MR/Prabhupada 0145 - आपण काही प्रकारच्या तपस्या स्वीकारल्या पाहिजेत



Lecture on SB 3.12.19 -- Dallas, March 3, 1975

स्वातंत्र आपोआप येत नाही. जसे तुम्ही आजारी आहेत. तुम्ही तापाने ग्रस्त आहात किंवा इतर काही दुखण्याने, कुठल्यातरी आजाराने. म्हणून तुम्हाला काही पथ्य पाळावी लागतील. ज्याप्रमाणे तुमचे शरीर गळू झाल्याने दुखत आहे. ते फार वेदनादायक आहे. नंतर, बरं होण्यासाठी,शस्त्रक्रिया करणं आवश्यक आहे. जर तुम्हाला बरं व्हायचं असेल. म्हणून तपस्या. ती तपस्या आहे. तप म्हणजे वेदनादायक स्थिती, तप तापमानाप्रमाणे, जर आपण उच्च तापमान ठेवले असल्यास, ११० अंश, मग ते तुम्हाला फार असह्य होत.ते फार वेदनादायक आहे. अगदी आम्हाला भारतीयांना पण - आम्ही भारतात जन्मलो,उष्णकटिबंधीय हवामान - तरीही जेव्हा तापमान शंभरच्यावर गेलं तर, ते असह्य होत. आणि तुमच्याबद्दल काय बोलणार? तुम्ही वेगळ्या हवामानात जन्माला आला आहेत. तसेच, आम्ही कमी तापमान सहन करू शकत नाही. जर पन्नास अंशापेक्षा कमी असेल, तर ते आम्हाला असह्य होत. तर वेगवेगळे हवामान, भिन्न तापमान आहेत. आणि कॅनडात ते शून्यापेक्षा चाळीस अंश कमी सहन करतात. तर हा जीवनाच्या विविध स्थितीचा प्रश्न आहे.

पण आपण बद्ध आहोत: उच्च तापमान,कमी तापमान, अति थंडी पण आपल्याला कोणत्याही प्रकारचे बद्ध जीवन जगायला प्रशिक्षण दिले जाऊ शकते. ही क्षमता आम्हाला मिळाली आहे. बंगाली प्रसिद्ध म्हण आहे, शरीरे न महाशय ज्या सहबे ताय सय, म्हणजे " हे शरीरआहे," म्हणजे, "ते काहीही सहन करू शकत जर आपण तसा सराव केलात." असं नाही की, तुम्ही एका परिस्थितीत आहात, आणि जर ती तुम्ही बदलली,तर ते इतकं असह्य होत की तुम्ही जगू शकत नाही. नाही. जर तुम्ही सराव... जसे आता कोणी जात नाही. पूर्वीच्याकाळी ते हिमालय पर्वतावर जात,आणि तिथे खूप थंडी असते. आणि तपस्या... सराव आहे,पद्धत: कडक उन्हाळ्यात संत व्यक्ती किंवा ऋषी,ते सर्वत्र अग्नी पेटवतील. आधीच कडक उन्हाळा, आणि तरीही ते सर्वत्र अग्नी पेटवतील आणि त्यांचं ध्यान चालूच राहील. याला तपस्या म्हणतात. हे तपस्येचे प्रकार आहेत. तिथे कडक उन्हाळा आहे आणि ते ती व्यवस्था करतील. तिथे अंत्यत थंडी आहे,शंभर अंशापेक्षा कमी, आणि ते मानेपर्यंत पाण्याखाली जातील आणि ध्यान करतील. हे तपस्येचे प्रकार आहेत. तपस्या.

म्हणून भगवंतांच्या साक्षत्कारासाठी पूर्वी लोकांनी अश्या प्रकारच्या कडक तपश्चर्या केल्या होत्या. आणि आत्ताच्या क्षणी आपण इतके पतित आहोत,आपण हे चार नियम सहन करू शकत नाही? हे एवढं अवघड आहे का? आपण काही तपस्या करायला लावतो, की "अशा गोष्टीत गुंतू नका. कोणतेही अवैध लैगिक संबंध नाही,नशा नाही,मांसाहार नाही, जुगार नाही." कृष्णभावनामृत बनण्यात, प्रगती करण्यासाठी ह्या तपस्या आहेत. तर हे फार अवघड आहे का? हे अवघड नाही. जर एखाद्याने सराव केला, अतिशय थंडीत मानेपर्यंत पाण्यात जाण्याचा हे जास्त कठीण आहे की अवैध लैगिक संबंध नाही,नशा नाही,मांसाहार नाही हे ? आम्ही उपदेश करत नाही,"लैगिक संबंध नाही." अवैध लैगिक संबंध तर ह्यात अवघड काय आहे? पण हे युग एवढं पतित आहे की अगदी ह्या प्रार्थमिक तपस्या आम्ही अमलात आणू शकत नाही.ती खरी अडचण आहे. पण तुम्हाला भगवंतांचा साक्षात्कार व्हायला हवा असेल, इथे जस सांगितलंय,तपसैव फक्त तपस्येने, केवळ तपश्चर्येमुळे, एखादा जाणू शकेल, नाहीतर नाही. नाहीतर हे शक्य नाही.

