MR/Prabhupada 0117 - मोफत झोपण्यासाठी आणि राहण्यासाठी निवास



Lecture on SB 7.9.24 -- Mayapur, March 2, 1976


ही कल्पना आहे, सेवक आणि दासी बनण्याची . हे मानवी सभ्यतेचे आदर्श आहे. प्रत्येक स्त्रीने आपल्या पतीची दासी बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे , आणि प्रत्येक पुरुषाने शंभर पटीने कृष्णाचा सेवक बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ही भारतीय संस्कृती आहे, असे नाही की "पती-पत्नी, आम्हाला समान अधिकार आहेत ." "समान अधिकार." विषयावर युरोप अमेरिके मध्ये, चळवळ सुरु आहे . ती वेदिक संस्कृती नाही वेदिक संस्कृतीप्रमाणे पती हा कृष्णाचा प्रामाणिक सेवक असावा , आणि पत्नी आपल्या पतीची प्रामाणिक सेविका. म्हणून इथे असे म्हंटले आहे,

उपनय माम् निज-भ्रत्य पार्श्वम् (श्री भ ७।९।२४)

ती सर्वोत्तम संघटना आहे. जेव्हा नारदमुनी वर्णन करत होते , पुरुषाने कसे वागावे , स्त्रीने कसे वागावे , आता आपण आपल्या टेप डिक्टाफोन मध्ये चर्चा करीत आहोत. आपण ते ऐकू . कि स्वामी होणे अशी कुठली गोष्ट नाही. ते निरुपयोगी आहे आपण स्वामी बनू शकत नाही.

अहंकार विमूढात्मा कर्ताहम् इति मन्यते (भ गी ३।२७)

आपण स्वामी होऊ शकत नाही.

जिह्वेर स्वरूप होय नित्य कृष्ण दास (चै च मध्य २०।१०८-१०९)

पुरुष किंवा स्त्री, प्रत्येकजण कृष्णाचा दास आहे . आपल्याला त्या व्यासपीठावर स्वताला प्रशिक्षित केले पाहिजे, उत्तम सेवक कसे बनायचे , फक्त सेवकच नव्हे तर सेवकाचे सेवक. याला परंपरा सेवक म्हणतात. माझे आध्यात्मिक गुरु त्यांच्या आध्यात्मिक गुरुचे दास आहेत, आणि मी माझ्या आध्यात्मिक गुरूंचा दास . त्याचप्रमाणे आपण विचार करतो " सेवकांचे सेवक "प्रश्नच उद्भवत नाही की ... हा भौतिक रोग आहे (चै च मध्य १३।८०).

कृष्ण भुलिया जीव भोग वांछा कारे
पाशेते माया तारे जापटीया धारे

आपण जसे गर्विष्ठ होतो , "आता मी स्वामी बनले पाहिजे . मी फक्त आज्ञा दिली पाहिजे . मी कोणाचेही अनुकरण करणार नाही "- हि माया आहे. तर हा आजार ब्रह्मांपासून ते मुंगीपासून सर्वांना आहे . प्रहलाद महाराजांना हे स्वामी बनण्याचे खोटे गर्वाचे स्थान समजले होते . ते म्हणतात "या चुकीच्या गोष्टीची मला पूर्ण जाणीव आहे. कृपया मला व्यस्त ठेवा ..." निज भ्रत्य पार्श्वम्. निज भ्रत्य पार्श्वम् म्हणजे प्रशिक्षणार्थीसारखेच. प्रशिक्षणार्थी, एक प्रशिक्षणार्थी एका तज्ज्ञ व्यक्तीच्या हाताखाली काम करतो. हळूहळू प्रशिक्षणार्थी गोष्टी कशा कार्याच्या हे शिकतो. म्हणून ते म्हणतात, निज भ्रत्य पार्श्वम्. "असे नाही कि मी लगेच उत्तम सेवक बनेन पण मला ..." ही आमची संस्था या उद्देशासाठी आहे. जर कुणी इथे आलं , तर विनामूल्य हॉटेल आणि निशुल्क राहण्याची सोय, मग त्याचे इथे असणे निरुपयोगी आहे.

त्याने सेवा कशी करावी हे शिकले पाहिजे . निज भ्रत्य पार्श्वम्. जे सेवा करत आहेत ते ... एखाद्याने त्यांच्याकडून शिकावे की २४ तास सेवा कशी करावी; मग आमच्या या संस्थेमध्ये सामील होणे यशस्वी होईल. आणि आपण जर गृहीत धरले कि "इथे एक अशी संस्था आहे जिथे आपण मोफत हॉटेल, निशुल्क राहणे आणि इंद्रिय तृप्ती प्राप्त करु", मग संपूर्ण संस्था विनाश पावेल . खबरदारी ठेवा. सर्व जीबीसी, त्यांनी सावध असले पाहिजे की ही मानसिकता वाढणार नाही. प्रत्येकजण सेवा देण्यासाठी , सेवा कशी करावी हे जाणून घेण्यासाठीअत्यंत उत्सुक असला पाहिजे .निज भ्र्त्य पार्श्वम, मग जीवन यशस्वी होईल. खूप धन्यवाद.