MR/Prabhupada 0141 - आई दूध पुरवते आणि तुम्ही तिची हत्या करता
Garden Conversation -- June 14, 1976, Detroit
जयअद्वैत: महाविद्यालयीन कार्यक्रमात,सत्वस्वरूप महाराज आणि मी वर्णाश्रम धर्मावर अनेक वर्ग घेतले. कारण ते नेहमी हिंदू जाती व्यवस्थे विषयी काहीतरी ऐकू इच्छित होते,म्हणून त्यांनी आम्हाला त्या विषयावर बोलायला सांगितले. आणि मग आम्ही वर्णाश्रम धर्माबद्दल बोललो. आणि त्याच्याकडे पराभव करण्याची काही युक्ती नव्हती. ते नेहमी, काही कमकुवत वादविवाद, पण त्याच्याकडे काही चांगले मुद्दे नव्हते.
प्रभुपाद: त्यांचे मुद्दे काय होते?
जयअद्वैत: बहुदा... त्यांच्याकडे काही कल्पना आहेत, ते तर्क करतील की सामाजिक गतिशीलता नाही. कारण त्यांच्याकडे जन्मानुसार जात अशा काही शारीरिक कल्पना होत्या.
प्रभुपाद:नाही, ते खरं नाही.
जयअद्वैत:नाही.
प्रभुपाद:पात्रता.
जयअद्वैत:जेव्हा आम्ही खरी कल्पना सादर करतो,मग ते गप्प बसतात, त्यांच्याकडे कुठलाही तर्क नसतो. आणि मग आम्ही त्यांच्या व्यवस्थेला आव्हान देतो की,"तुमच्या समाजाचा उद्देश काय आहे? त्याच ध्येय काय आहे?" आणि ते काही बोलू शकत नाहीत.
प्रभुपाद: जोपर्यंत कार्याची विभागणी होत नाही, काहीही पूर्णपणे उत्तम प्रकारे करु शकत नाही. शरीरात नैसर्गिक विभागणी आहे - डोकं, भुजा, उदर आणि पाय. तसेच समाज व्यवस्थेमध्ये सुद्धा डोकं म्हणजे, बुद्धिमान मनुष्यांचा वर्ग, ब्राम्हण. मग सगळं सुरळीत चालेल. आणि, आत्ता या क्षणी,बुद्धिमान मनुष्यांचा वर्ग नाही. सर्व मजूर, कामगार वर्ग, चौथी श्रेणी. प्रथम श्रेणी, द्वितीय श्रेणी नाही. म्हणून समाज गोंधळलेल्या स्थितीत आहे. तिथे मेंदू नाही.
जयअद्वैत:त्यांचा फक्त आक्षेप, जेव्हा आम्ही ब्रम्हचारी, गृहस्थ,वानप्रस्थ,सन्यास बद्दल सांगितलं. मग ते आपोआप विरोधी बनतात,कारण ते समजतात की आम्ही इंद्रिय तृप्तीच्या विरोधात आहोत.
प्रभुपाद: हो इंद्रिय संतुष्टी म्हणजे जनावरांची संस्कृती. आणि इंद्रिय संयमन म्हणजे मानवी संस्कृती... इंद्रिय संतुष्टी म्हणजे मानवी समाज नाही. इंद्रिय तृप्ती म्हणजे मानवी संस्कृती नाही. नाही ते त्यांना माहित नाही. त्यांचा केंद्रबिंदू इंद्रिय तृप्ती आहे. तो दोष आहे. ते मानव समाजत प्राणी संस्कृतीने चालत आहे. तो दोष आहे. इंद्रिय संतुष्टी म्हणजे प्राणी संस्कृती आहे. आणि प्रत्यक्षात ते प्राणी आहेत. जर ते त्यांच्या स्वतःच्या मुलाची हत्या करू शकतात, तर ते प्राणी आहेत. कुत्रा,मांजराप्रमाणे, ते स्वतःच्या मुलांची हत्या करतात. ते काय आहे? ते प्राणी आहेत. कोण सांगत होत की मुलाला राहिलेल्या सामानात टाकलं,ते काय होत.
