MR/Prabhupada 0155 - प्रत्येक जण देव बनण्याचा प्रयत्न करत आहे



Lecture on SB 7.6.5 -- Toronto, June 21, 1976


तर आता, भगवद गीतेमध्ये आपल्याला तीन शब्द सापडतात. सनातन,शाश्वत तिथे वापरला आहे. प्रथम गोष्ट जीव, सजीवप्राणी त्यांचं वर्णन सनातन म्हणून केलं आहे.

ममैवांशो जीवलोके जीवभूतः सनातनः (भगवद् गीता 15.7)

आपण सजीव प्राणी सनातन आहोत. असं नाही की आपण मायेच्या प्रभावामुळे जीव-भूतः बनलो. आपण स्वतःला मायेच्या प्रभावाखाली ठेवले आहे. म्हणून आपण जीवभूतः . खरंतर आपण सनातन आहोत. सनातन म्हणजे शाश्वत. नित्य शाश्वत. जीवात्म्याचे वर्णन:

नित्य शाश्वतोSयं ना हन्यते हन्यमाने शरीरे (भगवद् गीता 2.20)।

ते सनातन, तर आपली बुद्धी एवढी कमी आहे की जर मी सनातन,शाश्वत आहे, मला जन्म आणि मृत्यू नाही. मला या जन्म आणि मृत्यूच्या क्लेशात का टाकलं आहे? याला ब्रम्हजिज्ञासा म्हणतात. पण आपण शिक्षित नाही. पण आपल्याला शिक्षित केलं पाहिजे. किमान आपण या सूचनांचा लाभ घेतला पाहिजे. आपण सनातन आहोत. आणि दुसरं एक जग आहे, भगवद् गीतेत याचा उल्लेख आहे.

परस्तस्मात्तु भावोSन्योSव्यत्त्कोSव्यत्त्कत्सनाततनः (भ.गी 8.20)

व्यत्त्को अव्यक्तात सनातनः हे भौतिक जग प्रकट झाले आहे. आणि त्याची पार्श्वभूमी भौतिक शक्ती आहे. महत-तत्त्व. ते प्रकट झाले नाही. तर व्यत्त्को अव्यक्तात. त्यापलीकडे दुसरी प्रकृती,सनातन अध्यात्मिक प्रकृती आहे.त्याला सनातन म्हणतात.परस्तस्मात्तु भावोSन्योSव्यत्त्कोSव्यत्त्कत्सनाततनः (भ.गी 8.20) आणि जीवभूतः सनातना. आणि अकरावा अध्याय, अर्जुनाने श्रीकृष्णांचे सनातन म्हणून वर्णन केलं आहे. तर तीन सनातन. तीन सनातन. जर आपण सर्व सनातन आहोत, सनातन-धाम आहे आणि श्रीकृष्ण सनातन आहेत. आपण सुद्धा सनातन आहोत. तर जेव्हा ते एकत्र जोडले जातात, त्याला सनातन धर्म म्हणतात. त्यांना माहित नाही सनातन म्हणजे काय.

त्यांना वाटत की जर मी विशिष्ट्य पोशाख केला आणि जर मी विशिष्ट्य समाजात जन्माला आलो, तर मी सनातन-धर्म बनलो. नाही. प्रत्येकजण सनातन-धर्म बनू शकतो. पण त्यांना माहित नाही सनातन धर्माचा अर्थ काय आहे. प्रत्येक सजीव प्राणी सनातन आहे. आणि श्रीकृष्ण, भगवंत सनातन आहेत. आणि अशी एक जागा आहे जिथे आपण एकत्र भेटू शकतो - ते सनातन धाम. सनातन धाम, सनातन-भक्ती,सनातन-धर्म. जेव्हा तो अंमलात आणला जातो,त्याला सनातन धर्म म्हणतात. तर सनातन धर्म म्हणजे काय? समजा मी त्या सनातन धामाला परत गेलो आणि तिथे देव सनातन आहे, आणि मी सनातन आहे. तर आपली सनातन कर्म काय आहेत? त्याचा अर्थ असा आहे का की जेव्हा मी सनातन धामाला जातो मी देव बनतो? नाही तुम्ही देव बनत नाही. कारण देव एकच आहे. ते सर्वोच्च देव आहेत,मालक,आणि आपण सेवक आहोत.

