MR/Prabhupada 0165 - शुद्ध कर्माला भक्ती म्हणतात



Lecture on BG Introduction — New York, February 19-20, 1966


सर्वोच्च चेतना , हे भगवद् गीतेत स्पष्ट केले जाईल. त्या अध्यायात जिथे जीव आणि ईश्वर यांच्यातील फरक स्पष्ट केला आहे. क्षेत्र-क्षेत्रज्ञ. हे क्षेत्रज्ञ हे समजावून सांगितले आहे की भगवान सुद्धा क्षेत्रज्ञ किंवा चेतना आहेत. आणि जीव, किंवा सजीवप्राणी, ते सुद्धा चेतना आहेत. पण फरक हा आहे की सजीवप्राण्याला त्याच्या शरीराचे ज्ञान असते. पण भगवंताना सर्व देहांचे ज्ञान असते.

ईश्वरः सर्वभूतानां ह्रदेशेsर्जुन तिष्ठति (भगवद् गीता 18.61)

भगवंत प्रत्येकाच्या हृदयात स्थित असतात. म्हणून ते एखाद्या विशिष्ट जिवाच्या मानसिक हालचाली, कार्य जाणतात. आपण विसरता कामा नये. हे सुद्धा स्पष्ट केले आहे की परमात्मा किंवा भगवंत, प्रत्येकाच्या हृदयात ईश्वर नियंत्रक म्हणून राहतात. आणि ते सर्वांना मार्गदर्शन करतात. ते मार्गदर्शन करतात.

सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो (भगवद् गीता 15.15)

ते प्रत्येकाच्या हृदयात स्थित आहेत,आणि ते मार्गदर्शन करतात जेणेकरून जीव त्याच्या इच्छेनुसार कार्य करतो. सजीवप्राणी काय करायचा विसरतो. सर्वप्रथम तो एका विशिष्ट प्रकारे कार्य करायचा दृढनिश्चय करतो. आणि मग तो स्वतःच्या कर्माच्या क्रिया आणि प्रतिक्रियांमध्ये अडकला जातो. पण एक देह सोडल्यावर,जेव्हा तो दुसऱ्या प्रकारच्या देहात प्रवेश करतो... ज्याप्रमाणे आपण एक प्रकारचे वस्त्र बदलतो,एक प्रकारचे वस्त्र ,दुसऱ्या प्रकारच्या वस्त्रासाठी. त्याचप्रमाणे,हे भगवद् गीतेत स्पष्ट केलंय की

वासांसि जीर्णानी यथा विहाय (भगवद् गीता 2.22)

एक, ज्याप्रमाणे एखादा वस्त्र बदलतो,त्याचप्रमाणे जीव , सुद्धा निरनिराळे शरीर बदलतो. आत्माचे स्थानांतर, आणि त्याच्या पूर्वकर्माच्या क्रिया आणि प्रतिक्रिया पुढे नेतो. तर या क्रिया बदलू शकतात जेव्हा जीव सत्वगुणात असतो. विवेकबुद्धीने, आणि त्याला समजते कोणत्या प्रकारचे कार्य त्याने केले पाहिजे. आणि जर त्याने तसे केले तर त्याच्या पूर्वकर्माच्या क्रिया आणि प्रतिक्रिया बदलू शकतील. म्हणून कर्म शाश्वत नाही. इतर गोष्टी, चार गोष्टींपैकी,पाच गोष्टी - ईश्वर, जीव, प्रकृती,काल, आणि कर्म- या चार गोष्टी शाश्वत आहेत, तर कर्म,ज्याला कर्म म्हणतात,ते शाश्वत नाही.

आता आत्मा ईश्वर, परमात्मा ईश्वर, आणि परमात्मा ईश्वर किंवा भगवंत,आणि जीव आहे,सध्याच्या परिस्थितीत असे आहे. चेतना ,भगवंत आणि जीव दोघांची चेतना, ते आहेत, त्यांची चेतना दिव्य आहे. असं नाही आहे की हि चेतना पदार्थाच्या संयोगाने उत्पन्न होते. ती चुकीची कल्पना आहे. हा सिद्धांत की ठराविक भोतिक परिस्थितीत चेतना विकसित होते भगवद् गीतेत हे स्वीकारलेले नाही. ते होऊ शकत नाहीत. चेतना भौतिक परिस्थितीच्या अवरणामुळे विकृत परिवर्तित होऊ शकते. ज्याप्रमाणे रंगीत काचेतून आलेला प्रकाश त्याच रंगाचा भासतो. त्याचप्रमाणे, भगवंतांची चेतना,ती भौतिक परिस्थितीने प्रभावित होत नाही. सर्वोच्च भगवान, ज्याप्रमाणे कृष्ण त्यांनी सांगितलंय की

मयाध्यक्षेण प्रकृती (भगवद् गीता 9.10)

जेव्हा ते या भौतिक जगात अवतरतात,त्यांची चेतना भौतिक वातावरणाने प्रभावित होत नाही त्यांच्या चेतनेवर भौतिक परिस्थितीचा परिणाम झाला होता. भगवद् गीतेतील दिव्या विषयाबद्दल बोलायला ते असमर्थ असते. एखादा भौतिकरित्या दूषित चेतनेतुन मुक्त झाल्याशिवाय दिव्य धामा विषयी काही बोलू शकत नाही. तर भगवंत भौतिकरीत्या दूषित नाहीत. पण आपली चेतना,सध्याच्या क्षणी,भौतिकरीत्या दूषित आहे. तर संपूर्ण गोष्ट,भगवद् गीता शिकवते,आपण भौतिक दूषित चेतना शुद्ध केली पाहिजे. आणि त्या शुद्ध चेतनेत, कार्य केले पाहिजे. ते आपल्याला सुखी बनवेल. आपण थांबू शकत नाही. आपण आपली कार्य थांबवू शकत नाही. कर्म शुद्ध केले पाहिजे. आणि या शुद्ध कर्माला भक्ती म्हणतात.

भक्ती म्हणजे ते आहे, ते सुद्धा सामान्य कर्मा प्रमाणे भासत,पण ते दूषित कर्म नाही. ते शुद्ध कर्म आहे. तर अज्ञानी माणूसाला वाटेल की भक्त सामान्य माणसाप्रमाणे काम करत आहे. पण कमी ज्ञान असलेला माणूस, त्याला माहित नाही की भक्तांचे कर्म किंवा भगवंतांचे कर्म, ते पदार्थाच्या अशुद्ध भावनेने दूषित होत नाही. तीन गुणांची अशुद्धता,प्राकृतिक गुण, पण दिव्य चेतना. तर आपली चेतना भौतिक प्रभावाने दूषित आहे. आपल्याला माहित असायला हवं.