MR/Prabhupada 0118 - प्रचाराचे काम इतके कठीण नाही



Lecture on SB 1.5.8-9 -- New Vrindaban, May 24, 1969


जो कोणी कृष्ण किंवा देवाला शरण जातो तो खूप भाग्यवान आहे. बहुनाम् जन्मनाम् अन्ते ज्ञानवान् माम् प्रपदयन्ते (भ गी ७।१९) . जो समर्पण करतो तो सामान्य माणूस नाही . तो सर्व विद्वान, सर्व तत्त्वज्ञ, सर्व योगी, सर्व कर्म्यंपेक्षा श्रेष्ठ आहे. सर्वोच्च माणूस, जो समर्पण करतो . म्हणून हे खूप गोपनीय आहे . म्हणून आपली शिकवण , कृष्ण भावनामृत चळवळ, भगवत-गीता जशी आहे तशी समजावून सांगणे, हि कृष्णाला किंवा भगवंताला शरण कसे जावे ही शिकवण्याची प्रक्रिया आहे . बस .

म्हणून कृष्ण म्हणतो की हे गोपनीय आहे ... कोणीही स्वीकार करणार नाही. पण जो जोखीम घेतो, कृपया आत्मसमर्पण करा ... जेव्हा तुम्ही प्रचारकाकडे जाता, तुम्हाला माहीत आहे की प्रचारकांवर कधी कधी हल्ला होतो . जसे नित्यानंद प्रभुंवर जगाई-मधाई यांनी हल्ला केला होता. आणि जेव्हा प्रभु येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर खिळवले होते , ठार मारले ... तर उपदेशकाकडे जोखिम आहे. म्हणूनच कृष्ण म्हणतो , "हे कार्यकर्ते जे या भगवद् गीतेच्या प्रचारात गुंतलेले आहेत, ते माझ्यासाठी खूप ,खूप प्रिय आहेत. मला खूप प्रिय आहेत" .

न च तस्मान मनुष्येशु कश्चिन् मे प्रिय कृत्तम: (भ गी १८।६९)

"या गोपनीय सत्याचा प्रचार करणा-या व्यक्तीपेक्षा मला इतर कोणीही जास्त प्रिय नाही." म्हणून आपल्याला जर कृष्णाला प्रसन्न करायचे असल्यास,हि जोखीम आपल्याला घ्यावी लागेल. कृष्ण , गुरू . माझ्या आध्यात्मिक गुरूंनी हा धोका पत्करला , प्रचार कार्य , आणि त्यांनी आम्हाला देखील प्रचार कार्य करण्याकरता प्रेरित केले. आणि आम्हीही या प्रचार कार्यात सहभागी होण्यास आपल्याला विनवणी करत ​​आहोत. तर हे प्रचार कार्य, म्हणजे माझे म्हणणे असे आहे कि , आपण कितीही शिकवण्यात कमकुवत असू .. कमकुवतपणे - गरीब नाही, पण समजा मी फार सुशिक्षित नाही. या मुलाप्रमाणेच .जर मी त्याला प्रचार कार्यासाठी पाठविले , तो सध्या फार सुशिक्षित नाही.

तो तत्वज्ञानी नाही. तो विद्वान नाही. पण तो देखील उपदेश देऊ शकतो. तो देखील उपदेश करू शकतो कारण आपला प्रचार करणे फार कठीण गोष्ट नाही. जर आपण घरोघरी जाऊन लोकांना विनंती केली , "हे यजमान , आपण हरे कृष्ण म्हणा" आणि जर तो थोडा उन्नत झाला असेल , तर "भगवान चैतन्याची शिकवण वाचण्याचा प्रयत्न करा" ती खूप छान आहे, त्याचा तुम्हाला फायदा होईल." हे तीन चार शब्द तुम्हाला उपदेशक बनवतील . हे खूप कठीण काम आहे का? आपण फार सुशिक्षित नसाल , फार चांगले विद्वान, फार चांगले दार्शनिक नसाल तुम्ही फक्त सांगू शकता ... दारोदारी जाऊन : "प्रिय महोदय, तूम्ही खूप हुशार मनुष्य आहात. सध्या पुरता तुम्ही तुमचे शिक्षण थांबवून फक्त हरे कृष्णा म्हणा.