MR/Prabhupada 0121 - शेवटी कृष्णच सगळी सूत्र हलवत आहे
Morning Walk At Cheviot Hills Golf Course -- May 17, 1973, Los Angeles
कृष्ण-कांती :मानवी मेंदूच्या गुंतागुंतीच्या जटिल रचनेबाबत डॉक्टर आश्चर्यव्यक्त करत आहेत.
प्रभुपाद: हो,हो.
कृष्ण-कांती: ते आश्चर्यचकित झालेत.
प्रभुपाद: पण ते अज्ञानी आहेत.तो मेंदू नाही जो काम करतोय. तो आत्मा आहे जो काम करतोय. तीच गोष्ट जी संगणकाची आहे. दुष्ट समजतात की संगणक काम करतोय. नाही. मनुष्य काम करत आहे. तो बटण दाबतो, मग तो कार्यान्वीत होतो अन्यथा, त्या मशिनची किंमत काय राहिली? तुम्ही हजारो वर्षे मशिन ठेवलंत तरी ते सुरु होणार नाही. जेव्हा दुसरा माणूस येईल, बटण चालू करेल,मग ते कार्यान्वीत होईल. तर कोण काम करत आहे? काम कोण करत आहे मशिन की माणूस? आणि माणूस हे वेगळं मशिन आहे. आणि ते चालत परमात्म्याच्या भगवंतांच्या अस्तित्वामुळे. म्हणून सरते शेवटी, भगवंतांमुळे जग चालतय. मृत मनुष्य काम करू शकत नाही. तर मनुष्य कितीकाळ जिवंत राहू शकेल. जोपर्यंत परमात्मा आहे, आत्मा आहे, जरी आत्मा असला तरी, जर परमात्म्याने बुद्धी दिली नाही, तर तो काम करू शकणार नाही.
- मतः स्मृतिर्ज्ञानमपोहनं च (भ गी १५।१५)
देव मला बुद्धी देतो."तू हे बटण सुरु कर." मग मी बटण सुरु करतो. तर शेवटी श्रीकृष्ण काम करत आहेत. दुसरा अप्रशक्षित माणूस येऊन काम करू शकणार नाही कारण त्याला बुद्धी नाही. जो प्रशिक्षित आहे, तो काम करू शकतो,तर अशा गोष्टी चालू आहेत. शेवटी श्रीकृष्णांपर्यंत पोचतो. तुम्ही कोणताही शोध लावता, जे काही बोलता, ते श्रीकृष्णच तुमच्याकडून करून घेतात. श्रीकृष्ण तुम्हाला देतात... तुम्ही, तुम्ही मला अमुक गोष्ट दे म्हणून श्रीकृष्णांकडे प्रार्थना करता.श्रीकृष्ण तुम्हाला देतात. कधीकधी चुकून तुमचा प्रयोग यशस्वी झाल्याचे तुम्हाला जाणवते. तर श्रीकृष्ण जेव्हा बघतात की तुम्हाला प्रयोग करताना खूप त्रास आहे. "ठीक आहे करा." जसे यशोदा मैया कृष्णाला बांधायचा प्रयत्न करत होती,पण ती बांधू शकली नाही. पण जेव्हा कृष्ण काबुल झाले, तेव्हा शक्य झाले. त्याप्रमाणे, हे चुकून घडणे म्हणजे श्रीकृष्णानी तुम्हाला मदत केली: "ठीक आहे,तू खूप कष्ट केलेस, त्याचा हा घे परिणाम. सर्वकाही श्रीकृष्ण आहेत.
- मत्त: सर्वं प्रवर्तते (भ गी १०।८). हे समजावले आहे.
- मतः स्मृतिर्ज्ञानमपोहनं च (भ गी १५।१५)
सर्वकाही श्रीकृष्णांपासून उदभवते.
स्वरूप दामोदर: ते म्हणतात,"श्रीकृष्णांनी मला प्रयोगासाठी योग्य दिशा दाखवली नाही."
प्रभुपाद: हो, त्यानी दिली. अन्यथा तुम्ही ते कसे करत आहात. तुम्ही जे काही करत आहात, ते कृष्णच्या कृपेने आणि जेव्हा तुम्ही अजुन अनुकूल असाल,मग श्रीकृष्णाची तुम्हाला जास्त कृपा मिळेल. श्रीकृष्ण तुम्हाला कृपा, आशीर्वाद देतील. जितका तुम्हाला हवाय तितका, त्यापेक्षा जास्त नाही. ये यथा मां प्रपद्यन्ते तांस्तथैव... जेव्हढ्या प्रमाणात तुम्ही शरण जाल, तेव्हढी बुद्धी मिळेल. जर तुम्ही पूर्णपणे शरणागत झालात, तर पूर्ण बुद्धिमत्ता मिळेल. हे भगवद्-गीतेत म्हटलं आहे.
- ये यथा मां प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहम् (भ गी ४।११)