MR/Prabhupada 0113 - जिभेवर ताबा मिळवणे खूप अवघड आहे



Lecture on SB 5.6.2 -- Vrndavana, November 24, 1976


रघुनाथ दास गोस्वामीनी खूप कडकपणे अनुसरण केले,चैतन्य महाप्रभूनीपण कडकपणे नियमांचे पालन केले. आणि रुप-सनातन गोस्वामीनीपण नियम कडकपणे पाळले. म्हणून नाही की वृन्दावनमध्ये धोती घालून राहिला आणि तो रुप गोस्वामीसारखा झाला. रुप गोस्वामी पूर्णतया वाहून घेतले होते. नाना-शास्त्र-विचारनैक-निपुनौ सद-धर्म-संस्थापकौ लोकानांम हित-कारीनौ ते वृंदावनात होते,पण ते नेहमी विचार करत ह्या भौतिक जगात लोकांचं भलं कस होईल. प्रह्लाद महाराजांसारखे शोचे ततो विमुखचेतस. साधू नेहमी ह्या भौतिक जगात भरकटलेल्या लोकांचा विचार करतात. ते नेहमी विचार करतात,त्यांचा उद्धार कसा होईल,ती दुःख भोगत आहेत. ह्यांना संत म्हणतात. लोकानाम हित-कारीनौ साधु, म्हणजे असे नाही की "मी साधूचा वेष घातला, आणि लोक भावानेपोटी मला पोळी देतील,आणि मी जेवेन आणि झोपेन" त्याला साधू म्हणत नाहीत. साधू... भगवान,कृष्णांनी सांगितलंय साधू म्हणजे कोण.

अपि चेत्सुदुराचारो भजते मामनन्यक। साधुरेव स मन्तव्य:(भ गी ९।३०)

ह्याला साधू म्हणतात. ज्यांनी त्यांचे पुरे आयुष्य कृष्णाला वाहिले आहे, ते साधू. जरी त्याला काही वाईट सवयी असल्या... वाईट सवयी , साधूला वाईट सवयी नसतात,कारण जर एखादा साधू असेल, जर सुरवातीला त्याला काही वाईट सवयी असल्या,त्या सुधारल्या जातात. क्षिप्रं भवती धर्मात्मा शश्र्वच्छान्ति निगच्छति. जर तो साधू असला, त्याच्या वाईट सवयी लवकरच नाहीश्या होतील. लवकरच, असं नाही की तो त्याच्या वाईट सवयी सोडणार नाही आणि तरी देखील त्याला साधू मानतील. असं होत नाही. त्याला साधू म्हणत नाहीत. कदाचित जुन्या सवयी मुळे, त्याने काही चुका केल्या असतील. त्या माफ केल्या जातात. पण जर तो,सुधुच्या नावाखाली,आणि भक्त बनल्यावरही ,तो निंद्य कृत्ये करतच राहील,त्याला साधू म्हणत नाहीत. तो साधू नाही. अपि चेत्सुदुराचारो चेत,यदी, जर, योग योगाने, तर शक्य आहे. पण जर तो कृष्ण-भक्तीमध्ये स्थिर राहिला, तर

क्षिप्रं भवती धर्मात्मा शश्र्वच्छान्ति निगच्छति.

सुरवातीला काही चुका होतील,पण आपण विचार केला पाहिजे " माझ्या चुका आता सुधारल्या गेल्या की नाही ?" तेव्हढी दक्षता घेतली पाहिजे. मनावर कधीही भरोसा ठेवता येत नाही. इथे हि सूचना दिली आहे. मनावर कधीही भरोसा ठेऊ नका. माझे गुरु महाराज सांगत की "सकाळी झोपेतून उठल्यावर,तुम्ही तुमच्या चपला घ्या आणि मनाला शंभर वेळा मारा. हे तुमचं पाहिलं काम. आणि झोपायला जाताना,तुम्ही झाडू घ्या आणि तुमच्या मनाला शंभरवेळा मारा. मग आपण आपल्या मनावर ताबा मिळवू शकता.नाहीतर हे फार अवघड आहे." तर हे आहे... चपलेने आणि झाडूने मारणे हि सुद्धा एक तपस्या आहे. आपल्या सारख्या माणसांना, ज्यांचा मनावर ताबा नाही, आपण ह्या तपस्येचा सराव केला पाहिजे, चपलेने आणि झाडूने मनाला मारणे. तर त्याच्यावर ताबा मिळवता येईल. आणि स्वामी म्हणजे ज्याचा मनावर ताबा आहे.

वाचो-वेगं, क्रोध-वेगं,उदर-वेगं, उपस्थ-वेगं,मनसा-वेगं, क्रोध-वेगं, एतान वेगान यो विषहेत धीर:पृथिवीं स शिष्यात् (उपदेशामृत १)

हि रुप गोस्वामींची सूचना आहे. जेव्हा आपण ताबा ठेऊ शकतो वाचो-वेगं.. ह्याला क्रंदन-वेगं म्हणतात.(हशा) त्यांच्यावर नियंत्रण ठेवू शकत नाही. म्हणून त्यांना मुलं म्हणतात. मुलाना माफ करता येत, पण जर एखादा मनुष्य आध्यत्मिक जीवनात प्रगती करण्याचा प्रयत्न करत असेल,आणि जर तो मनावर ताबा ठेऊ शकत नसेल तर ते निराशजनक आहे. तर त्याची स्थिती निराशाजनक आहे. त्याने ताबा ठेवलाच पाहिजे. वाचो-वेगं, क्रोध-वेगं,उदर-वेगं, उपस्थ-वेगं. पण सगळ्यात महत्वाचे म्हणजे उदर-वेगं आणि जिव्हा-वेगं. जिव्हा-वेगं,ती नियंत्रित असली पाहिजे. भक्तीविनोद ठाकुरांनी सांगितली की "सगळ्या इंद्रियामध्ये जिव्हा हि अतिशय धोकादायक आहे." तारा मध्ये जिव्हा अती लोभमोय सुदुर्मति ताके जेता काथीन संसारे. जिभेवर ताबा मिळवणे हे खूप,खूप कठीण आहे.