MR/Prabhupada 0107 - पुन्हा हे भौतिक शरीर धारण करू नका



Lecture on BG 4.17 -- Bombay, April 6, 1974


हे श्रीमंताच शरीर आहे की गरिबाचे याने काही फरक पडत नाही. सगळयांना आयुष्यातील निरनिराळ्या दुःखदायक अवस्थांतून जावे लागते. जेव्हा विषमज्वर असतो तेव्हा, तो असा भेदभाव करत नाही की "हे श्रीमंतांचे शरीर आहे. मी ह्याला कमी यातना देतो. नाही. जेव्हा विषमज्वर असतो, जरी तुमचे शरीर श्रीमंताचे असेल किंवा गरिबाचे ,तुम्हाला समान यातना सहन करायला लागणार. जेव्हा तुम्ही तुमच्या आईच्या गर्भात असता, तुम्हाला समान वेदना सहन करायला लागणार जरी तुम्ही राणीच्या गर्भात असलात किंवा चांभारणीच्या. ती एक कठीण अवस्था आहे... पण हे त्यांना माहित नाही. जन्म-मृत्यू-जरा. जन्माला येण्यासाठी खुप वेदना सहन करायला लागतात. जन्म आणि मृत्यू आणि वार्धक्य ह्या सगळ्या प्रक्रियेत बऱ्याच यातना असतात. श्रीमंत माणूस किंवा गरीब माणूस, जेव्हा आपण वृद्ध होतो, आपल्याला अनिश्चित यातना भोगाव्या लागतात. त्याचप्रमाणे,

जन्म-मृत्यू-जरा-व्याधी (भ गी १३|९ )

जरा,जरा,आणि व्याधी आणि मृत्यू. कारण ह्या शरीराच्या यातनामय अवस्थेची आपल्याला जाणीव नाही. शास्त्र सांगत की, "पुन्हा कोणतेही भौतिक शरीर स्वीकारु नका." न साधू मन्ये: "हे चांगले नाही,की पुन्हा पुन्हा हे भौतिक शरीर तुम्हाला मिळत आहे. न साधू मन्ये यत आत्मन:.आत्मन:,आत्मा भौतिक शरीराच्या बंधनात अडकत आहे. यत आत्मनो अयम असन्न आपि.जरी तात्पुरत, मला हे शरीर मिळालंय क्लेषदा आस देह:. जर आपल्याला हे भौतिक शरीर मिळण्याची दुःखमय अवस्थेची पुनरावृत्ती होऊ द्यायची नसेल. तर आपल्याला कर्म म्हणजे काय, विकर्म म्हणजे काय हे समजले पाहिजे, हे कृष्णाचे मत आहे. कर्मणो ह्यपी बोद्धव्यं बोद्धव्यं च विकर्मण:।अकर्मणश्च बोद्धव्यं. अकर्मण म्हणजे फलरहित कर्म . प्रतिक्रिया,कर्म,जर तुम्ही चांगले काम केले, त्याचे फळ मिळेल. त्याला चांगले शरीर, उच्च शिक्षण, ऐश्वर्यवन्त , सुसंस्कृत कुटुंब, हे पण चांगले आहे.आपण चांगल्यासाठी ह्याचा उपयोग करु. आपल्याला स्वर्गात जाण्याची इच्छा आहे. पण त्यांना हे माहित नाही की स्वर्गात पण जन्म-मृत्यू-जरा-व्याधी आहेत. म्हणून कृष्ण स्वर्गात जाण्याचा सल्ला देत नाहीत. त्यांनी सांगितलंय, आब्रह्मभुवनाल्लोका: पुनरावर्तीनोsर्जुन।( भ गी ८|१६) जरी तुम्ही ब्रह्मलोकाला गेलात तरी, परत जन्म आणि...

यदगत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम (भ गी १५|६)

यदगत्वा न निवर्तन्ते. पण आपल्याला माहित नाही की तिथे एक धाम आहे. जर आपण कसेही करुन .त्या धामाला पोहोचलो. तर न निवर्तन्ते,यदगत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. दुसऱ्या ठिकाणी म्हंटलंय,

त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नैति (भ गी ४|९) लोकांना माहिती नाही की कृष्ण,किंवा भगवान, त्याचे स्वतःचे धाम आहे आणि कुणीही तिथे जाऊ शकत. कसे कोणी तिथे जाईल?

यान्ति देव-व्रता देवान्
पितृन् यान्ति पितृ-व्रताः
भूतानि यान्ति भूतेज्या
यान्ति मद्-याजिनो ऽपि माम्  :(भ गी ९|२५)


जे माझी भक्तिभावाने पूजा करतात, भक्ती-योग, ते माझी प्राप्ती करतात. आणखीन एक ठिकाणी त्यांनी सांगितलंय,

भक्त्या मामभिजानाति यावान्यश्चास्मि तत्त्वत: (भ गी १८|५५)

म्हणून कृष्णाला जाणणे एवढेच आपले काम,यज्ञार्थ कर्म. हे अकर्म आहे. इथे असं सांगितलंय,अकर्मण,अकर्मणो ह्यपी बोद्धव्यं,अकर्मणश्च बोद्धव्यं. अकर्म म्हणजे फलरहित कर्म. इथे,जर आपल्या इंद्रिय तृप्तीसाठी कर्म केले,तर त्याचे परिणाम.... जसे जवान प्राण घेतात. त्याला सुवर्ण पदक मिळते. तोच जवान,जेव्हा घरी येतो, जर त्याने कोणाचा प्राण घेतला, तर त्याला फाशी होते. का? तो कोर्टात सांगु शकतो,"जज,मी जेव्हा युद्धात लढत होतो, मी अनेकांना मारलं मला सुवर्ण पदक मिळालं. आणि आता तुम्ही मला का फाशी देता?"

"कारण आता तू हे तुझ्या इंद्रिय तृप्तीसाठी केलंस आणि ते तु देशासाठी केलंस." म्हणूनच कोणतंही कर्म. जर तुम्ही कृष्णाच्या तृप्तीसाठी केलंत,ते अकर्म त्याला कर्मफळ नाही. पण जर कोणतंही कर्म तुम्ही तुमच्या इंद्रियतृप्तीसाठी केलंत, तुम्हाला त्याच कर्मफळ भोगावं लागत,चांगलं किंवा वाईट. म्हणून कृष्णाने सांगितलंय,

कर्मणो ह्य् अपि बोद्धव्यं
बोद्धव्यं च विकर्मणः
अकर्मणश् च बोद्धव्यं
गहना कर्मणो गतिः  :(भ गी ४|१७)

हे समजायला फार कठीण आहे की कोणते कर्म केले पाहिजे. म्हणून आपण कृष्णाकडून,शास्त्रामधून,आणि गुरुकडून ज्ञान प्राप्त केले पाहिजे. तर आपलं आयुष्य यशस्वी होईल.धन्यवाद. हरे कृष्णा.