म्हणून हा शब्द वापरला आहे.,तपसैव. तपसा एव: "फक्त तपस्येने." दुसरा काही पर्याय नाही. तपसा एव परम. परम म्हणजे सर्वोच्च. जर तुम्हाला सर्वोच्च,संपूर्ण जाणून घ्यायची इच्छा असेल, मग तुम्हाला काही प्रकारच्या तपस्या स्वीकाराव्या लागतील. नाहीतर हे शक्य नाही. सुरवातीला थोडी तपस्या. जसे एकादशी. तो सुद्धा एक तपस्येचा भाग आहे. खरंतर एकादशीला आपण अन्न ग्रहण करायचा नाही, अगदी पाणी सुद्धा नाही. पण आपल्या संघात आपण एवढ्या कडकपणे करत नाही. आम्ही सांगतो,"एकादशी,तुम्ही धान्य ग्रहण करू नका. फळ आणि दूध घ्या. ही तपस्या. आपण ही तपस्या पळू शकत नाही का? जर आपण एवढी साधी तपस्या अमलात आणायला तयार नसलो. मग आपण आपल्या स्वगृही परत जाण्याची अपेक्षा कशी करू शकतो, देवाच्याद्वारी? नाही ते शक्य नाही. म्हणून इथे असं सांगितलंय, तपसैव,तपसा एव. एव म्हणजे नक्कीच.

तुम्ही केलंच पाहिजे. आता, ही तपस्या,प्रायश्चित्त अमलात आणून तुमचं नुकसान होईल का? तुमचं काही नुकसान नाही. आता,जोकोणी बाहेरून येईल, ते आपल्या संघात, आपले सदस्य,मुले मुली बघतील. ते म्हणतात,"तेजस्वी चेहरे" नाही का? त्यांना फरक दिसतो. एक सध्या कपड्यातील पाद्री... मी लॉस अँजेल्सहुन हवाईला जात होतो. एक पाद्री, तो विमानात माझ्याकडे आला. तर त्यांनी माझी परवानगी मागितली,"मी तुमच्याशी बोलू शकतो का?" "हो, का नाही?" तर त्यांचा पहिला प्रश्न की "मला दिसलं की तुमच्या शिष्यांचे चेहरे तेजस्वी आहेत. हे कस केलंत? ते प्रामाणिक होते. तर नुकसान कुठे आहे? हे पाळून,पापकर्म, अशा सगळ्या गोष्टी नाकारून, आपलं नुकसान होत नाही. आपण साधं आयुष्य जगू शकतो. आपण जमिनीवर बसू शकतो, आपण जमिनीवर झोपू शकतो. आपल्याला खुर्च्या टेबल इत्यादींची गरज नाही, मोठया किमतीच्या भरजरी कपड्यांचीही गरज नाही. तर तपस्येची गरज आहे. जर आपल्याला अध्यात्मिक जीवनात प्रगती करायची इच्छा असेल, आपल्याला काही प्रमाणात तपस्या स्वीकारायला पाहिजे. या कलियुगात तीव्र प्रकारच्या तपस्या जशी थंडीत स्वीकारू शकत नाही. आम्ही खाली पाण्याखाली, कधीकधी बुडतो किंवा कधीकधी इथपर्यंत,आणि मग ध्यान करतो किंवा हरे कृष्ण जप करतो. ते शक्य नाही. कमीतकमी. तर तपस्या केलीच पाहिजे. तर आपण हे श्लोकावरून लक्षात घेतलं पाहिजे की जर आपण भगवंतांना जाणण्या बाबत गंभीर असू तर काही प्रमाणात तपस्या केली पाहिजे.ते गरजेचे आहे.