MR/Prabhupada 0120 - अकल्पनीय गूढ शक्ती



Morning Walk At Cheviot Hills Golf Course -- May 17, 1973, Los Angeles


प्रभुपाद: तुम्ही भाषांतर केले कि नाही?

स्वरूप दामोदर: अकल्पनीय?

प्रभुपाद: होय अकल्पित किंवा रहस्यमय

स्वरूप दामोदर: रहस्यमय शक्ती

प्रभुपाद: हो.

स्वरूप दामोदर: मी फक्त श्रीला प्रभुपाद यांनी समजावलेले गोळा करीत आहे, विविध अचिंत्य शक्ती ज्यांचा आम्ही अनुभव घेतला .

प्रभुपाद: येथे अचिंत्य शक्ती काम करीत आहे, ही धुळ, धुके. तुमच्याकडे यांना चालविण्याची शक्ती नाही.आपल्या शक्ती पलीकडे. तुम्ही शब्दांच्या काही रचनेमधून समजावून सांगू शकता ...

प्रवासी : शुभ प्रभात .

प्रभुपाद: शुभ प्रभात . कि "अशी रसायने, असे रेणू, हे असे आणि तसे , की," खूप गोष्टी आहेत परंतु (हसणे) तुमच्याकडे ती चालविण्याची शक्ती नाही.

स्वरूप दामोदर: होय. धुके कसे बनते याचे स्पष्टीकरण त्यांच्याकडे आहे .ते म्हणतात ...

प्रभुपाद: ते तुम्ही करू शकता ते. मी देखील करू शकतो.यात काही मोठेपणा नाही. पण जर तुम्हाला माहिती आहे की ते कासव तयार झाले , तर त्याचे उत्तर द्या. स्वरूप दामोदर: आम्हाला माहित आहे ते कसे तयार झाले आहे.ते कसे तयार झाले आहे.

प्रभुपाद: होय. मग तुम्हाला माहित आहे, मग शोधून काढा, प्रतिकार करणे. जसे पूर्वी, युद्धात आण्विक ब्रह्मास्त्र वापरत असत . दुसऱ्या बाजूला ... ब्रह्मास्त्र चा अर्थ म्हणजे प्रचंड उष्णता. तर त्यांनी काहीतरी घडवून आणले, त्याचे पाण्यामध्ये रूपांतर केले . कारण उष्णतेनंतर तिथे पाणी असले पाहिजे .तर मग ते विज्ञान कुठे आहे?

स्वरूप दामोदर: दुधासारखेच . दूध पांढरे दिसते , पण ते फक्त पाणी आहे. ते म्हणतात, हे प्रथिनांच्या अणूंचे निलंबन आहे, केसीन प्रथिनांचे पाण्यातील निलंबन . त्याचप्रमाणे, हे धुके केवळ पाण्याचे हवेत झालेले एक निलंबन आहे.

प्रभुपाद: होय. तर आपण जर आग निर्माण केली ते लगेच निघून जाईल . अग्नी द्वारे पाणी दूर घालवले जाऊ शकते.तर तुम्ही तयार करा . तुम्ही ते नाही करू शकत . तुम्ही फक्त एक बॉम्ब गोळा फेकू शकता . काही उष्णता निर्माण होईल आणि सगळी धुके निघून जाईल.करून पहा .

करंधर: त्याने ग्रह उडून जाईल ,तो ग्रह उडवून टाकेल.(हशा )

प्रभुपाद: हरे कृष्ण . पाणी आग किंवा हवे द्वारे प्रभावहीन केले जाऊ शकते . प्रत्येकाला ते माहीत आहे. तर तुम्ही हे करून पहा , निलंबन . तर हे तुमच्या गूढ शक्ती साठी आहे. आपण सर्व वायफळ बोलू शकतो , परंतु आपण त्यावर कार्य करू शकत नाही. म्हणून ती गूढ शक्ती आहे. तर अशा बर्याच गोष्टी आहेत. ती अचिंत्य -शक्ती आहे. आपण अगदी विचार देखील करू शकत नाही . निसर्गाच्या पद्धतीने , सूर्य उगवतो - आणि तत्काळ धुके निघून जाते . सूर्याचे थोडे तापमान वाढते , आणि सर्व समाप्त . नीहारम् इव भास्कर:हे उदाहरण भागवतामध्ये दिले आहे.नीहार , याला निहार म्हणतात. ज्याप्रमाणे भास्कराद्वारे , सूर्याद्वारे निहार लगेचच विलीन होते , तसेच जर एखादा आपली सुप्त भक्ती जागृत करू शकला , तर मग सर्व विलीन होते , त्याच्या सर्व पापी क्रियाकलापे , सर्व समाप्त . नीहारम् इव भास्कर: तुम्ही फक्त तयार करा ... तुम्ही पहा की सूर्य या रसायनाची रचना आहे, फक्त एक सूर्य तयार करा आणि तो फेकून द्या . फक्त सैद्धांतिक भविष्य, थापा , शब्दांचे खेळ खेळणे , ते चांगले नाही.

