MR/Prabhupada 0103 - भक्तांच्या सांगपासून कधीही दूर जाऊ नका



Lecture on CC Adi-lila 7.91-2 -- Vrndavana, March 13, 1974


नरोत्तम दास ठाकूर म्हणतात कि "जन्मा मागून जन्म" कारण भक्त, त्याला मुक्तीची अपेक्षा नसते,गोलोक वृन्दावन. नाही. कुठेही,त्यांनी काही फरक पडत नाही. त्याला फक्त देवाची स्तुती करायची असते. तोच त्याचा व्यवसाय असतो. वैकुंठ किंवा गोलोक वृन्दावनाला जाण्यासाठी जप करणे आणि नाचणे आणि भक्तीपूर्ण सेवा करणे हा भक्ताचा उद्देश नसतो. जी कृष्णाची इच्छा असेल. "जर त्याला वाटलं, तर तो मला नेईल. भक्ती विनोद ठाकूर सारखे :

इच्छा यदि तोर
जन्माओबि यदि मोरे इच्छा यदि तोर,
भक्त-गृहेते जन्म ह-उप मोर ।

भक्त हा फक्त हि प्रार्थना करतो कि.... तो कृष्णाकडे असं मागणे मागत नाही की "कृपया मला वैकुंठ किंवा गोलोक वृन्दावनाला न्या". नाही. जर तुला वाटत असेल की मी परत जन्म घेऊ, तर ठीक आहे. पण फक्त, फक्त माझे एवढंच मागणे आहे की माझा जन्म भक्ताच्या घरी होवो. एवढंच. जेणे करून मला तुझा विसर पडणार नाही. भक्ताची फक्त एवढीच प्रार्थना असते. कारण... जसे ह्या मुली प्रमाणे तिने वैष्णव आई आणि वडिलांच्या पोटी जन्म घेतला. ती गेल्या जन्मी नक्की एक वैष्णवी किंवा वैष्णव असली पाहिजे. कारण हि एक सुसंधी आहे... आपली सगळी मुलं ,जी वैष्णव आई,वडिलांच्या पोटी जन्माला आली. ती खुप,खूप नशीबवान आहेत. अगदी लहान वयापासून, ती हरे कृष्ण महामंत्र ऐकत आहेत. ते वैष्णवांच्या संगतीत जप,नाच नक्कल किंवा सत्य,त्यांनी काही फरक पडत नाही. पण ती खूप,खूप नशीबवान मुले आहेत.

शुचीनां श्रीमतां गेहे योग​-भ्रष्टः-सञ्जायते (भ गी ६|४१)।

कारण ती सामान्य मुले नाहीत. ती... ही मुले, ह्या मुलांना सतत भक्तांच्या संगतीचा ध्यास असतो. हरे कृष्णाचा जप करणे, आमच्यकडे येणे. कारण ती साधारण मुले नाहीत. भक्ती-संगे वास हि एक खूप चांगली संधी आहे, भक्ता-संगे वास. कारण आपला कृष्ण भावनामृत संघ भक्त-संग आहे,भक्तांचा समुह आहे. हा सोडून जाण्याचा प्रयत्न करु नका. असा प्रयत्न कधीही करु नका. मतभेद असतील. तिथे तुम्ही जुळवुन घ्या. आणि भक्तांच्या संगतीत जप नाच, ह्याचा खूप फायदा होईल,मोठी किंमत. इथे ह्याला पुष्टी दिली आहे,आणि सगळ्या वैष्णवांनी पण मान्य केलाय.

ताञ्देर चरण​-सेवि-भक्त​-सने वास
जनमे जनमे मोर एइ अभिलाष
(श्रील नरोत्तम दास ठाकुर​)

जन्मे जन्मे मोरा म्हणजे त्यांना परत जायचं नाही. हि त्यांना आशा नाही. जेंव्हा कृष्णाची इच्छा असेल,जेंव्हा कृष्ण मला अनुमती देईल. ती वेगळी गोष्ट आहे. नाहीतर, मला ह्याच वाटेने जाऊ दे. भक्तांच्या संगतीत आणि जप आणि नाच करणे हाच माझा उद्योग. ह्याची गरज आहे. बाकी कशाची नाही. इतर काही, इतर काही आशा, ती अन्यअभिलाषा . अन्याभिलाषिता-शून्यम् (भ र सि १.१.११)

भक्ताने ह्या शिवाय कसलीही अपेक्षा ठेवू नये, "त्याने भक्तांच्या संगतीत राहणे आणि हरे कृष्ण महामंत्राचा जप करणे" एव्हढीच हेच आपलं जीवन. धन्यवाद.