MR/Prabhupada 0122 - दुष्ट विचार करतात , " मी हे शरीर आहे "
Morning Walk At Cheviot Hills Golf Course -- May 17, 1973, Los Angeles
प्रभुपाद: श्रीकृष्ण सांगतात, "तु पूर्णतः शरण ये. मी तुला पूर्ण संरक्षण देईन."
- अहं त्वां सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि (भ गी १८।६६)
ते तुला पूर्ण ज्ञान देतील. (विराम) जेव्हा वैज्ञानिक जगत मान्य करेल ते आपलं मोठं यश असेल. फक्त ते मान्य करुदे. मग आपल्या कृष्णभवनामृत चळवळीला मोठं यश मिळेल. तुम्ही फक्त मान्य करा,"हो गूढ शक्ती आणि देव आहे." मग आमची चळवळ खूप यशस्वी होईल. आणि नक्कीच. फक्त मूर्खांच्यात बसून निरर्थक बडबड करणे,ती काही खूप मोठी हुशारी नाही.
- अन्धा यथान्धैरूपनीयमाना (श्री भ ७।५।३१). एक अंध मनुष्य इतर अंध व्यक्तींना नेत आहे. त्याची काय किंमत आहे? ते सर्व अंध आहेत. आणि जोपर्यत कोणी अंध राहील,तो देवाला मानणार नाही.ती परीक्षा आहे. जेव्हा आपण बघतो की तो देव मानत नाही, तो अंध आहे,दुष्ट,मूर्ख,जे काही तुम्ही म्हणाल ते. असं गृहीत धरा,तो कोणीही असला तरी, तो दुष्ट आहे. आपण मोठ्या मोठया रसायनशास्त्रज्ञ,तत्वज्ञानी लोकांना आव्हान देऊ शकतो,जे कोणी आपल्याकडे येतील. आम्ही म्हणू, "तू राक्षस आहेस." दुसरा केमिस्ट येईल,तुम्ही त्याला आणले,तो भारतीय?
स्वरूप दामोदर:हं ,चोरी(?)
प्रभुपाद: तर मी त्याला म्हंटलं की "तू राक्षस आहेस."पण तो चिडला नाही. त्याने मान्य केले. आणि त्याचे सगळे युक्तिवाद नाकारण्यात आले. कदाचित तुम्हाला आठवत असेल.
स्वरूप दामोदर: हो खरं तर,हो सांगत होता की "श्रीकृष्णांनी मला प्रयोग कसा करायचा ह्याच्या सगळ्या प्रक्रिया क्रमाक्रमाने सांगितल्या नाहीत." ते असे... तो असे म्हणत होता.
प्रभुपाद:हो. मी कशाला तुला देऊ? तू दुष्ट आहेस,तू श्रीकृष्णांच्या विरोधात आहेस,श्रीकृष्ण तुला कसे सुविधा देतील? जर तुम्ही श्रीकृष्णांच्या विरोधात असाल आणि तुम्हाला श्रीकृष्णांशिवाय मानमान्यता मिळवायची असेल तर ते शक्य नाही. सगळ्यात पहिले तुम्ही नम्र असले पाहिजे.श्रीकृष्ण तुम्हाला सगळ्या सोयी सुविधा देतील. अशा प्रकारे आपण कोणत्याही रसायनतंत्रज्ञ,शास्त्रज्ञ,तत्वज्ञानिंना आव्हान देण्याचे धाडस करू शकतो. का? श्रीकृष्णांच्या आधारावर, आमचा विश्वास आहे की "श्रीकृष्ण आहेत. जेव्हा मी त्याच्याशी बोलतो तेव्हा, श्रीकृष्ण मला बुद्धी देतात." हे मुख्यतत्व आहे. नाहीतर,पात्रता,आदर्श, त्यात त्यांची योग्यता जास्त आहे. आपण त्यांच्यासमोर सामान्य लोक आहोत. पण आपण त्यांना आव्हान कसे देऊ? कारण आम्हाला माहित आहे. जसे एक लहान मुलगा तो मोठ्या माणसाला आव्हान देऊ शकेल कारण त्याला माहित असते,"माझे वडील इथे आहेत." तो आंपल्या वडिलांचा हात धरतो,आणि त्याला खात्री असते की "मला कोणी काही करू शकणार नाही."