हरी-शौरी: राहिलेल्या सामानाचे कपाट. त्रीविक्रम महाराज, जपानमध्ये. ते म्हणाले वीस हजाराच्यावर, हो वीस हजार बाळांना, ते राहिलेल्या सामानाच्या कपाटात ठेवतात आणि निघून जातात.
प्रभुपाद: बस स्थानकात? रेल्वे स्थानकात? सोडलेल्या सामानात. ठेवतात आणि कुलूप लावतात, आणि परत येत नाहीत. मग कधी दुर्गंधी येते... हेच चाललं आहे. ही केवळ प्राणी संस्कृती आहे. गायीच्या दुधाचा शेवटचा थेंब घ्यायचा आणि लगेच तीला कत्तलखान्यात पाठवायची. ते तस करत आहेत. कत्तलखान्यात पाठवायच्या आधी,गायीचं शेवटच्या थेंबापर्यंत दूध काढतात. आणि लगेच हत्या करता. तर तुम्हाला दुधाची गरज आहे, तुम्ही एवढं दूध काढता, दुधाशिवाय तुम्ही... आणि ज्या प्राण्यापासून तुम्ही दूध घेता, ती तुमची आई आहे. हे ते विसरतात. आई दूध पुरवते,ती तीच्या शरीरातून दूध देते, आणि तुम्ही आईला मारता. आईची हत्या ? ही सभ्यता आहे का? आणि दूध गरजेचे आहे. म्हणून तुम्ही ते शेवटच्या थेंबापर्यंत काढता. नाहीतर, काय गरज आहे शेवटच्या थेंबापर्यंत गायीचे दूध काढण्याची.ते गरजेचे आहे. तर नाही का तिला जगू द्यायचं आणि तुम्हाला दूध पुरवू द्यायच आणि तुम्ही शेकडो आणि हजारो दुधापासून पुष्टिक, रुचकर,पदार्थ बनवू शकता. तर हुशारी कशात आहे? दूध दुसरं काही नसून रक्ताचे परिवर्तन आहे. तर रक्त काढण्यापेक्षा,परिवर्तन स्वीकारा आणि चांगल्या प्रकारे,सभ्य माणसासारखे जगा.
नाही, ती सज्जन माणसं नाहीत. बीभत्स,संस्कृती नसलेली. जर तुम्हाला मांस घ्यायची इच्छा असेल, तुम्ही कोणत्याही क्षुल्लक प्राण्याला मारू शकता जसे डुक्कर आणि कुत्रा ज्याचा काही उपयोग नाही. तुम्ही त्यांना खाऊ शकता,जर तुम्हाला खायचंच असेल. त्याला परवानगी आहे, डुक्कर आणि कुत्र्यांना परवानगी आहे. कारण कोणताही सज्जन मनुष्य मांस भक्षण करणार नाही. ते खालच्या दर्जाचे आहे. म्हणून त्याला परवानगी आहे. ठीक आहे तुम्ही डुक्कर घ्या, "श्वापक खालच्या श्रेणीची माणसं, ती डुक्कर आणि कुत्राचे मांस घेतात. अजूनही ती खातात. जर तुम्हाला मांस हवं असेल,तर तुम्ही ह्या बिनमहत्वाच्या प्राण्यांना मारू शकता. तुम्ही का अशा प्राण्यांची हत्या करता ज्यांच्या दुधाच्या शेवटच्या थेंबाची गरज आहे? याला काय अर्थ आहे? आणि जर तुम्ही श्रीकृष्णांना घ्याल, त्यांनी पुतनाचा वध केला, पण तिला आईचा दर्जा दिला. कारण श्रीकृष्णांना उपकृत वाटले,"जो काही पुतनाचा हेतू असेल,पण मी तिचे स्तनपान केले,तर आता ती माझी आई आहे." तर आपण गाईचं दूध घेतो. गाय माझी आई झाली नाही का? कोण दुधाशिवाय जगू शकतो? आणि कोणी गाईचं दूध प्यायलं नाही? लगेच, सकाळी तुम्हाला दूध लागत. आणि प्राणी, ती तुम्हाला दूध पुरवते,ती तुमची आई नाही का? काय अर्थ आहे? आईच्या हत्येची संस्कृती. आणि त्यांना सुखी होण्याची इच्छा आहे. आणि त्याचा परिणाम कालांतराने महायुद्ध आणि नरसंहार.