MR/Prabhupada 0108 - मुद्रण आणि भाषांतर चालू राहिलीच पाहिजे
Room Conversation "GBC Resolutions" -- March 1, 1977, Mayapura
म्हणून तरीसुद्धा, मुद्रण आणि भाषांतर हे चालू राहिलेच पाहिजे. तो आमचा मुख्य उद्देश आहे. तो थांबविणे शक्य नाही. चालू राहिलेच पाहिजे. जसे मी हट्ट करत होतो, आता आमच्या कडे भरपूर हिंदी साहित्य आले आहे. मी फक्त हट्ट करत होतो, "हिंदी कुठे आहे? हिंदी कुठे आहे?" त्यामुळे ते एका मूर्त स्वरुपात आले आहे. मी फक्त त्याला कोपरखळि देत होतो, "हिंदी कुठे आहे? हिंदी कुठे आहे?" त्याने ते वास्तव स्वरुपात आणले. त्याचप्रमाणे फ्रेंच भाषे करीता देखील, फार महत्वाचे, आम्ही शक्य तेवढे अनुवाद करणे आणि पुस्तके मुद्रित करणे आवश्यक आहे. "पुस्तके मुद्रण करा" म्हणजे आपल्याकडे आधी पासूनच पुस्तके आहेत. फक्त विशिष्ट भाषेत अनुवाद करा आणि प्रकाशित करा. ह्यातच सर्व आहे. कल्पना आधीच आहे. तुम्हाला कल्पना बनवण्याची गरज नाही. म्हणून फ्रान्स फार महत्वाचा देश आहे. म्हणून मुद्रण व भाषांतर चालू राहणे आवश्यक आहे. माझी विनंती आहे.