MR/Prabhupada 0143 - लाखो अरबो विश्व् आहेत



Sri Isopanisad, Mantra 13-15 -- Los Angeles, May 18, 1970


"माझ्या भगवंता, सगळ्या जीवांचा रक्षणकर्ता,तुमचं मुख तुमच्या दैदिप्यमान तेजाने झाकलं गेलंय. कृपाकरुन ते आच्छादन बाजूला करा आणि तुमचं दर्शन तुमच्या शुद्ध भक्ताला होऊ द्या." इथे वैदिक पुरावे आहेत. ईशोपनिषद हे वेद आहे.यजुर्वेदाचा भाग आहे. तर इथे असं सांगितलंय, हिरण्मयेन पात्रेण सत्यस्यापिहितंमुखम्। सूर्यासारखे. तिथे सूर्यग्रह आहे, त्या ग्रहाच्या अधिष्ठात्री देवतेचे नाव विवस्वान आहे. आपल्याला हि माहिती भगवद् गीतेत मिळते. विवस्वान्मनवे प्राह. प्रत्येक ग्रहावर त्या ग्रहाची अधिष्ठात्री देवता असते. आपल्या ग्रहांप्रमाणेच,देवता नसेल तर कोणीतरी राष्ट्राध्यक्ष असतो. पूर्वी,परीक्षित महाराजांपर्यंत या ग्रहावर फक्त एकच राजा होता. एक राजा म्हणजे... संपूर्ण ग्रहावर एका ध्वजाखाली राज्य होते. तसेच, प्रत्येक ग्रहावर एक अधिष्ठात्री देवता असते. तर इथे असं सांगितलंय सर्वोच्च अधिष्ठात्री देवता म्हणजे श्रीकृष्ण. अध्यात्मिक जगात, अध्यात्मिक जग सर्वोच्च ग्रह . हे भौतिक जग, भौतिक जगात हे एक विश्व् आहे. अशी लाखो अरबो विश्व् आहेत. आणि अशा विश्वात अनेक लाखो अरबो ग्रह आहेत.

यस्य प्रभा प्रभवतो जगदण्ड कोटि (ब्रम्हसंहिता.५.४०).

जगदण्ड कोटि म्हणजे विश्व. अंड. संपूर्ण विश्व अंड्याप्रमाणे आहे. तर कोटि. कोटि म्हणजे शेकडो आणि हजारो. तर ब्रम्हजोतीमध्ये शेकडो आणि हजारो अशी विश्व आहेत. आणि अश्या विश्वात शकडो आणि हजारो ग्रह आहेत. तसेच,अध्यात्मिक आकाशातसुद्धा शेकडो आणि हजारो,अमर्यादित संख्येने वैकुंठ ग्रह आहेत. प्रत्येक वैकुंठ ग्रह भगवंतांच्या आधिपत्या खाली असतो. कृष्ण ग्रह सोडून बाकी सगळ्या वैकुंठ ग्रहांवर नारायणांचं अधिराज्य आहे. आणि प्रत्येक नारायणांना निरनिराळी नाव आहेत. त्यातली काही आपल्याला माहित आहेत. जसे आपण प्रद्युन्म अनिरुद्ध, शंकर्षन... आपल्याला फक्त चोवीस नाव माहित आहेत, पण अशी अनेक आहेत.

अव्दैतम् अच्युतम् अनादिम् अनंत रुपं (ब्रम्हसंहिता.५.३३).

तर हे ग्रह ब्रम्हजोतीच्या तेजाने झाकले गेले आहेत. तर इथे अशी प्रार्थना केली आहे की हिरण्मयेन पात्रेण सत्यस्यापिहितंमुखम्। पिहितं म्हणजे आच्छादलेले. जसे तुम्ही प्रखर सूर्य प्रकाशामुळे सूर्यलोक बघू शकत नाही. तसेच, कृष्णग्रह, इथे आपल्याकडे चित्र आहे. कृष्ण ग्रहावरून तेज पसरलं आहे. तर ते तेज भेदून गेल पाहिजे. तर इथे अशी प्रार्थना केली आहे. हिरण्मयेन पात्रेण सत्यस्या। परम सत्य, श्रीकृष्ण,त्यांचा ग्रह ब्रम्हजोतीच्या तेजाने आच्छादला गेला आहे. तर भक्त प्रार्थना करतात,"कृपया ते दूर करा. ते बाजूला केलेत तर मी तुम्हाला पाहू शकेन." तर ब्रम्हजोती, मायावादी तत्वज्ञानी,त्याना माहित नाही की त्याचाही पलीकडे काही आहे. इथे वैदिक पुरावा आहे. की ब्रम्हजोती सोनेरी तेजाप्रमाणे आहे. हिरण्मयेन पात्रेण. भगवंतांचे मुखकमल तेजाने आच्छादले गेले आहे. तत् त्वं पूषन्नपावृणु तुम्ही रक्षणकर्ता आहात. आणि तुम्हीच पालनकर्ता अहात. कृपया हे आच्छादन काढा म्हणजे आम्ही तुमचं मुखकमल प्रत्यक्षात पाहू शकू,