स्वरूप दामोदर: श्रीला प्रभुपाद, तद अप्य अफलतां जातं चा अर्थ मला जाणून घ्यायचा आहे. प्रभुपाद: तद अप्य अफलतां जातं स्वरूप दामोदर: तेषां आत्माभिमानीनं, बालकानां अनाश्रीत्य तेषां आत्माभिमानीनं..., बालकानां अनाश्रीत्य गोविंद-चरण-द्वयम
स्वरूप दामोदर: "मनुष्य जन्म वाया जातो ज्यांनी ..."
प्रभुपाद: हो. "जे कृष्णभावना जाणून घेण्याचा प्रयत्न करत नाहीत." फक्त तो जनावरासारखा मरतो.एवढेच, कुत्रा आणि मांजरासारखे, ते सुद्धा जन्म घेतात,. ते जेवतात,झोपतात,आणि त्यांनाही मुले होतात,आणि मग मारतात. मनुष्य जन्म पण तसाच आहे.
स्वरूप दामोदर: जातं म्हणजे प्रजाती? जातं? प्रभुपाद: जातं .जातं म्हणजे जन्म. अफलतां जातं. जातं म्हणजे तो निरुपयोगी होतो. निरुपयोगी. मनुष्य जन्म निरुपयोगी ठरतो जर त्याने गोविंद-चरण स्वीकारले नाही तर. गोविंदं आदी-पुरुषं तम् हम भजामी. जर त्याची खात्री पटली नाही की "मी भगवान श्रीकृष्ण-गोविंदांची पूजा केली पाहिजे." तर तो वाया गेला. एवढेच, त्याच आयुष्य वाया गेलं. स्वरूप दामोदर:आत्माभिमानीनं म्हणजे...
प्रभुपद:आत्मा,देहात्मा-मानीनां.
स्वरूप दामोदर: तर जे स्वकेंद्रित...
प्रभुपाद: " मी हे शरीर आहे." मी? त्यांना आत्म्या बद्दल काही माहिती नसते. मूर्ख, ते विचार करतात, "मी हे शरीर आहे." आत्मा म्हणजे शरीर, आत्मा म्हणजे शरीर नव्हे. आत्मा म्हणजे मन. तर हे आत्माभिमानी म्हणजे जीवनाची शारीरिक संकल्पना. बालक. बालक म्हणजे मूर्ख,मुलं,बालक. आत्माभिमानीनं बालकानां जे शारीरिक संकल्पने मध्ये गुंतलेले आहेत, ते लहान मुलं, मूर्ख,किंवा प्राण्यांसारखे आहेत. ह्या श्लोकावरून मी देहान्तराचे तत्व विशद करण्याची योजना आखत आहे. प्रभुपाद: हो, देहान्तर भ्रमदभी:. भ्रमदभी: म्हणजे देहान्तर, एक देह सोडून दुसऱ्या देहात फिरत रहाणे. जसे मी इथे आहे,मला माझा देह,पोशाख,आच्छादन आहे. आणि जेव्हा मी भारतात जाईन.ह्याची गरज नाही तर ते समजतात की शरीरअशा प्रकारे उत्क्रांतीत होते. पण नाही.इथे, काही ठराविक परिस्थितीत, मी हा पोशाख स्वीकारला आहे. दुसऱ्या ठिकाणी, काही ठराविक परिस्थितीत,मी दुसरा पोशाख स्वकारतो. म्हणून मी महत्वाचा आहे हा पोशाख नाही. पण हि दुष्ट लोक ते फक्त शरीराचा अभ्यास करतात. त्याला म्हणतात आत्माभिमानीनं,पोशाखाचा विचार केला तर,शरीर. बालकानं