MR/Prabhupada 0129 - श्रीकृष्णांवर अवलंबून राहा - मग कसलीही कमतरता भासत नाही
Lecture on SB 7.6.1 -- Vrndavana, December 2, 1975
श्रीकृष्णांनी सांगितलंय, मन मना भव मद भक्तो मदयाजी माम् नमस्कुरु (भ गी ९।३४).
आम्ही हाच उपदेश देत आहोत. ह्या मंदिरात प्रत्येकाला सांगत आहोत,"इथे कृष्ण आहेत. श्रीकृष्णांचा सतत विचार करा हरे कृष्ण जप करा." मग आपल्याला विचार करावा लागेल. "हरे कृष्ण, हरे कृष्ण," म्हणजे श्रीकृष्णांचा विचार करणे. जेव्हा तुम्ही श्रीकृष्णांचे नाव ऐकता, मन-मना. आणि ते कोण करेल? मद-भक्त. जोपर्यंत आपण श्रीकृष्णांचे भक्त बनत नाही, तोपर्यंत आपण वेळ वाया घालवू शकत नाही."कृष्ण, हरे कृष्ण, हरे कृष्ण." याचा अर्थ फक्त हरे कृष्ण मंत्राचा जप करून तुम्ही श्रीकृष्णांचे भक्त होता.
मन्मना भव मद्भत्त्को मद्याजी. आता,हि श्रीकृष्णांची उपासना... संपूर्ण दिवस श्रीकृष्णांची मंगल-आरती,श्रीकृष्णांचा जप,ह्यात गुंतून राहता. श्रीकृष्णांसाठी नैवेद्य बनवणे,कृष्ण प्रसाद वाटणे, अनेक प्रकारे. तर सगळी जगभर आमचे भक्त-१०२ केंद्र आहेत- ते केवळ कृष्णभावनामृत सेवेमध्ये व्यस्त असतात. हे आमच्या प्रचारातचे तंत्र आहे,सतत, दुसर काही नाही. आम्ही दुसरा काही व्यवसाय करत नाही पण आम्ही पंचवीस लाख रुपये खर्च करतो. दरमहा पंचवीस लाख रुपये, पण श्रीकृष्ण पुरवतात.
- तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम् (भ गी ९।२२)
जर तुम्ही कायम कृष्ण भावनेत राहिलात,पूर्णता श्रीकृष्णांवर अवलंबून,मग कोठल्याही गोष्टीची टंचाई भासणार नाही. मी हा कृष्ण व्यवसाय चाळीस रुपयांनी सुरु केला. आता आम्हाला चाळीस करोड रुपये मिळाले आहेत. असं कोणता व्यवसाय अख्या जगात आहे का जो दहा वर्षात चाळीस रुपयांचे चाळीस करोड करेल. याबाबतच असं काही उदाहरण नाही. आणि दहा हजार लोक,ते रोज कृष्ण प्रसाद ग्रहण करत आहेत. तर हे कृष्णभवनामृत, योगक्षेमं वहाम्यहम् (भ गी ९।२२) .
जेव्हा तुम्ही कृष्णभवनामृत बनता. तुम्ही फक्त त्याच्यावर (कृष्णावर) अवलंबून असता आणि प्रामाणिकपणे काम करा. आणि मग श्रीकृष्ण सगळ्या गोष्टींचा पुरवठा करतील. सगळ्या. तर ह्याचा खरोखरचा प्रत्यय लोकांना आला आहे. उदाहरणच घ्यायचं झालं मुंबईत,आता एक करोड रुपयाच्या किमतीची जमीन आहे. आणि जेव्हा मी हि जमीन खरेदी केली, कदाचित, तीन किंवा चार लाखाला. तर हा पूर्णतः सट्टा झाला करणं मला आत्मविश्वास होता की "मी देऊ शकेन. श्रीकृष्ण मला देतील." तेव्हा पैसे नव्हते.तो मोठा इतिहास आहे. मी त्याची चर्चा करू इच्छित नाही. पण मला आता प्रत्यक्ष अनुभव आला आहे की तुम्ही श्रीकृष्णांवर अवलंबून राहिलात- मग तिथे कसलीही कमतरता भासत नाही. जे काही तुम्हाला हवंय ते तुम्हाला प्राप्त होईल.तेषां नित्याभियुक्तानां. तर सतत कृष्णभवनामृत सेवेत व्यस्त रहा. मग सगळेकाही पूर्ण होईल. जर तुम्हाला काही इच्छा असेल.