MR/Prabhupada 0125 - समाज इतका भ्रष्ट झाला आहे



Lecture on SB 1.5.23 -- Vrndavana, August 4, 1974


सगळी लोक जी क्षुद्रांच्याही खालच्या दर्जाची आहेत, त्यांना पंचम म्हणतात,पाचव्या दर्जाची. ब्राम्हण पहिली श्रेणी , क्षत्रिय दुसरी श्रेणी वैश्य तिसरी श्रेणी ,क्षुद्र चौथी श्रेणी आणि बाकीचे- पाचवी श्रेणी . त्यांना चांडाळ म्हणतात.चांडाळ... झाडूवाला, चांभार, आणि... नीच कुळातील. अजूनही, भारतामध्ये, फक्त पाचव्या श्रेणीची माणसं, ती मांस,डुक्कर,आणि काहीवेळा गाय खातात. पाचवी श्रेणी. आता हा प्रघात पडला आहे. आणि तोउच्च कुळातील माणूस. जरा बघा. जो पाचव्या श्रेणीच्या लोकांचा धंदा होता, तो आता तथाकथित राजकारण्यांचा धंदा झाला आहे, तुम्ही बघा. जर तुमच्यावर पाचव्या श्रेणीची माणसं राज्य करत असतील, तर तुम्ही सुखी कसे होऊ शकता? ते शक्य नाही. समाजिक शांतता कशी राहील ? ते शक्य नाही. पण पाचव्या श्रेणीचा माणूस,कृष्ण भावनामृत चळवळीने त्यालाही शुद्ध करता येऊ शकते. म्हणून या चळवळीची अत्यन्त गरज आहे. कारण आता ह्या क्षणाला पहिल्या श्रेणीची माणसं नाहीत, पहिल्या श्रेणीची माणसं नाहीत,दुसऱ्या श्रेणीची माणसं नाहीत. कदाचित तिसरी श्रेणी,चौथी श्रेणी,पाचवी श्रेणी,असेच. पण ते शुद्ध होऊ शकतात. म्हणजे... फक्त हि कृष्णभवनमृत चळवळ करू शकते. कोणीही शुद्ध होऊ शकत.


मां हि पार्थ व्यपाश्रित्य येSपि स्यु: पापयोनय: (भ गी ९।३२).

त्यांना पाप-योनी म्हणतात,नीच कुळात जन्मलेले,पापी कुटुंब, पाप-योनी. भगवान श्रीकृष्ण सांगतात, येSपि स्यु: पापयोनय: काही हरकत नाही मग जरी ते कुठल्याही पाप-योनीतील (कुळातील) असले. मां हि पार्थ व्यपा... "जर त्यांनी माझा आश्रय घेतला, मग..." तो आश्रय घेतला पाहिजे कारण श्रीकृष्णांचे प्रतिनिधी प्रचार करत आहेत. तर तिथे काहीही कमतरता नाही. फक्त एखाद्याने त्याचा आश्रय घेतला पाहिजे.एवढेच. जसे चैतन्य महाप्रभूंचे कार्य प्रचारक निर्माण करणे आहे. "सर्वत्र जा."

अमार अज्ञाय गुरु हना तार ई देश (चै च मध्य ७।१२८)).


"जा" ते नित्यानंद प्रभू, हरिदास ठाकूर यांना प्रचार करायला पाठवायचे. "कृपया हरे कृष्णाचा जप करा,कृपया हरे कृष्णाचा जप करा. कृपया श्रीकृष्णांना शरण जा." रस्त्यावर जमावसुद्धा होता. नित्यानंद प्रभू आणि हरिदास ठाकूरांनी बघितला, आणि त्यांनी विचारलं,हा जमाव कसला?" "नाही, तिथे दोन भाऊ आहेत,जगाई आणि माधाई, खूप त्रासदायक. ते मद्यपी, स्त्री-शिकार आणि मांस भक्षण करतात,आणि ते नेहमीच समस्या निर्माण करतात. तर नित्यानंद प्रभुनी लगेच ठरवलं, "ह्या लोकांना पहिल्यांदा का मुक्त करू नये? मग माझ्या देवतेच्या नावाचा गौरव होईल श्रीचेतन्य महाप्रभूंच्या नावाचा गौरव करण्यात येईल. अध्यात्मिक गुरूंचा गौरव कसा होईल,हि शिष्यांची जबाबदारी आहे. परंपरा मी माझ्या अध्यात्मिक गुरूंची स्तुती करेन, तुम्ही तुमच्या अध्यात्मिक गुरूंची स्तुती करा. जर आपण फक्त एवढे केले, स्तुती, जेणेकरुन श्रीकृष्णांचा गौरव होईल. नित्यानंद प्रभूंचा असा विचार होता,की "प्रथम ह्या पतित जीवांचा उद्धार का करू नये? कारण पतित जीवांचा उध्दार करण्यासाठी चैतन्य महाप्रभूंनी अवतार घेतला. आणि... आणि ह्या कली युगात पतित जीवांची कमतरता नाही.

