MR/Prabhupada 0138 - भगवंत खूप दयाळू आहेत तुमची जी काही इच्छा आहे ते पूर्ण करतील



Ratha-yatra -- Philadelphia, July 12, 1975


सभ्य स्त्री आणि पुरुषांनो, सर्व प्रथम मी तुमचे आभार मानू इच्छितो. ह्या महान शहरातील रहिवासी,फिलाडेल्फिया. ह्या चळवळीत भाग घेण्यासाठी, तुम्ही फार दयाळू आणि उत्साही आहात. मी तुमचा खूप ऋणी आहे. मी विशेषकरून अमेरिकन मुलं आणि मुलींचा ऋणी आहे जी मला खूप मदत करत आहेत. पाश्चात्य देशात ह्या कृष्णभावनामृत चळवळीचा प्रचार करायला. माझ्या अध्यात्मिक गुरूंनी मला पाश्चात्य देशात ह्या कृष्णभावनामृत चळवळीचा प्रचार करायची आज्ञा दिली. तर १९६५ साली मी प्रथम न्यूयॉर्क मध्ये आलो. नंतर १९६६ साली ह्या संघाची न्यूयॉर्कमध्ये व्यवस्थित नोंदणी झाली. आणि १९६७ पासून ही चळवळ नियमितपणे अमेरिका,युरोप,कॅनडा मध्ये सुरु झाली. आणि साऊथ पॅसिफिक समुद्र, ऑस्ट्रेलिया, आणि संपूर्ण जगात.

तर मी तुम्हाला ह्या कृष्णभावनामृत चळवळीची थोडक्यात माहिती देऊ शकतो. श्रीकृष्ण ह्या शब्दाचा अर्थ सर्व-आकर्षक, श्रीकृष्ण फक्त मानवांना नाही तर सगळ्या जीवांना आकर्षित करतात, अगदी प्राणी,पक्षी,मधमाश्या,झाड,फुल,फळ,पाणी. ते वृन्दावनच चित्र आहे. हे भौतिक जग आहे. आपल्याला अध्यात्मिक जगाचा अनुभव नाही. परंतु आपल्याला आत्मा म्हणजे काय आणि पदार्थ म्हणजे काय ह्याची झलक मिळू शकते. जरा जिवंत मनुष्य आणि मृत मनुष्य ह्यातला फरक समजून घेण्याचा प्रयत्न करा. मृत माणूस म्हणजे जशी जिवंत शक्ती शरीरातून निघून गेली,मग ते मृत शरीर, निरुपयोगी. आणि जोपर्यंत शरीरात जिवंत शक्ती आहे,तोपर्यंत त्या शरीराला महत्व. तर जसे आपण ह्या शरीरात अनुभवतो,मृत पदार्थ,आणि काहीतरी जिवंत शक्ती. त्याप्रमाणे, दोन जग आहेत: भौतिक जग आणि अध्यात्मिक जग.

आपण जिवंत प्राणी, प्रत्येकजण अध्यात्मिक जगाशी संबंधित आहोत आपला भौतिक जगाशी काही संबंध नाही. ह्या नाहीतर त्या कारणांनी,आपण भौतिक जग आणि भौतिक शरीराशी जोडले गेलो आहोत. आणि मुद्दा असा आहे जरी आपण चिरंतर शक्ती आहोत. आपल्या भौतिक शरीराच्या संपर्कामुळे आपल्याला जन्म,मृत्यू,जरा,आणि व्याधी ह्या चार क्लेशातून जावं लागत. त्यातून आपल्याला जावं लागत. ह्या भौतिक जगात एका प्रकारच शरीर मिळत आणि ते काही कालाने नाश पावत. जसे एखादी भौतिक गोष्ट. उदाहरणादाखल, तुमचे कपडे. आपण विशिष्ट प्रकारचे वस्त्र परिधान करतो,पण जेव्हा ते फाटते,ते वापरण्याजोगे राहत नाही. मग आपण ते फेकून देतो,नवीन कपडे आणतो. तर हे भौतिक शरीर आत्मा,जिवंत शक्तीचा पोशाख आहे. पण कारण आपण ह्या भौतिक जगाशी बांधले गेले आहोत, आपल्याला हे भौतिक जग उपभोगायची इच्छा असते,आपल्याला वेगवेगळे शरीर मिळते. भगवद् गीतेत ह्याला यंत्र म्हटले आहे.शरीर हे, वास्तविक यंत्र आहे. भगवद् गीतेत असं म्हटलंय,

