MR/Prabhupada 0139 - हे अध्यात्मिक नातं आहे



Lecture on SB 3.25.38 -- Bombay, December 7, 1974


म्हणून जर आपण श्रीकृष्णांवर प्रेम केले,तर भौतिक गोष्टींसारख नाश पावणार नाही. एकतर तुम्ही मालकाप्रमाणे प्रेम करा... इथे मालक, जोपर्यंत तुम्ही मालकाची सेवा करता, तोपर्यंत खुश असतो. आणि जोपर्यंत तुम्ही पैसे देता, नोकर खुश असतो. पण अध्यात्मिक जगात अशी काही गोष्ट नाही. जर मी काही विशिष्ट परिस्थितीत सेवा करू शकत नसलो,तरी मालक खुश असतो. आणि नोकर सुद्धा - मालकाने पैसे दिले नाहीत - तरी तो खुश असतो.

त्याला एकजीव होण म्हणतात,संपूर्ण. ते... हे उदाहरण इथे आहे. इथे या संस्थेमध्ये अनेक विद्यार्थी आहेत आम्ही त्यांना काहीच देत नाही. परंतु ते माझ्यासाठी सर्वकाही करतील हे अध्यात्मिक नातं आहे. पंडित जवाहरलाल नेहरू, ते जेव्हा लंडनला होते. त्यांच्या वडिलांनी त्यांना,मोतीलाल नेहरू, एक नोकर ठेवण्यासाठी तीनशे रुपये दिले. नंतर एकदा ते लंडनला गेले, तर त्यांनी पाहिलं की तिथे नोकर नाहीच आहे. पंडितानी विचारलं, "तुझा नोकर कुठे आहे?" त्यांनी सांगितलं, "नोकरच काय उपयोग आहे?

माझ्याकडे करण्यासारखं काही काम नाही. मी स्वतःच सगळं करतो." "नाही,नाही. मला तो इंग्लिश माणूस तुझा नोकर म्हणून हवाय." तर त्यांना त्यासाठी पैसे द्यावे लागतील. हे एक उदाहरण आहे. माझ्याकडे शेकडो आणि हजारो सेवक आहेत ज्यांना मला पैसे द्यावे लागत नाहीत. हे आध्यात्मिक नातं आहे. हे आध्यात्मिक नातं आहे. ते पैसे मिळतील म्हणून सेवा करत नाहीत. माझ्याकडे काय आहे? मी एक गरीब भारतीय आहे. मी काय देऊ शकतो? परंतु सेवक प्रेमापोटी, आध्यात्मिक प्रेम.

मी सुद्धा पगार न घेता त्यांना शिकवतो, हे अध्यात्मिक आहे. पूर्णस्य पूर्णमादाय (ईशोपनिषद स्तवन). सगळंकाही पूर्ण आहे. जर तुम्ही श्रीकृष्णांना तुमचा मुलगा, तुमचा सखा,तुमचा प्रेमी,म्हणून स्वीकारलंत,तर तुम्ही कधीही फसवले जाणार नाही. म्हणून श्रीकृष्णांना स्वीकारायचा प्रयत्न करा. हे खोटे सेवक किंवा मुलगा किंवा वडील किंवा प्रेमी सोडून द्या. तुमची फसवणुक होईल.