पतित-पावन-हेतु तव अवतार
मो सम पतित प्रभु ना पाइबे अार


नरोत्तमदास ठाकूर स्वतःला श्रीचैतन्य महाप्रभूंच्या चरणकमलांचे दास समजतात. की "हे भगवंता, तुम्ही घेतलेला अवतार हा पतित जीवांचा उद्धार करण्यासाठी आहे. पण मी सर्वात खालच्या स्तरातील पतित जीव आहे.तर माझा नंबर पहिला आहे.कृपया माझा उद्धार करा." मो सम पतित प्रभू ना पाइबे आर "तुम्ही, तुमचा निर्धार पतितांचा उद्धार करण्याचा आहे. तर मी सर्वात पाहिल्या दर्जाचा पतितात्मा.कृपया माझा स्वीकार करा." तर कली-युग,लोक दुःख भोगत आहेत. सगळे पतित जीव, सर्व पाचव्या श्रेणीची माणसं मांस भक्षक,दारुडे. ती गर्विष्ठ माणसं, परंतु खरं तर ते पाचव्या,सहाव्या आणि दहाव्या दर्जाची माणसं, सभ्य गृहस्थही नाहीत. म्हणून माझे गुरु महाराज म्हणत की "समाज एवढा भ्रष्ट झाला आहे. की कोणीही सभ्य मनुष्य इथे राहू शकत नाही." आणि... पण, चैतन्य महाप्रभूंची सेवा करायची संधी उपलब्ध आहे. कारण समाज एवढा पतित आहे, म्हणून चैतन्य महाप्रभूंची सेवा करायची चांगली संधी आहे. कारण श्री चैतन्य महाप्रभूंचा अवतार ह्या पतित जीवांचा उद्धार करण्यासाठी आहे. तर तुम्हाला श्री चैतन्य महाप्रभूंची सेवा करायची संधी मिळाली आहे. महाप्रभूंना संतुष्ट करा कारण त्यांची इच्छा पतित जीवांचा उद्धार व्हावा ही आहे. श्रीकृष्णांची पण तीच इच्छा आहे. यदा यदा हि ग्लानिर्भवति भारत. धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. श्रीकृष्ण अवतरतात... ती ऐक... देवांचं कार्य अशाच पद्धतीने चालत.


जे ह्या भौतिक जगाच्या चक्रात फिरत आहेत अश्या दुष्टांचा उद्धार करण्याची त्यांना फार चिंता आहे. श्रीकृष्ण सतत चिंता करतात. भगवंत स्वतःच्या मूळ रूपात स्वतःला प्रकट करतात. ते अवतरतात. आपल्या प्रामाणिक प्रतिनिधीला आपला सेवक किंवा पुत्र म्हणून पाठवतात. तर हि श्रीकृष्णांची चिंता, सर्व पतित जीवांचा उद्धार व्हावा. म्हणून ह्या संधी आहेत. योगिनी,योगिनी: ते सर्व जग फिरत असतात. फक्त पावसाळ्यात ते प्रवास करत नाहीत. असं नाही की बाकीच्या ऋतूत फक्त जेवणे आणि झोपणे. नाही. कारण पावसाळ्यात, प्रवास करणे,त्रासदायक होते,म्हणून फक्त चार महिने. तर ह्या चार महिन्यात जिथे कुठे ते रहातात. सेवक बनून जर त्यांची कोणी सेवा केली, तर त्यांना मुक्ती मिळते. तेथे प्रचाराचा प्रश्नच नाही. फक्त सेवा करण्याची संधी देतात,पतित जीवांचा उद्धार होतो. पण तुम्ही तेव्हढे सक्षम असले पाहिजे,काहीही न देता सेवा घेणे. नाहीतर तुम्ही नरकात जाल जर तुम्ही खरोखरच अध्यात्मिक स्तरावर असाल,तर इतरांना तुमच्या सेवेची थोडीशी संधी दिलीत,त्याचा उद्धार होईल. तत्त्वज्ञान समजण्याचा प्रश्न नाही. भक्त इतके परिपूर्ण असले पाहिजेत . म्हणूनच, अशी पद्धत आहे, एखाद्याने भक्ताला पाहताच त्याने वाकून नमस्कार करून आणि आशीर्वाद घ्यायचा... चरण स्पर्श करायचे. हि पद्धत आहे. कारण चरण स्पर्श केले... महत-पाद-राजोभिषेकं. जर एखाद्याने खरोखरच आध्यत्मिक जीवनात प्रगती केली असेल आणि तो आहे, घेतात, त्याच्या चरणकमलांना स्पर्श करण्याची संधी लोक घेतात. मग तो भक्त बनतो. हि पद्धत आहे.