चैतन्य महाप्रभु: जीवेर स्वरूप हय नित्य कृष्ण दास (चैतन्य चरितामृत मध्य 20.108-109)

तर इथे आपल्यापैकी प्रत्येकजण, आपण भगवान बनण्याचा दावा करतो. पण तुम्ही जेव्हा सनातन धामाला परत जाता, तेव्हा आपण - जोपर्यंत आपण लायक बनत नाही आपण तेथे जाऊ शकत नाही. मग आपण भगवंतांच्या सेवेत कायम व्यस्त रहातो. ते सनातन धाम. तर तुम्ही त्याचा सराव करा. सनातन धाम म्हणजे हा भक्ती योग. कारण आपण विसरलो आहोत. प्रत्येकजण भगवान बनण्याचं प्रयत्न करत आहे. आता इथे भगवंतांचे सेवक बनण्याचा सराव करा. आणि जर तुम्ही खरंच लायक असाल,ते तुम्ही आता आहात... निश्चिंत रहा की तुम्ही भगवंतांचे सेवक बनाल, तो भक्ती मार्ग आहे. जसे चैतन्य महाप्रभूंनी सांगितलंय,

गोपी-भर्तृर पद-कमलयोर दास-दास-दास-दासानुदास:(चैतन्य चरितामृत मध्य 13.80)

जेव्हा तुम्ही भगवंतांच्या दासांचे, दासांचे,दासांचे दास बनण्यात निष्णांत बनता - शंभर वेळा खाली, नोकर - मग तुम्ही परिपूर्ण बनता. पण इथे प्रत्येकजण सर्वोच्च भगवान बनण्याचा प्रयत्न करत आहे. कोणीतरी "सोहम", "अहं ब्रम्हास्मि" शब्दाचा गैरवापर करत होत. आणि म्हणून "मी सर्वोच्च आहे." पण ते नाही आहे. वैदिक शब्द आहेत,पण "मी देव आहे." हा सोहमचा अर्थ नाही. सोहम म्हणजे "माझ्याकडेही तीच गुणवत्ता आहे." कारण

ममैवांशो जीवभूतः (भगवद् गीता 15.7)

जीव भगवंतांचा,श्रीकृष्णांचा अंश आहे, म्हणून गुण समान आहेत. ज्याप्रमाणे तुम्ही समुद्रातून पाण्याचा एक थेंब घेतलात. तर पूर्ण समुद्राचे आणि पाण्याच्या एका थेबाचे रासायनिक घटक- सारखेच त्याला सोहम किंवा ब्रम्हास्मि म्हणतात. आम्ही या शब्दांचा, वैदिक आवृत्तीचा, गैरवापर करतो. आणि असा खोटा विचार करतो की "मी देव आहे. मी देव बनलो आहे." आणि जर तुम्ही देव असाल मग तुम्ही कुत्रा का बनलात? देव कुत्रा बनतो का? नाही. ते शक्य नाही. कारण आपण सूक्ष्म कण आहोत. ते सुद्धा शास्त्रात सांगितलं आहे.

केशाग्र शतभागस्य
शतधा कल्पितस्य च
जीवः भागो स विज्ञेयः
स अनन्त्याय कल्पते (चैतन्य चरितामृत मध्य 19.140)

आपली अध्यात्मिक ओळख ही आहे की आपण केसाच्या आग्राच्या दशसहस्रांश भाग आहोत. तो फार छोटा आहे. आपण तो दशसहस्रांश भागात विभाजन करतो. आणि एक, ती आपली ओळख आहे. आणि ती छोटी ओळख आपल्या शरीरात आहे. तर तुम्ही कुठे शोधलं? तुमच्याकडे असं काही यंत्र नाही. म्हणून आपण म्हणतो निराकार. नाही, तिथे आकार आहे. पण तो इतका सूक्ष्म आणि लहान आहे. की या भौतिक नजरेने पहाणे शक्य नाही. म्हणून आपल्याला वेदांच्या वर्णनावरून पहिले पाहिजे. शास्त्र चक्षु. ती वेदांत आवृत्ती आहे. आपल्याला शास्त्रांच्या मार्फत बघितलं पाहिजे. या भौतिक दृष्टीनी नाही. ते शक्य नाही.