ईष्वर: सर्वभूतानां
ह्रद्देशेsर्जुन तिश्ठति
भ्रामायान् सर्व भुतानि
यन्त्रारूढानि मायया:(भ गी १८।६१)

तर आपण मनुष्य प्राणी आपल्याला इच्छा आहेत. "माणूस ठरवतो;देव नाकारतो." देव खुप दयाळू आहे. तुमची जी काही इच्छा आहे ते पूर्ण करतील. जरी त्यांनी सांगितलं की "ह्या प्रकारची भौतिक इच्छा तुम्हाला कधीही समाधानी करणार नाही," पण तरीही आम्हाला पाहिजे. म्हणून देव,श्रीकृष्ण आपल्याला वेगवेगळ्या इच्छा पूर्ण करायला वेगवेगळे शरीर देतात. ह्याला भौतिक, बद्ध जीवन म्हणतात. हे शरीर, इच्छेप्रमाणे शरीर बदलणे ,याला उत्क्रांती प्रक्रिया म्हणतात. उत्क्रांतीद्वारे आपण अनेक लाखो शरीर बदलत मानवी शरीर धारण करतो. जलजा नव-लक्षाणी स्थावरा लक्ष-विमशति. आपण ९००,००० पाण्यातील जातींच्या योनीतुन भ्रमण करतो. त्याचप्रमाणे झाडे,दोन लाख झाडांच्या जाती, अशाप्रकारे,निसर्ग नियमाने, निसर्ग आपल्याला मानवी शरीर देतो. फक्त आपली चेतना विकसित किंवा जागृत करण्यासाठी. निसर्ग आपल्याला संधी देतो, "आता तुम्हाला काय करायचे आहे? आता तुम्हाला जागृत चेतना मिळाली आहे. आता तुम्हाला परत उत्क्रांती प्रक्रियांद्वारे जायचं आहे,किंवा तुम्हाला उच्च ग्रहांवर जायचे आहे. किंवा तुम्हाला भगवंतांकडे जायचं आहे, किंवा इथेच रहायचं आहे?" हे पर्याय आहेत. असं भगवद् गीतेत म्हटलं आहे,

यान्ति देवव्रता देवान्
पित्रन् यान्ति पित्र व्रता:
भूतेज्य यान्ति भूतानि
मद-याजिनो अपि यान्ति माम् :(भ गी ९।२५)

आता तुम्ही निवड करा. जर तुम्हाला उच्च ग्रहांवर जायचं असेल, तुम्ही जाऊ शकता. जर तुम्हाला इथेच रहायचं असेल,मधल्या ग्रहावर, तुम्ही तस करू शकता. आणि जर तुमची खालच्या ग्रहांवर जायची इच्छा असेल, तर तुम्ही जाऊ शकता. आणि जर तुम्ही भगवंतांकडे जाऊ इच्छित, तर तिथे सुद्धा जाऊ शकता. ते तुम्ही निवडलेल्या पर्यायावर अवलंबुन आहे. त्यामुळे, ह्या भौतिक जगात काय फरक आहे. कदाचित उच्च ग्रह किंवा निम्न ग्रह, आणि अध्यात्मिक जग म्हणजे काय? अध्यात्मिक जग म्हणजे तिथे भौतिक उपभोग नाही. सगळ्यात चेतना आहे. जस मी तुम्हाला संगितले. झाड,फुल,फळ,पाणी,प्राणी - सगळंकाही अध्यात्मिक आहे. तर तिथे संहार होत नाही. ते चिरंतर आहे. जर तुम्हाला त्या अध्यात्मिक जगात जायचं असेल, मग या मनुष्य जन्मात तुम्हाला ती संधी मिळू शकते. आणि जर तुम्हाला ह्या भौतिक जगात रहायचं असेल,तुम्ही असे करू शकता.