MR/Prabhupada 0140 - एक चांगला मार्ग आहे , एक वाईट मार्ग आहे - तिसरा मार्ग नाही



Lecture on SB 6.1.45 -- Laguna Beach, July 26, 1975


हि कृष्णभावनामृत चळवळ आहे. आपण लोकांना शिकवत आहोत की तुम्ही जन्मा मागून जन्म दुःख भोगत आहात. आता मनुष्य समाज अशा स्थितीत आहे की, त्यांना माहित नाही की या जन्मानंतर पुनर्जन्म आहे. ते इतके प्रगत आहेत. अगदी मांजर आणि कुत्री, त्यांना माहित नाही की या जन्मानंतर पुनर्जन्म आहे. ते इथे सांगितलं आहे: येन यावान् यथाधर्मो धर्मो वेह समीहितः इह, इह म्हणजे "या आयुष्यात." स एव तत्फलं भुङ्त्त्के तथा तावदमुत्र वै. अमुत्र म्हणजे "पुढील जन्म." तर आपण पुढील जन्माची तयारी करत आहोत या... यथाधर्मो, यथाधर्मो. इथे दोन गोष्टी आहेत: तुम्ही धार्मिक किंवा अधर्माने वागू शकता. इथे तिसरा मार्ग नाही. एक धार्मिक मार्ग आहे; एक मार्ग अधर्माकडे नेणारा आहे.

तर इथे दोन्ही उल्लेखले आहेत. येन यावान् यथाधर्मो धर्मो. धर्म म्हणजे घटनात्मक. एका इंग्लिश शब्दकोशात सांगीतल आहे त्याप्रमाणे, "एक प्रकारची श्रद्धा." म्हणजे धर्म नाही. श्रद्धा आंधळी असू शकते. त्याला धर्म म्हणत नाहीत. धर्म म्हणजे मूळ,घटनात्मक स्थान. तो धर्म आहे. मी अनेक वेळा सांगितलंय... अगदी पाण्यासारखे. पाणी द्रवपदार्थ आहे. तो त्याचा धर्म आहे. पाणी, परिस्थितीमुळे घन बनले,बर्फ, पण तरीही ते पुन्हा द्रव बनण्याचा प्रयत्न करते करणं तो त्याचा धर्म आहे. आपण बर्फ ठेवला,आणि हळूहळू त्याच द्रवात रूपांतर होत. याचा अर्थ पाण्याची घन अवस्था कृत्रिम आहे. काही रासायनिक घटकांमुळे ते घन झाले आहे, पण नैसर्गिकरित्या ते द्रव बनते. तर आपली आत्ताची स्थिती घन आहे: "देवाबद्दल काही ऐकू नका." पण आपली नैसर्गिक स्थिती ही आहे की आपण भगवंतांचे सेवक आहोत. कारण आपण गुरु शोधत आहोत... सर्वोच्च गुरु श्रीकृष्ण आहेत.

भोत्त्कारं यज्ञतपसां सर्वलोकमहेश्वरम् (भ गी ५।२९)

श्रीकृष्ण सांगतात,"मी पूर्ण सृष्टीचा स्वामी आहे. मी उपभोक्ता आहे." ते मास्टर आहेत. चैतन्य चरितामृतात सुद्धा म्हटलंय, एकला ईश्वर कृष्ण . ईश्वर म्हणजे नियंत्रक किंवा मास्टर. एकला ईश्वर कृष्ण आर सब भ्र्त्या: "श्रीकृष्ण वगळता, कोणतेही लहान किंवा मोठे जीव, ते सर्व सेवक आहेत, श्रीकृष्ण वगळता." म्हणूनच तुम्ही बघू शकता: श्रीकृष्ण कोणाचीही सेवा करत नाहीत . ते फक्त आंनद उपभोगत आहेत. भोत्त्कारं यज्ञतपसां सर्वलोक... बाकीचे आपल्यासारखे, सर्वप्रथम खूप कष्ट करतात आणि मग आनंद उपभोगतात. श्रीकृष्ण कधीही काम करत नाहीत. न तस्य कार्यं करणम च विद्यते. तरीही,ते उपभोगतात, ते श्रीकृष्ण आहेत. न तस्य... ही वैदिक माहिती आहे. न तस्य कार्यं करणम च विद्यते. भगवान श्रीकृष्ण,त्यांना करण्यासारखे काही नाही. म्हणून, तुम्ही बघा, श्रीकृष्ण नेहमी गोपींबरोबर नृत्य करत असतात आणि गोपांबरोबर खेळत असतात. आणि जेव्हा त्यांना थकवा येतो,ते यमुनातीरी झोपतात आणि लगेच त्यांचे मित्र येतात. कोणी त्यांना वारा घालत; कोणी मसाज करत. म्हणून ते मास्टर आहेत. जिथे ते जातात तिथे ते मास्टर आहेत. एकला ईश्वर कृष्ण.

ईश्वर परम कृष्ण ( ब्रह्मसंहिता ५.१).

सर्वोच्च नियंत्रक श्रीकृष्ण आहेत. "मग नियंत्रक कोण आहे?" नाही,त्यांच्यावर कोणी नियंत्रक नाही. ते श्रीकृष्ण आहेत. इथे आपण एखाद्या संस्थेचे संचालक आहोत,अमेरिकेचे अध्यक्ष, पण मी सर्वोच्च नियंत्रक नाही. जेव्हा केव्हा लोकांना वाटत,लगेच ते मला खाली उतरवतात. ते आपण समजत नाही, आपण स्वतःला स्वामी, नियंत्रक म्हणून समजतो. पण माझ्यावर कोणाचं तरी नियंत्रण आहे. तर तो नियंत्रक नाही. इथे आपण काही प्रमाणात नियंत्रक पाहू,पण तो दुसऱ्या कोणाद्वारे नियंत्रित केला जाईल. तर श्रीकृष्ण म्हणजे ते नियंत्रक आहेत,पण असं कोणी नाही जो त्यांच्यावर नियंत्रण ठेवेल. ते श्रीकृष्ण आहेत; ते भगवंत आहेत. हे समजण्याचे विज्ञान आहे. देव म्हणजे ते सगळ्याचे नियंत्रक आहेत,पण त्यांच्यावर कोणीही नियंत्रक नाही.