MR/Prabhupada 0114 - एक सज्जन व्यक्ति ज्याचं नाव आहे कृष्ण , तो प्रत्येकाला नियंत्रित करत आहे
Lecture -- Laguna Beach, September 30, 1972
भगवद्-गीतेत असं सांगितलंय,
- देहिनो अस्मिन् यथा देहे
- कौमारम् यौवनम् जरा
- तथा देहान्तर प्राप्तिर्
- धीरस् तत्र न मुह्यति (भ गी २।१३)
तुम्ही,मी- सगळेजण- ह्या शरीराच्या बंधनांत आहोत. मी एक जीवात्मा आहे,तुम्ही एक जीवात्मा आहात. तो वैदिक उपदेश आहे. अहं बह्मास्मि: "मी ब्रह्म आहे." ते म्हणजे आत्मा. परब्रह्मन नाही, ती चूक करू नका. परब्रह्मन देव आहे. आपण ब्रम्हन आहोत भगवंतांचे अंश, परंतु सर्वोच्च नाही. सर्वोच्च निराळा आहे. जसे तू अमेरिकन आहेस, पण सर्वोच्च अमेरिकन तुमचे राष्ट्राध्यक्ष आहेत,श्री.निक्सन पण तुम्ही असे म्हणू शकत नाही,की "कारण की मी अमेरिकन आहे,म्हणून मीपण श्री. निक्सन." तसे तुम्ही म्हणू शकत नाही. तसेच,तु,मी, आपण सगळेजण, ब्रम्हन, पण त्याचा अर्थ असा नाही आपण पण परब्रम्हन. परब्रम्हन श्रीकृष्ण आहेत.
- ईश्वर: परम: कृष्ण: (ब्रम्हसंहिता ५.१)
ईश्वर: परम:. ईश्वर म्हणजे नियंत्रक. तर आपण सगळेजण काही प्रमाणात नियंत्रक आहोत. कोणी त्याच्या कुटुंबावर नियंत्रण ठेवतो. कार्यालयावर नियंत्रण ठेवतो,व्यवसाय,शिष्यांवर नियंत्रण ठेवतो. सगळ्यात शेवटी, तो कुत्र्यावर नियंत्रण ठेवतो. जर त्याला कशावरच अधिकार गाजवता आला नाही,अधिकार गाजवण्यासाठी तो कुत्रा पाळतो,पाळीव कुत्रा,मांजर. तर प्रत्येजण नियंत्रक होऊ इच्छित असतो.हे खरं आहे. पण सर्वोच्च नियंत्रक श्रीकृष्ण आहेत. इथे तथाकथित नियंत्रकाला कोणीतरी इतर नियंत्रित करत आहे. मी माझ्या शिष्यांवर नियंत्रण ठेऊ शकतो, पण माझ्यावर दुसरं कोणीतरी नियंत्रण ठेवेल,माझे गुरुमहाराज. तर कोणीही असं म्हणू शकत नाही की "मी परिपूर्ण नियंत्रक आहे." नाही. इथे तुम्हाला तथाकथित नियंत्रक सापडतील, निश्चितपणे काही प्रमाणात नियंत्रण ठेवणारे,पण त्यांच्यावरही कोणाचेतरी नियंत्रण आहे. पण तुम्हाला असा कोणीतरी सापडेल की जो फक्त नियंत्रण ठेवतो,त्याच्यावर कोणीही नियंत्रण ठेवत नाही, ते म्हणजे भगवान श्रीकृष्ण. श्रीकृष्णांना समजून घेणे फार कठीण नाही. प्रत्येकावर नियंत्रण आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करा, आपल्यापैकी प्रत्येकावर, पण त्याचवेळी कोणाच्यातरी नियंत्रणाद्वारे. परंतु आपल्याला एक सज्जन सापडले आहे ज्यांचे नाव श्रीकृष्ण. ते सगळ्यानवर नियंत्रण ठेवतात,पण त्यांच्यावर कोणीही नियंत्रण ठेवत नाही. ते भगवान आहेत.
- ईष्वर: परम: कृष्ण:
- सच् चिद् अानन्द विग्रह
- अनादिर् अादिर् गोविन्द:
- सर्व कारण कारणम् (ब्र स ५।१)
तर हि कृष्णभवनामृत चळवळ अतिशय वैज्ञानिक,अधिकृत,आणि योग्य व्यक्तीकडून समजून घेण्यासारखी आहे. म्हणून जर तुम्ही ह्या कृष्णभवनामृत चळवळीत स्वारस्य घ्याल, तुम्हाला त्याचा फायदा होईल. तुमचे आयुष्य यशस्वी होईल. तुमच्या आयुष्याचे ध्येय साध्य होईल. हे खरं आहे. तर तुम्ही आमचे साहित्य वाचायचा प्रयत्न करू शकता.आमच्याकडे बरीच पुस्तक आहेत. तुम्ही येऊन प्रत्यक्ष बघू शकता कसे आमचे शिष्य कृष्णभावनामृत चळवळीत प्रगती करत आहेत. तुम्ही त्यांच्या संगतीत शिकण्याचा प्रयत्न करू शकता. जसे एखाद्याला यांत्रिक गोष्टी शिकायच्या आहेत,तो कारखान्यात जाईल आणि कामगारांच्या संगतीत राहील,, आणि हळूहळू तो सुद्धा मेकॅनिक,तंत्रज्ञ बनेल. तसेच, आम्ही हि केंद्र उघडली आहेत फक्त प्रत्येकास संधी देण्यासाठी. शिकण्यासाठी कसे स्वगृही जायचे,स्वगृही कसे जायचे, परत..., कसे स्वगृही जायचे, जाऊ देवाचीया द्वारी. हा आमचा उद्देश आहे.
आणि हे वैज्ञानिक आणि अधिकृत,वैदिक आहे. आम्हाला हे ज्ञान थेट भगवान श्रीकृष्णांकडून प्राप्त करत आहोत, भगवान. ते म्हणजे भगवद्-गीता. आम्ही भगवद्-गीता जशी आहे तशी मांडतो,काहीही प्रतिक्रिया न देता. भगवान श्रीकृष्ण भगवद्-गीतेत म्हणतात की ते पुरुषोत्तम भगवान आहेत. आम्हीही तेच सांगत आहोत, की श्रीकृष्ण हे भगवान आहेत. आम्ही त्यात बदल करत नाही. भगवान श्रीकृष्णांनी भगवद्-गीतेत सांगितलंय,"माझे भक्त बना. सदैव माझे चिंतन कर. माझे पूजन कर. मला नमस्कार कर." आम्ही सगळ्या लोकांना शिकवतो की "तुम्ही सदैव श्रीकृष्णाचं चिंतन करा- हरे कृष्ण,हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण,हरे हरे/ हरे राम,हरे राम, राम राम, हरे हरे." हरे कृष्ण महामंत्राचा जप करून,तुम्ही सदैव श्रीकृष्णांचे चिंतन कराल.