MR/Prabhupada 0158 - आई - हत्या संस्कृती
Lecture on SB 5.5.3 -- Stockholm, September 9, 1973
- नूनं प्रमत्तः कुरुते विकर्म (श्री.भा. 5.5.4)
विकर्म म्हणजे गुन्हेगारी, निषिद्ध कर्म. तीन प्रकारची कर्म असतात: कर्म, विकर्म,अकर्म. कर्म म्हणजे विहित कर्म. ते कर्म आहे. ज्याप्रमाणे स्वकर्मणा. भगवद् गीतेमध्ये
- स्वकर्मणा तमभ्यर्च्य (भ.गी. 18.46)
प्रत्येकाला विहित कर्म आहे. ती वैज्ञानिक समज कुठे आहे? तेथे असणे आवश्यक आहे... जसे मी त्या दिवशी बोलत होतो,मानवी समाजाची वैज्ञानिक विभागणी. सगळ्यात बुद्धिमान वर्ग, त्यांना ब्राह्मणाप्रमाणे प्रशिक्षित केले पाहिजे. कमी, अल्प बुद्धिमान, त्यांना प्रशासक म्हणून प्रशिक्षित केले पाहिजे. अल्प बुद्धिमान, त्यांना व्यापारी म्हणून प्रशिक्षित केले पाहिजे. गायींचे रक्षण आणि शेती. आर्थिक विकासात गोरक्षणाची गरज असते. पण या दुष्टाना हे माहित नाही.
आर्थिक विकास गायी मारून. जरा बघा, दुष्ट संस्कृती. माफ होणार नाही. ते शास्त्र आहे. असा विचार करू नका की मी पाश्चिमात्य संस्कृतीवर टीका करत आहे. ते शास्त्र सांगत. खूप अनुभवी. येथे खूप आर्थिक विकास जाणणारे वकील,आहेत. पण त्यांना माहित नाही की गायीचे संरक्षण आर्थिक विकासाच्या बाबींपैकी एक आहे. ही दुष्ट, त्यांना माहित नाही. ते मानतात की गायीची हत्या करणे चांगलं आहे. फक्त उलट. म्हणून कुरुते विकर्म. फक्त जिभेच्या थोड्या समाधानासाठी. तोच लाभ आपल्याला दुधापासून मिळू शकतो. पण कारण ते दुष्ट आहेत, वेडामनुष्य, त्यांना वाटत की गायीचे दूध पिण्यापेक्षा तिचे रक्त पिणे किंवा खाणे जास्त चांगलं आहे. दूध म्हणजे रक्ताचे परिवर्तनच आहे. सर्वांना माहित आहे. प्रत्येकाला माहित आहे. ज्याप्रमाणे मनुष्यप्राणी,आई, मूल जन्माला आल्यावर लगेच... मूल जन्माला येण्याआधी, आईच्या स्तनांत एक थेंबही दूध तुम्हाला सापडणार नाही. बघा. तरुण मुलीच्या स्तनात दूध नसत. पण जसे मूल जन्माला येते,तेव्हा दूध असते तात्काळ,उत्स्फूर्त. ही देवाची व्यवस्था आहे. कारण मुलाला अन्नाची गरज आहे.
जरा बघा कशी देवाची व्यवस्था आहे.तरीही आपण आर्थिक प्रगती करण्याचा प्रयत्न करत आहोत. जर मूल जन्माला आले आणि देवाचा आर्थिक कार्यक्रम छान आहे, नैसर्गिक आर्थिक कार्यक्रम, की लगेचच आई दुधासह तयार... ही आर्थिक प्रगती. तर तेच दूध गाय पुरवते. ती खरंतर आई आहे, आणि ही दुष्ट संस्कृती आईची हत्या करते. जरा बघा आई-हत्या संस्कृती. आपण आयुष्याच्या सुरवातीला दुध आईच्या अंगावर पितो. आणि जेव्हा ती वृद्ध होते तेव्हा तुम्ही विचार केलात, "आई निरुपयोगी ओझं आहे. तिचा गळा कापा," ही संस्कृती आहे?