स्वरूप दामोदर : संशोधनाचा तोच तर अर्थ आहे . संशोधन म्हणजे आधी ज्या गोष्टी अनुभूत नाव्ह्याट्या त्या हे समजून घेणे.

प्रभुपाद: होय.संशोधन म्हणजे आपण सर्व मूर्ख आहोत हे मान्य करणे . कोणासाठी संशोधन? कोणाला माहित नाही . नाहीतर संशोधनाचा प्रश्न कुठे आहे? तुम्हाला माहित नाही. तुम्ही हे कबूल करता . तर अनेक गूढ शक्ती आहेत. आपल्याला माहित नाही हे कसे केले जात आहे. त्यामुळे आपल्याला अकल्पनीय शक्ती आहेत हे स्वीकारावे लागेल. आणि अतुलनीय सामर्थ्याचे हे तत्व मान्य केल्याशिवाय, ईश्वराचा काही अर्थ नाही. बाल योगी प्रमाणे नाही जो देव बनला आहे आणि तो लुटारू, मूर्ख लोकांसाठी आहे. परंतु हुशार लोक, ते अकल्पनीय शक्तीची परीक्षा घेतील. ज्याप्रमाणे आम्ही कृष्णाचा भगवान म्ह्णून स्वीकार केला अकल्पनीय शक्ती -आम्ही रामाचा स्वीकार केला अकल्पनीय शक्ती . इतक्या स्वस्त पणे नाही कि एक धूर्त येतो आणि म्हणतो, "मी देवाचा अवतार आहे." आणि दुसरा मूर्ख त्याला स्वीकारतो. असे नाही की "रामकृष्ण ईश्वर आहे." आम्ही स्वीकारत नाही. आम्हाला अकल्पनीय गूढ शक्ती दिसली पाहिजे. कृष्णा प्रमाणे, लहान पणी एक पर्वत उचलले . हि अकल्पनीय गूढ शक्ती आहे . रामचंद्र, त्यांनी एका खांबाविना दगडाचा पूल बांधला. दगड तरंगायला लागले "चला ." तर ती एक अकल्पनीय शक्ती आहे. आणि कारण आपण अशा अकल्पनीय शक्तींचे वर्णन समजू शकत नाही,, आपण असे म्हणतो , "अरे, या सर्व केवळ कथा आहेत." काय म्हणतात? पौराणिक कथा .

पण हे महान, महान ऋषी, वाल्मीकी आणि व्यासदेव आणि इतर आचार्य, त्यांनी केवळ कथा लिहिण्यासाठी त्यांचा वेळ वाया घालवला ? अशा उच्च विद्वानांनी? आणि त्यांनी पौराणिक कथा म्हणून यांचे स्पष्टीकरण दिले नाही .त्यांनी वास्तविक सत्य म्हणून ते स्वीकारले आहे. जंगलाला आग लागली होती , सर्व मित्र आणि गोप मुले , अस्वस्थ झाले. ते कृष्णाकडे पाहू लागले: "कृष्ण , काय करायचं? "ठीक आहे." त्याने सहज संपूर्ण आग गिळून टाकली . हि अकल्पनीय गूढ शक्ती आहे .तो देव आहे .

ऐश्वर्यस्य समग्रस्य वीर्यस्य यशस: श्रीय: (विषणु पुराण ६।५।४७)

या सहा संपत्ती पूर्ण पाने असणे , तो देव आहे . आपल्याकडे सुद्धा अकल्पनीय ऊर्जा किंवा गूढ शक्ती आहे. तर आपल्या शरीरात अनेक गोष्टी चालू आहेत. आपण ते समजावू शकत नाही. सारखेच उदाहरण . माझी नखं तंतोतंत स्वरूपात येत आहेत. ती आजारामुळे खराब झाली असली तरी , पुन्हा येत आहेत . मला माहित नाही की कोणती यंत्रणा कशी चालू आहे, आणि नखे येत आहेत , योग्य जागेवर आणि सर्वकाही ठीक आहे. ते माझ्या शरीरातून येत आहे. तर ती गूढ शक्ती आहे. ती माझ्यासाठी आणि डॉक्टरांसाठीही , सगळ्यांसाठी गूढ शक्ती आहे ... ते याबाबद्दल स्पष्टीकरण देऊ शकत नाहीत.