MR/Prabhupada 0144 - याला माया म्हणतात



Sri Isopanisad, Mantra 2-4 -- Los Angeles, May 6, 1970

प्रकृतेः क्रियमाणानि गुणैः कर्माणि सर्वशः । अहङ्कारविमूढात्मा कर्ताहमिति मन्यते (भ.गी.३.२७) भक्तांच्या रोखाने, श्रीकृष्ण स्वतः ताबा घेतात, आणि सामान्य जिवात्माच्या रोखाने, माया ताबा घेते. माया सुद्धा श्रीकृष्णांची प्रतिनिधी आहे. फक्त चांगल्या नागरिकांच्या सारखे, त्यांची काळजी थेट सरकार द्वारे घेतली जाते, आणि गुन्हेगार, त्यांची तुरुंग विभाग माध्यमातून सरकार द्वारे काळजी घेतली जाते, फौजदारी विभाग माध्यमातून. त्यांची काळजी घेतली जाते. तुरुंगामध्ये सरकार काळजी घेते की कैद्यांना काही गैरसोय होत नाही - त्यांना पुरेसे अन्न मिळते; ते रोगग्रस्त असल्यास त्यांना रुग्णालयात उपचार देतात. प्रत्येक काळजी घेतली जाते. पण शिक्षे अंतर्गत. त्याचप्रमाणे, आम्ही ह्या भौतिक जगात, निश्चितपणे काळजी घेतली जाते, परंतु मध्ये, शिक्षेच्या द्वारे. जर आपण हे केले, मग चापट मारणे. जर आपण हे केले, मग लाथ मारणे. जर तुम्ही हे केले, तर हे... असे चालत आले आहे. ह्याला तिपटिने दुखे म्हणतात. पण मायेच्या प्रभावा अंतर्गत आपण विचार करतो की मायेचे हे लाथा झाडणे, मायेचे हे चापट मारणे, हे मायेचे फटकावणे आपल्याला चांगले वाटते. तुम्ही बघितलत? याला माया म्हणतात. आणि जसे तुम्ही कृष्ण भावनाभावित होता, नंतर श्रीकृष्ण तुमची काळजी घेतात. अहं त्वां सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः (भ.गी.१८.६६). श्रीकृष्ण, जसे तुम्ही शरण जाल, श्रीकृष्ण ताबडतोब शब्द देतात, "मी तुमची काळजी घेईन. मी तुम्हाला सगळ्या पासून वाचविन, सगळ्या पापी प्रतिक्रीये पासून." आमच्या आयुष्यात पापी प्रतिक्रियांचा ढीग साचला आहे, या भौतिक जगात कितीतरी जन्मो-जन्म. आणि जसे तुम्ही श्रीकृष्णांना शरण जाल, ताबडतोब श्रीकृष्ण तुमची जबाबदारी घेतात आणि तो सर्व पापी प्रतिक्रिया कश्या दुरुस्त करायच्या याचे समायोजन करतो. अहं त्वां सर्वपापेभ्यो मा शुचः. श्रीकृष्ण म्हणतात, "अजिबात संकोच करू नका." जर तुम्ही असा विचार केलात की, "अरे, मी इतक्या पापी क्रियाकलाप केल्या आहेत, मला श्रीकृष्ण कसे वाचवतील?" नाही. श्रीकृष्ण सर्व-शक्तिशाली आहेत. ते तुम्हाला वाचवू शकतील. तुमचे काम आहे त्यांना शरण जाणे, आणि कुठलाही किन्तु न ठेवता, त्याच्या सेवेसाठी आपले जीवन अर्पण करा, आणि अशा प्रकारे आपले रक्षण होईल.