MR/Prabhupada 0164 - मार्ग सोपा करण्यासाठी वर्णाश्रम धर्माची स्थापना केली पाहिजे
Room Conversation Varnasrama System Must Be Introduced -- February 14, 1977, Mayapura
हरी-शौरीः पण चैतन्य महाप्रभूंच्या प्रत्यक्ष प्रचारात त्यांनी त्यांना जप करण्यास प्रेरित केले.
प्रभुपाद: ते सामान्य माणसाला शक्य नाही.
हरी-शौरी काय, फक्त लोकांना जप करायला प्रेरित करायचं? त्यांनी केवळ जप करायला शिकवले.
प्रभुपाद: पण कोण जप करेल? कोण जप करेल?
सत्वस्वरूप: पण जर त्यांनी जप केला नाही, तर ते वर्णाश्रमधर्मामध्ये प्रशिक्षित होणार नाहीत. ते सोप आहे.
प्रभुपाद: जप आहे.पण तुम्ही अशी अपेक्षा करू शकत नाही की लोक चैतन्य महाप्रभूंप्रमाणे जप करतील. ते अगदी सोळा माळा सुद्धा, जप करणार नाहीत. (आणि) ते दुष्ट चैतन्य महाप्रभु होणार आहेत.
सत्वस्वरूप: नाही. पण जर त्यांनी कमीतकमी जप केला आणि थोडा प्रसाद...
प्रभुपाद: जप चालू राहील. तो थांबणार नाही. पण त्याचवेळेला मार्ग सुलभ करण्यासाठी वर्णाश्रम-धर्म स्थापन करणे आवश्यक आहे.
हरी-शौरी: खरं तर माझी स्वतःची अशी समजूत आहे की वर्णाश्रम कली युगात शक्य नाही म्हणून जप करायला सांगितला आहे.
प्रभुपाद:कारण ते मन शुद्ध करत. जप थांबणार नाही. हरी-शौरी: म्हणून वर्णाश्रम पद्धतीत बदलकरण्यासाठी जप करायला सांगितला आणि त्याप्रमाणे.
प्रभुपाद: होय, ते बदलू शकते,पण ते कोण बदलणार? ते... लोक तेवढी प्रगत नाहीत. जर तुम्ही जप करताना हरिदास ठाकुरांचे अनुसरण केलेत, ते शक्य नाही.
सत्वस्वरूप: आम्ही त्यांना सांगू तुम्ही तुमच काम चालू ठेवा पण जप सुद्धा करा.
प्रभुपाद: होय, ठाकह अपणार काजे, भक्तिविनोद ठाकूर. आपनार काज की. चैतन्य महाप्रभु शिफारस केल्येय, स्थाने स्थित:. आणि जर ते स्थानामध्ये राहिले नाहीत, मग सहजिया जप होईल. ज्याप्रमाणे सहजियांकडे सुद्धा माळ असते आणि..., पण त्यांच्याकडे तीन डझन बायका असतात. या प्रकारचा जप चालू राहील. ज्याप्रमाणे आपला मधूद्विस. तो सन्यासी म्हणून योग्य नाही पण त्याला सन्यास मिळाला. आणि पाच बायकांशी त्याच संबंध होता, आणि हे त्याने उघड केलं. म्हणून वर्णाश्रम-धर्म गरजेचा आहे. नुसते प्रदर्शन चालणार नाही तर संपूर्ण जगभर वर्णाश्रम-धर्माचा परिचय करून द्या. आणि...
सत्वस्वरूप:इस्कॉन समुदायापासून सुरु होणारी ओळख?
प्रभुपाद: हो. हो. ब्राम्हण,क्षत्रिय.नियमित शिक्षण असणे आवश्यक आहे.
हरी-शौरी: पण आपल्या संघात, जर..., आम्ही वैष्णव म्हणून प्रशिक्षण देत असल्याने...
प्रभुपाद: हो.
हरी-शौरी:... मग आपण कसे आपल्या संघाचे विभाजन करू शकू?
प्रभुपाद: वैष्णव सोपं नाही. वैष्णव बनण्यासाठी वर्णाश्रम-धर्म स्थापन केला पाहिजे. वैष्णव बनणे इतके सोपे नाही.
हरी-शौरी: नाही, ही स्वस्त गोष्ट नाही.
प्रभुपाद: हो. म्हणून हे केले पाहिजे. वैष्णव, वैष्णव बनणे, इतके सोपे नाही. जर वैष्णव, वैष्णव बनणे,इतके सोपे आहे,का अनेक माणसं खाली घसरतात, खाली पडतात. हे सोपे नाही उच्चतम योग्य ब्राम्हणांसाठी संन्यास आहे. आणि फक्त वैष्णवांसारखे कपडे घालून,ते आहे... पडणे.
हरी-शौरी: तर वर्णाश्रम पद्धत कनिष्ठ लोकांसाठी आहे. कनिष्ठ-अधिकारी.
प्रभुपाद: कनिष्ठ?
हरी-शौरी: जेव्हा एखादा नवीन असतो.
प्रभुपाद: हो. हो. कनिष्ठ-अधिकारी,हो.
हरी-शौरी: वर्णाश्रम पद्धत फायदेशीर आहे.
प्रभुपाद: कनिष्ठ-अधिकारी म्हणजे तो ब्राम्हण असला पाहिजे. तो कनिष्ठ-अधिकारी. अध्यात्मिक जीवन,कनिष्ठ-अधिकारी,म्हणजे तो पात्र ब्राम्हण असला पाहिजे. तो कनिष्ठ आहे. भौतिक विश्वात ब्राम्हणाला उच्च दर्जाचे मानतात,इथे ते कनिष्ठ-अधिकारी आहेत.