MR/Prabhupada 0130 - भगवान श्रीकृष्ण अनेक रूपात अवतरित होतात



Lecture on BG 4.5 -- Bombay, March 25, 1974


भगवान श्रीकृष्ण अनेक रूपात अवतरित होतात. फक्त श्रीकृष्णांचे स्थान काय आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करा. ते प्रत्येकाच्या हृदयात परमात्मा म्हणून स्थित आहेत.

ईश्वर: सर्वभूतानां ह्रद्देशेsर्जुन तिष्ठति (भ गी १८।६१)

आणि ते सर्व जीवांना मार्गदर्शन करतात. आणि असंख्य,अमर्याद जीव आहेत. तर निरनिराळ्या जीवांच्या योग्यतेनुसार त्यांना वेगवेगळ्या प्रकारे मार्गदर्शन करावे लागते. ते किती व्यस्त आहेत,जरा कल्पना करण्याचा प्रयत्न करा. तरीही त्यांची स्थिती तीच आहे. गोलोक एव निवसत्यखिलात्मभृतो (ब्रह्मसंहिता ५.३७).

गोलोक एव निवसती. श्रीकृष्ण त्यांच्या मूळ जागी स्थित आहेत, गोलोक वृंदावन. आणि ते श्रीमती राधा राणी बरोबर सुख उपभोगत आहेत. तो व्यवहार नाही... हे मायावादी तत्वज्ञान नाही. कारण त्यांनी स्वतःला अनेक जीवांच्या हृदयात विस्तारित केले आहे. त्याचा अर्थ असा नाही कि ते त्यांच्या निवास्थानात नाहीत. नाही. ते अजूनही तिथे आहेत, ते आहेत श्रीकृष्ण.

पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते (इशो).

जरी... इथे आपल्याला भौतिक अनुभव आला आहे. जर तुम्हाला एक रुपया मिळाला,जर त्यातला एक आणा घेतलात,मग पन्नास आणे उरतील. किंवा जर दोन आणे घेतले,चाळीस आणे उरतील. जर तुम्ही सोळा आणे घेतलेत,तर काही शिल्लक राहणार नाही. पण श्रीकृष्णांच्या बाबतीत तस नाही. ते स्वतःचा असंख्य अवतारात विस्तार करू शकतात. तरीही मूळ श्रीकृष्ण तसेच रहातात. ते आहेत श्रीकृष्ण. आम्हाला अनुभव आहे: एक वजा एक बरोबर शून्य. पण तिथे,आध्यत्मिक जगात... त्याला संपूर्ण म्हणतात. एकातून दशलक्षवेळा एक वजा केला, तरी, मूळ एक एकच रहातो. ते आहेत श्रीकृष्ण.

अद्वैतमच्युतमनादिमनन्तरूपं (ब्रह्मसंहिता ५.३३)

तर फक्त वैदिक ग्रथांचा अभ्यास करून वेदेषु त्या श्रीकृष्णांना तुम्ही समजू शकत नाही, जरी वेद म्हणजे,वेदांत म्हणजे, श्रीकृष्णांना जाणणे.

वेदेश्च सर्वैरहमेव वेद्यो (भ गी १५।१५).

पण दुर्दैवाने,कारण आपण श्रीकृष्ण किंवा त्यांच्या भक्तांचा आश्रय घेत नाही. वेदांचा उद्देश काय आहे हे आपण समजू शकत नाही. ते सातव्या अध्यायात स्पष्ट केले असेल.

मय्यासत्त्कमनाः पार्थ... मय्यासत्त्कमनाः पार्थ योगंयुञ्जन्मदाश्रयः। मदाश्रयः

असंशय समग्रं मा यथा ज्ञास्यसि तच्छृणु (भ गी ७।१)

असंशय,जर कुठल्याही शंकेविना तुम्हाला श्रीकृष्णांना जाणून घ्यायचं असेल. आणि समग्रं, आणि पूर्ण, मग तुम्हाला या योग प्रणालीचा सराव केला पाहिजे. तो योग म्हणजे काय?

