MR/Prabhupada 0154 - तुमच्या शस्त्रांना कायम धार काढून ठेवा



Room Conversation -- May 7, 1976, Honolulu

तमाल कृष्ण: तुमच्या जाऊ देवाचियाद्वारीच्या लेखात मार्क्सवाद्यांबद्दल तुम्ही त्याना मूर्ख म्हंटलंय, तुम्ही म्हंटलंय मार्क्सवादी मूर्खपणा.

प्रभुपाद: हो त्याचे काय तत्वज्ञान आहे? उपशामक?

तमाल कृष्ण:द्वंद्वात्मक भौतिकवाद

प्रभुपाद: तर, आम्ही लिहिलाय एक द्वंद्वात्मक अध्यात्मिकवाद.

हरी-शौरी: हरिकेश.

प्रभुपाद:हरिकेश. तमाल कृष्ण: हो तो आपल्यासाठी वाचेल. मला वाटत काहीवेळा तो पर्व यूरोपात, प्रचार करतो. आम्हाला तसा अहवाल मिळाला . त्याने तुम्हाला तस लिहिलंय का?

प्रभुपाद: हो, मी ते ऐकलंय, पण तो ठीक आहे की नाही?

तमाल कृष्ण: अहवालवरून असं दिसतंय की तो कधीकधी काही पर्व युरोपियन देशात जातो. मुख्यतः इंग्लंड,जर्मनी आणि सकॅन्डिनाव्हिअस मध्ये त्याने लक्ष केंद्रित केले आहे. त्याचा एक गट आहे आणि ते बोलण्याच्या माध्यमातून (प्रचार) आणि पुस्तक वितरण करतात. आणि काहीवेळा तो जातो कुठल्या देशात?

भक्त: सिझेचोस्लोवाकिया, हंगेरी,बुडापेस्ट.

तमाल कृष्ण: तो काही साम्यवादी (कम्युनिस्ट) देशांत जातो.

भक्त: ते गाडीला चोर कप्पा बनवतात आणि त्याच्याखाली पुस्तक लपवतात.म्हणजे चेक नाक्यावर कोणी बघणार नाही. गाडिच्याखाली सगळी तुमची पुस्तक असतात. जेव्हा ते देशात येतात ते त्या विद्यार्थ्यांना पुस्तक वाटतात.

तमाल कृष्ण:क्रांती.

प्रभुपाद: ते फार चांगलं आहे.

भक्त: कधीकधी तो म्हणतो जेव्हा तो बोलतो दुभाषी तो जे सांगतो ते सांगत नाही. कारण ते... तमाल कृष्ण: कधीकधी तो विसरतो - सामान्यतः तो जपून बोलतो - संयमित शब्द. पण तो सांगतो एकदा किंवा दोनदा, त्याने थेट सुरवात कृष्ण भावनामृताने केली आणि दुभाष्याने त्याच्याकडे पाहिलं आणि त्याने जे सांगितलं त्याच भाषांतर स्थानिक भाषेत केलं नाही. काहीवेळा तो स्वताला विसरतो आणि बोलायला सुरवात करतो, श्रीकृष्ण भगवंत आहेत. आणि दुभाषी त्याच्याकडे अचानक बघतो. साधारणपणे तो सगळं झाकतो.

प्रभुपाद: त्याने चांगलं काम केलं आहे.

तमाल कृष्ण:तो एक योग्य व्यक्ती आहे., खूप बुद्धिमान.

प्रभुपाद: तर या मार्गाने... तुम्ही सर्व बुद्धिमान आहेत, तुम्ही योजना आखू शकता. उद्देश हा की पुस्तक वितरण कसे करायचे. हा प्रथम विचार आहे भगवद गीतेमध्ये हे खूप लाक्षणीकरित्या वर्णन केले आहे की आपल्याला शरीर आणि त्याचे निरनिराळे भाग मिळाले आहेत. जसे अर्जुन रथावर बसला आहे. तिथे सारथी आहे, घोडे ,लगाम आहेत. ते युद्धक्षेत्र आहे. आणि धनुष्य, आणि बाण आहे.ते लाक्षणीकरित्या आहे. तर हे आपल्या कृष्णभावनामृत चळवळीच्या शत्रूंची हत्या करण्यासाठी वापरु शकतो. आणि मग हे सर्व सामान,रथ सोडून द्या ,आम्ही... जसे लढाईनंतर, फक्त विजय,मग आपण त्यांना ठार. आणि त्याचप्रमाणे हे शरीर आहे, हे मन आहे,ही इंद्रिय आहेत. म्हणून या भौतिक अस्तित्वावर विजय मिळवण्यासाठी त्याचा वापर करा. आणि नंतर हा देह सोडून द्या आणि देवाच्याद्वारी जा.

तमाल कृष्ण: भक्त करू, मला म्हणायचंय जसे तुम्ही आम्हाला उत्साह देत असता पुढे नेण्यासाठी...

प्रभुपाद: ते तुमच्या शस्त्रांना धार आणण्यासाठी. ते सुद्धा वर्णन केले आहे. अध्यात्मिक गुरूंची सेवा करून, तुम्ही तुमच्या शस्त्रांना कायम धार काढून ठेवा. आणि मग श्रीकृष्णांची मदत घ्या. अध्यात्मिक गुरूंचे शब्द शस्त्रांना धार आणतात. आणि यस्य प्रसादाद भगवत... आणि अध्यात्मिक गुरु खुश झाले,मग श्रीकृष्ण लगेच मदत करतात. ते तुम्हाला शक्ती देतात. समजा तुम्हाला तलवार मिळाली, तलवारीला धार काढलीत, पण जर तुमच्याकडे ताकद नसेल, तुम्ही त्या तलवारीचे काय कराल? श्रीकृष्ण तुम्हाला ताकद देतील, कसे लढायचे आणि शत्रूचा संहार करायचा.सर्वकाही वर्णन केलं आहे. म्हणून चैतन्य महाप्रभु (सांगतात)

गुरु-कृष्ण-कृपाय (चै च मध्य १९।१५१)

अध्यात्मिक गुरूंच्या सूचनांनी तुमच्या शस्त्रांना धार करा आणि मग श्रीकृष्ण तुम्हाला शक्ती देतील,तुम्ही जिकंण्यासाठी सक्षम व्हाल. हे लाक्षणिक स्पष्टीकरण मला वाटत मी काल रात्री दिल. . इथे श्लोक आहे, अच्युत बल, अच्युत बल. इथे पुष्ट कृष्ण आहे?

हरी-शौरी: पुष्ट कृष्ण?

प्रभुपाद: आपण श्रीकृष्णांचे सैनिक आहोत, अर्जुनाचे सेवक. फक्त तुम्ही त्याप्रमाणे वागलं पाहिजे. मग तुम्ही शत्रूंचा नायनाट करू शकाल. त्यांच्याकडे सामर्थ्य नाही, जरी त्याची संख्या शंभरपट आहे. जसे कौरव आणि पांडव. त्यांच्याकडे शक्ती नव्हती,

यत्र योगेश्वरः कृष्णो (भ गी १८।७८)

श्रीकृष्णांना तुमच्या बाजूला असूद्या, मग सर्वकाही यशस्वी होईल. तंत्र श्रीर्विजयो.