गेले, त्यांनी प्रत्यक्ष वैकुंठ-लोकात भगवान विष्णुंना पाहिले. क्षमा मिळण्यासाठी कारण त्यांना मारण्यासाठी विष्णूंचे चक्र त्यान्च्या पाठी लागले होते. त्यांनी एका वैष्णवाचा अपमान केला. ती एक वेगळी गोष्ट आहे. म्हणुन वास्तविक मनुष्य जन्माचे ध्येय हे आहे. देव आणि त्याचे ऐश्वर्य जाणणे. आणि आपलं नातं त्याचाशी पुनर्जीवित करणे. हा खरा उद्देश आहे. पण दुर्देवाने,ते एका वेगळ्या प्रकारच्या कारखान्यात व्यग्र आहेत,वेगळ्या कामात. कुत्र्या आणि मांजरा सारखे काम करण्यात,आणि त्यात त्यांची सगळी ऊर्जा व्यर्थ जात आहे. नुस्ती व्यर्थ जात नाही,तर त्यांचे व्यक्तित्व नष्ट होते,ते कष्ट करतात. एव्हढे कष्ट केल्यावर ते व्यसनाच्या आहारी जातात. व्यसनाधीन झाल्यावर,ते मौसाहारी होतात. ह्या सगळ्यानंतर,त्यांना लैगिक आनंदची गरज लागते. अशा तऱ्हेने, त्यांना अंधारात ठेवले जाते. ह्या ठिकाणी वृषभदेवाचे श्लोक,त्यांनी सक्त ताकीद. त्यांची ताकीद, ते त्यांच्या मुलांशी बोलत होते, पण ह्या पासून आपण धडा घेऊ शकतो. ते सांगतात: नायम देहो-भाजाम नृलोके कष्टान कामानर्हते विदभुजां ये (श्री. भा. ५. ५. १.) कामान म्हणजे आयुष्याच्या गरजा. तुमच्या आयुष्याच्या गरजा सहज भागतील. शेत नांगरुन, तुम्हाला धान्य मिळत. आणि जर गाय असेल, तर दूध मिळत. एवढंच, हे पुरेसं आहे. पण नेते निरनिराळ्या योजना आखातात, कि जर ते शेतीवर खुश राहिले, थोडे धान्य आणि दूध ह्या वर खुश राहिले,तर कारखान्यत कोण काम करेल? त्यामुळे ते कर बसवितात ज्यामुळे तुम्ही साधं जीवनही जगू शकत नाही. अशी परिस्थिती आहे. जरी तुमची इच्छा असली, आधुनिक नेते तुम्हाला तस जगू देणार नाही. ते तुम्हाला जबरदस्तीने कुत्र्या आणि मांजरा आणि गाढवा सारखे राबायला लावतात. अशी परिस्थिती आहे.