मन्मना भव मद्भत्त्को मद्याजी मां नमस्कुरु (भ गी १८।६५)

मदाश्रयः योगं युञ्ज... योगं युञ्जन,मदाश्रयः मदाश्रयः, हा शब्द महत्वाचा आहे. मत म्हणजे "एकतर तुम्ही थेट घ्या..." -ते इतकं सोपं नाही. "... माझा आश्रय, किंवा त्याचा आश्रय घ्या,ज्याने माझा आश्रय घेतला आहे." जसे इलेक्ट्रिक पॉवर हाऊस आहे त्याप्रमाणे,आणि एक प्लग आहे. तो प्लग इलेक्ट्रिक पॉवर हाउसला जोडला आहे,आणि जर तुम्ही तुमची वायर प्लग मध्ये जोडली,तुम्हालासुद्धा वीज मिळेल. तसेच,जसे ह्या अध्यायाच्या सुरवातीला नमूद केले आहे,

एवं परम्पराप्राप्तमिमं राजर्षयो विदु: (भ गी ४।२)

जर तुम्ही परंपरा पध्दतीचा आश्रय घेतला... तेच उदाहरण,जर तुम्ही प्लगचा आश्रय घेतलात जो पॉवर हाउसला जोडला आहे, तुम्हाला लगेच वीज मिळेल. तसेच, जर तुम्ही अशा माणसाचा आश्रय घेतलात जो परंपरेद्वारे जोडला गेला आहे... येथे एक परंपरा पद्धत आहे. भगवान श्रीकृष्णांनी ब्रह्मदेवाला. ब्रम्हदेवांनी नारदांना उपदेश दिला. नारदांनी व्यासदेवांना उपदेश दिला.व्यासदेवांनी मध्वाचार्याना उपदेश दिला. मध्वाचार्यांनी अनेक प्रकार उपदेश दिला. मग माधवेंद्रपुरी. माधवेंद्र पुरी,ईश्वर पुरी. ईश्वर पुरींकडून चैतन्य महाप्रभु. अशा प्रकारे परम्परा प्रणाली आहे. चार वैष्णव संप्रदाय आहेत. रुद्र संप्रदाय,ब्रम्ह-संप्रदाय,कुमार-संप्रदाय,आणि लक्ष्मी-संप्रदाय,श्री-संप्रदाय. तर संप्रदाय-विहिना ये मंत्रास ते निष्फल मताः. जर तुम्हाला श्रीकृष्णांचा उपदेश संप्रदायाद्वारा मिळाला नाही. मग निष्फल मताः, मग जे काही तुम्ही शकलात,ते निरुपयोगी आहे. ते निरुपयोगी आहे. तो दोष आहे. अनेक माणसं भगवद्-गीतेचा अभ्यास करतात,परंतु ते श्रीकृष्णांना जाणू शकत नाहीत. कारण त्यांना गुरु परंपरेने मिळालं नाही.

एवं परम्परा प्राप्तं (भ गी ४।२)

परंपरा, जोपर्यंत तुम्ही परंपरेद्वारे... तेच उदाहरण. जर तुम्ही पॉवर हाउसला जोडलेल्या प्लग मार्फत वीज घेतली नाहीत. आपल्या वायर आणि दिव्याचा काय उपयोग?त्याचा काही उपयोग नाही. म्हणून श्रीकृष्ण कसे विस्तार करतात,ते वेदेषु दुर्लभ. जर तुम्हाला फक्त शैक्षणिक ज्ञान असेल, मग ते शक्य होणार नाही. वेदेषु दुर्लभमदुर्लभमात्मभत्त्को (ब्रह्मसंहिता ५.३३). ब्रह्मसंहितेत असं विधान आहे.