MR/Prabhupada 0159 - कसे कष्ट करायचे हे लोकांना शिकवायच्या मोठमोठ्या योजना



Lecture on SB 5.5.15 -- Vrndavana, November 3, 1976


मोठ्या, मोठ्या शहरात जसे कलकत्ता, मुंबई,लंडन,न्यूयॉर्क,प्रत्येकजण खूप कष्ट करत आहे. असं नाही की एखाद्याला फक्त मोठ्या शहरातच सहज अन्न मिळू शकेल. नाही. प्रत्येकाला काम केलं पाहिजे. आणि प्रत्येकजण कष्ट करत आहे. तुम्हाला असं वाटत की प्रत्येकची परीस्थिती सारखीच आहे? नाही. ते शक्य नाही नशीब. नशीब. एखादा माणूस चोवीस तास, दिवस आणि रात्र कष्ट करत आहे, फक्त त्याला दोन पोळ्या मिळतात. एवढंच. मुंबईत आम्ही हे बघितलंय. ते अशा अंधाऱ्या परिस्थितीत राहतात की दिवसाही त्यांना केरोसीनचा दिवा लागतो. अशा ठिकाणी ते जगतात, आणि इतकी घाणेरडी परिस्थिती आहे. याचा अर्थ असा आहे का की मुंबईत प्रत्येकजण विलासी आयुष्य जगत आहे? नाही.

तसेच, प्रत्येक शहरात, ते शक्य नाही. तुम्ही तुमची आर्थिक परिस्थिती नुसते कष्ट करून सुधारू शकत नाही. ते शक्य नाही. तुम्ही कष्ट करा किंवा करू नका, जे तुमच्या नशिबात असेल, ते तुम्हाला मिळेल. म्हणून आपल्या शक्तीचा वापर केला पाहिजे... मल-लोक-काम मद-अनुग्रहार्थ: आपल्या शक्तीचा वापर श्रीकृष्णांना खुश करण्यासाठी केला पाहिजे. ते झालं पाहिजे. शक्तीचा वापर त्या गोष्टीसाठी झाला पाहिजे. खोट्या आशेवर की "मी खुश होईन" यासाठी शक्ती वाया घालवू नका. मी हे करीन मी ते करीन. मी अशाप्रकारे पैसे मिळवीन मी..." कुंभाराची गोष्ट. कुंभार योजना आखतो. त्याला थोडी मडकी मिळाली आणि तो बेत करत आहे. "आता मला ही चार मडकी मिळाली आणि मी ती विकेनं. मी नफा होईल.

मग माझ्याकडे दहा मडकी असतील. मग मी दहा मडकी विकेनं,मी थोडा नफा मिळवेन. मला वीस मडकी मिळतील आणि मग तीस मडकी मिळतील,चाळीस मडकी. अशा प्रकारे मी लक्षाधीश होईन. आणि त्यावेळी लग्न करेन,आणि मी माझ्या पत्नीवर नियंत्रण ठेवेन ह्याप्रकारे आणि त्याप्रकारे. आणि जर तिने ऐकलं नाही, मग मी तिला अशी लाथ मरेन." तर जेव्हा त्याने लाथ मारली ती मडक्यांना लागली आणि सगळी मडकी फुटली. तर त्याच स्वप्न विरल. आपण पाहत आहेत? तसेच आपण फक्त स्वप्न पाहत आहोत. थोड्या मडक्यां बरोबर आपण फक्त स्वप्न बघत आहोत."हि मडकी वाढून अनेक मडकी होतील,अनेक मडकी,अनेक मडकी," मग संपलं. नुसत्या कल्पना, बनवू नका. हे आहे... गुरु आणि अध्यात्मीक गुरु आणि सरकार सावध असले पाहिजे " हे दुष्ट योजना बनवू शकणार नाहीत. हि दुष्ट माणसं आनंदी बनण्यासाठी योजना आखू शकणार नाहीत. "न योजयेत्कर्मसु कर्ममूढान् हे जग कर्म-जगत आहे.

हे भौतिक जग आहे. ते मुळातच झुकलेले आहेत. , तर त्याचा काय उपयोग? लोके व्ययायामिस मद्य सेवा नित्यास्तू जंतू: ज्याप्रमाणे कामजीवन कामजीवन नैसर्गिक आहे. संभोगाचा आनंद कसा घ्यावा त्यासाठी कुठल्याही विद्यालयीन शिक्षणाची गरज लागत नाही. ते त्याचा आनंद घेतील. कोणीही... "कोणालाही शिकवले जात नाही कसे हसावे किंवा रडावे किंवा कसा कामजीवनाचा आनंद घ्यावा." एक बंगाली म्हण आहे, हे नैसर्गिक आहे. तुम्हाला या कर्मासाठी शक्षणाची गरज नाही. आता ते कसे कष्ट करायचे हे लोकांना शिकवण्याच्या मोठमोठया योजना आखत आहेत. हे वेळ वाया घालावे आहे. शैक्षणिक संस्था लोकांना कृष्णभावनामृत कसे बनायचे हे शिकवण्यासाठी असल्या पाहिजेत, हे नाही तर तर बनण्यासाठी नाही. ते वेळ फुकट घालवणे आहे. कारण तो कार्यक्रम कधीही यशस्वी होणार नाही. तल्लभ्यते दुःखवदन्यतः सुख सर्वत्र कालेन गभीररंहसा निसर्गनियम कार्य करत आहे.

प्रकृतेः क्रियमाणानि गुणै: कर्मणी सर्वशः (भ.गी. 3.27)

जे काही... म्हणून आपली वैदिक संस्कृती आहे लोक स्वतःच्या स्थितीत समाधानी आहेत. ब्राम्हण,क्षत्रिय,वैश्य,शूद्र. देवाच्या दयेने जे काही मिळालंय, त्यात ते समाधानी आहेत. श्रीकृष्णानची कृपा प्राप्त करण्यासाठी खऱ्या शक्तीचा उपयोग झाला पाहिजे त्याची गरज आहे, श्रीकृष्णांना कसे शरण जायचे हे शिकण्याची गरज आहे.

अहं त्वां सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि (भ.गी. 18.66)

तिथे शेवट आहे. भारतात आपण पाहत नाही की ... महान ऋषी, त्यांनी अनेक ग्रंथ लिहिले आहेत,पण ते झोपडीत राहत होते. फक्त क्षत्रिय राजे, करणं त्यांना राज्य करायचं असत,ते मोठमठाले महाल बांधत इतर कोणीं नाही, ती साधं आयुष्य जगतात,खूप साधं. आर्थिक प्रगती,उंच इमारती,आणि पूल, अशा गोष्टीत वेळ वाया घालवत नाहीत. ही वैदिक संस्कृती नाही. हि असुरिक संस्कृती आहे.