MR/Prabhupada 0116 - तुमचे मौल्यवान जीवन वाया घालवू नका



Lecture with Allen Ginsberg at Ohio State University -- Columbus, May 12, 1969

आत्मा आहे, आणि हे शरीर त्या आत्माच्या व्यासपीठावर विकसित झाले आहे, आणि तो आत्मा एका शरीरातून दुस-या शरीरात स्थलांतरित होत आहे. त्याला उत्क्रांती म्हणतात. आणि त्या उत्क्रांतीची प्रक्रिया चालू आहे, जीवनाच्या ८४००००० प्रजाती, जलचर, पक्षी, पशू, वनस्पती आणि इतर कित्येक प्रजाती आहेत. आणि आता आपल्याला हि विकसित चेतना प्राप्त झाली आहे , मनुष्य जीवन. आपण त्याचा नीट वापर केला पाहिजे . तेच काम आपली कृष्ण भावनामृत चळवळ करत आहे.

आपण लोकांना फक्त शिक्षित करत आहोत "आपले मौल्यवान जीवन, मानव जीवन वाया घालवू नका. जर तुम्ही हि संधी गमावत असाल , तर तुम्ही आत्महत्या करीत आहात." तोच आमचा प्रचार आहे. आत्महत्या करू नका. या कृष्ण भावनामृताकडे वळा आणि प्रक्रिया अतिशय सोपी आहे. तुम्हाला योग प्रणाली किंवा दार्शनिक, तात्त्विक प्रणाली सारख्या कठीण प्रक्रिया करण्याची गरज नाहि. या युगात ते शक्य नाही. ते .. मी स्वत: च्या अनुभवातून बोलत नाही आहे, पण मी मोठ्या आचार्य आणि दिग्गज ऋषींचा अनुभव सांगत आहे . ते म्हणतात की , कलौ नास्ति एव नास्ति एव नास्ति एव गतिर् अन्यथा.

जर तुम्हाला स्वतःचे अस्तित्व जाणून घ्यायचे असेल , जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल की आपला पुढचा जन्म कसा असेल , जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल देव काय आहे , जर तुम्हला जाणून घ्यायचे असेल कि भगवंताशी तुमचा संबंध काय आहे , तर या सर्व गोष्टी तुमच्यासमोर प्रकट होतील - हे खरं ज्ञान आहे - फक्त हा मंत्र जपणे हरे कृष्ण, हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण, हरे हरे / हरे राम, हरे राम, राम राम हरे हरे. हे व्यवहारिक आहे . आम्ही काहीही फी घेत नाही आहोत. आम्ही तुम्हाला फसवत नाही आहोत कि ,"मी तुम्हाला काहीतरी गुप्त, मंत्र देईन आणि तु त्याऐवजी पन्नास डॉलर्स भरावे". नाही. प्रत्येकासाठी हे खुले आहे.

कृपया ते घ्या. ही आमची विनंती आहे. आम्ही तुमच्याकडे अशी भीक मागत आहोत , "आपले जीवन खराब करू नका. कृपया हा मंत्र घ्या. जिथे आपल्याला आवडेल तिथे जपा." कुठलेही कठोर नियम पालन करणे आवश्यक नाही . जेव्हा आपल्याला आवडेल , जिथे आपल्याला आवडेल ,जीवनातल्या कोणत्याहि स्थितीत ... जसे आपण अर्धा तास आधी जप केला. कोणतीही स्थिती , तुम्हाला परमानंद जाणवला . त्याचप्रमाणे आपण हे सुरू ठेवू शकता. हा हरे कृष्ण मंत्र जप . तो आपल्याला विनामूल्य मिळाला आहे . परंतु जर तुम्हाला तत्त्वज्ञानाने जाणून घ्यायचे असेल की हरे कृष्ण मंत्र काय आहे , किंवा ज्ञानाद्वारे, तर्कशास्त्राद्वारे, आपल्याकडे पुस्तकांचा भांडार आहे असे विचार करु नका की आम्ही फक्त भावनावश होऊन नृत्य करत आहोत. नाही, त्याला पार्श्वभूमी आहे. तर हि कृष्ण भावनामृत चळवळ समजून घेण्याचा प्रयत्न करा.

मी हा संदेश तुम्हाला सांगण्यासाठी विशेषतः तुमच्या देशात आलो आहे, कारण जर तुम्ही हे ग्रहण केले , जर तुम्हाला कृष्ण भावनामृत विज्ञान समजू शकले , जगाचा दुसऱ्या भागाला देखील साधेल, आणि जगाचा चेहरा बदलला जाईल. ते खरं आहे.