MR/Prabhupada 0126 - केवळ माझ्या अध्यात्मिक गुरूंच्या समाधानासाठी



Lecture on BG 4.18 -- Delhi, November 3, 1973


स्त्री भक्त: तुम्ही सांगता की जर आपण काही कार्य केले, तर त्या कार्याची तपासणी केली पाहिजे की कृष्ण त्याने संतुष्ट होतात का. पण त्याची चाचणी काय आहे?

प्रभुपाद: जी तुम्ही रोज गाण्याची साधना करता त्याने जर अध्यात्मिक गुरु संतुष्ट झाले तर श्रीकृष्ण संतुष्ट होतील, यस्य प्रसादाद् भगवत्-प्रसादो यस्या प्रसादान् न गति: कुतोsपि । जर अध्यात्मिक गुरु संतुष्ट झाले तर श्रीकृष्णांही संतुष्ट होतील. हि चाचणी आहे. जर ते खूष नसले,मग तिथे दुसरा काही मार्ग नाही,हे खूप समजायला सोपं आहे. समजा कोणी कार्यालयात काम करत आहे, मुख्य लिपिक किंवा त्या विभागातील अधीक्षक त्याचा मुख्य साहेब असेल. सर्वजण काम करत आहेत. जर त्याने अधीक्षकाला खूष केले, किंवा मुख्य लिपिकाला,मग हे समजले पाहिजे की त्याने व्यवस्थापकीय संस्थापकाला खूष केले. ते फार कठीण नाही. तुमच्या वरचा साहेब, श्रीकृष्णांचा प्रतिनिधी, तो खूष झाला पाहिजे. यस्य प्रसादाद् भगवत्-प्रसादो यस्या म्हणून अध्यात्मिक गुरूंच्या मार्गदर्शनाची आवश्यकता आहे. अध्यात्मिक गुरूंच्या रूपात श्रीकृष्ण मार्गदर्शन करतात.

असे चैतन्य चरितामृतात सांगितले आहे. गुरु-कृष्ण-कृपाय. गुरु-कृष्ण-कृपाय. म्हणून गुरु-कृपा. गुरूंची कृपा, कृष्णांची कृपा आहे. तर जेव्हा ती दोघे संतुष्ट असतील,तेव्हा आपला मार्ग स्पष्ट झाला.

गुरु-कृष्ण-कृपाए पाए भक्ति लता बीज (चै च मध्य १९।१५१)

तर तुम्हाला ह्याचा संदर्भ गुर्वाष्टकामध्ये मिळाला नाही का ? यस्य प्रसादाद् भगवत्-प्रसादो यस्या प्रसादान् न गति: कुतोsपि । जशी हि चळवळ. हि चळवळ फक्त माझ्या अध्यात्मिक गुरूंना संतुष्ट करण्यासाठी सुरु झाली. त्यांची इच्छा होती. चैतन्य महाप्रभूंची इच्छा होती की हि चळवळ संपूर्ण जगभरात पसरावी. तर त्यांनी माझ्या अनेक गुरु बंधूंना आज्ञा दिली ,आणि इच्छा... नुसते आदेश दिले नाही तर,त्यांची इच्छा होती. त्यांनी माझ्या काही गुरु बांधून परदेशी प्रचार करायला पाठवले. परंतु ह्या ना त्या कारणामुळे,तो यशस्वी झाला नाही.त्याला परत बोलावले. म्हणून मी विचार केला,"या वृद्धापकाळात आपण प्रयत्न करुया."

तर अध्यात्मिक गुरूंची तीव्र इच्छा पुरी करण्याची इच्छा होती. तर तुम्ही मला मदत केली आहे. हे यशस्वी होण्यासाठी. आणि हे यस्य प्रसादाद् भगवत्-प्रसादो आहे. आपण जर प्रामाणिकपणे अध्यात्मिक गुरूंच्या मार्गदर्शनाखाली कार्य केले. त्यामध्येच श्रीकृष्णांचे समाधान आहे, आणि श्रीकृष्ण आपल्याला प्रगती करायला मदत करतील.